Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लोकमान्य, लोकशाहीरांना अभिवादन

$
0
0
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध पक्ष, संघटनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये या नेत्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने व्याख्यान, वाहनफेरी आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुक्तिसंग्राम स्मारक गौरवास्पद

$
0
0
हैदराबाद मुक्तिसंग्राम एक जाज्वल्य इतिहास आहे. जो मराठवाड्याच्या अस्मितेला प्रखरतेने प्रदर्शित करतो. हैदराबाद संस्थान, निजामी राजवट आणि अत्याचारी रझाकार यांच्याशी संघर्ष करीत मराठवाड्याने स्वातंत्र्य मिळवले.

व्हॅनमधून सोळा लाखांची चोरी

$
0
0
सिडको एन १ भागातून व्हॅनमधून १६ लाख रुपये लांबवण्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान घडला. कॉर्पोरेशन बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये ही रक्कम टाकली जाणार होती.

‘डीएमआयसी’साठी सहकार्य करावे

$
0
0
‘महत्त्वाकांक्षी ‘डीएमआयसी’चा (दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर) भार पेलण्यासाठी औरंगाबाद शहरातील सर्वांनीच सहकार्य केले पाहिजे,’ असा सूर ‘मटा’तर्फे आयोजित राउंड टेबलमध्ये व्यक्त करण्यात आला.

जायकवाडीत ५ टक्के साठा

$
0
0
गेल्या दोन दिवसांपासून जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणामधील पाणीसाठ्यामध्ये सतत वाढ होत आहे. अवघ्या दोन दिवसांमध्ये ८०.३२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

लाच घेताना रंगेहाथ पकडले

$
0
0
उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोविंद राठोड यांना शनिवारी पोलिस ठाण्यात ७५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. राठोड यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

'महाराष्ट्रात कानडी माणसे राहतात'

$
0
0
मराठी माणसांवर अत्याचार करणाऱ्या कर्नाटक सरकारने महाराष्ट्रात कानडी माणसे राहत आहेत याचे भान ठेवावे, शिवसेनेने मनात आणले तर काहीही होऊ शकेल, असा इशरा शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिला.

उजनीचे पाणी मृगजळच!

$
0
0
उस्मानाबादकरांना नियमित व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे १९० कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या उजनी पाणीपुरवठा योजनेचा वापर हा केवळ आपत्तकालीन स्थितीत करावयाचा आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

परळीतील वीजनिर्मिती बंद

$
0
0
बीड जिल्ह्यातील परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र पाण्याअभावी आज बंद करावे लागले. परळीच्या केंद्राची वीजनिर्मिती क्षमता ११३० मेगावॅट आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका ऐन पावसाळ्यात या वीजनिर्मिती केंद्रास बसला आहे.

‘फ्रेंडशिप’साठी मित्रांचा प्रयत्न

$
0
0
मैत्री कायम रहावी, घट्ट रहावी यासाठी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करताना दिसतात. असाच प्रयत्न चार मित्रांनी केला तोही ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने. ‘फ्रेंडशिप डे’च्या ‌दिवशी संपूर्ण दिवस सोबत घालवायचा म्हणून या चौघांनी एका प्रदर्शनात चक्क खाद्य पदार्थांचा स्टॉल लावला आहे.

लोकांच्या पैशांवर पारखेचा सिनेमा

$
0
0
गुंतवणुकीवर दामदुप्पट पैसा मिळावा, असे आमिष दाखवून अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस इंडिया कंपनीचे मुख्य सूत्रधार दीपक पारखे याने लोकांच्या पैशांवर राजवाडा हा मराठी चित्रपट तयार केल्याची माहिती तपासात समोर येत आहे, परंतु चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तो गजाआड झाला आहे.

हक्काच्या पाण्यासाठी व्यापक लढा

$
0
0
समान पाणी वाटपासाठी न्यायालयीन लढाईला मर्यादा आहेत. मराठवाड्याने पाण्याचा लढा जिंकल्यास काही लोक सुप्रीम कोर्टात जातील. कोर्टात पाणी प्रश्न सुटणे शक्य नसल्यामुळे लोक आंदोलन उभारणे गरजेचे आहे, असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मांडले.

‘जायकवाडी’चा साठा ६.८८%

$
0
0
ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शनिवारी (२ ऑगस्ट) नाथसागराकडे येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले. रात्री आठपर्यंत जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा ६.८८ टक्क्यांवर पोचला होता.

‘व्हीसीं’च्या वर्गाला प्राचार्यांची दांडी

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संलग्नित कॉलेजांच्या प्राचार्यांची बैठक शनिवारी बोलावली. त्यात प्राचार्य विरुद्ध विद्यापीठ प्रशासन असा सामना रंगला.

बीडमध्ये राष्ट्रवादीचा उद्या मेळावा

$
0
0
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

उमेदवार आयात करू नका

$
0
0
भाजपाकडून इच्छुकांची माहिती गोळा करण्यासाठी आलेल्या पक्षनिरीक्षकांसमोर निष्ठावंतांसह नवख्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांनी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व मतदारसंघावर दावा केला आहे.

पंकजा पालवे-मुंडे सांगतील तेच उमेदवार

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. बैठका, मेळावे घ्यायला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाची बैठक कपिलधार येथे शनिवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार पंकजा पालवे यांच्या उपस्थितीत पार पडली.

किनवट तालुक्यात अत्यल्प पाऊस

$
0
0
किनवट तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत केवळ १३९ मिलि मीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी आतापर्यंत ही सरासरी ८०२ मिलि मीटर इतकी होती. त्यामुळे किनवट तालुका कोरड्या दुष्काळाच्या छायेत आला आहे.

पावसाने रस्त्यांची चाळणी

$
0
0
जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय व राज्य महामार्ग तसेच शहरी व ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यामुळे दुर्दशा झाली आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग विभाग, नगरपालिकासह जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

ओव्हरफ्लोचे पाणी वैजापूर तालुक्यात

$
0
0
नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. वैजापूर तालुक्याच्या हद्दीतील बेलगाव येथे हे पाणी रविवारी (३ ऑगस्ट) दाखल झाले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images