Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विद्यार्थी त्रस्त महामंडळ मस्त

$
0
0
शहरातल्या अनेक भागात सिटीबस नसल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. अॅपे, अॅटो रिक्षातून जीवघेणा प्रवास त्यांना करावा लागतो आहे. एसटी महामंडळाकडे सिटीबस सुरू करण्याची वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

बजाजनगरात डेंगीचा तिसरा बळी

$
0
0
बजाजनगर जवळील साईनगरमध्ये राहणाऱ्या वंदना विजय निळकंठ (वय ४०) यांचा डेंगीसदृश्य आजाराने सोमवारी (४ ऑगस्ट) पहाटे औरंगाबादमधील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या परिसरात पंधरा दिवसात डेंगीमुळे तीन जण मरण पावले आहेत.

डेंगीच्या तांडवानंतर येईल का जाग?

$
0
0
शहरात डेंगी हातपाय पसरत असल्याचा इशारा माध्यमे व खासगी डॉक्टरांकडून दिला जात असताना आधीच गेंड्याची कातडी पांघरलेल्या महापालिकेने झोपेचे सोंग घेतले होते. डेंगीमुळे मृत्यूचे तांडव सुरू झाल्यानंतर महापालिकेने डेंगी असल्याचे मान्य करून उपाययोजना सुरू केल्या; परंतु तोपर्यंत पाच ते सहा व्यक्तींचे मृत्यू झाले.

कासव, मोर वन विभागाच्या ताब्यात

$
0
0
वाळूज परिसरात आढळलेला मोर आणि पुंडलिकनगर भागात सापडलेले कासव सोमवारी (४ ऑगस्ट) वन विभागाने ताब्यात घेतले. या दोन्ही प्राण्यांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांच्या अधिवासात सोडले जाणार आहे. वन्य प्राण्यांचा अधिवास सुरक्षित राखण्यासाठी वन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

आईच्या मारामुळे जखमी बालिकेचा मृत्यू

$
0
0
शाळेत जाण्यास नकार दिल्याने रागवलेल्या आईने सहा वर्षाच्या मुलीला मारले होते. या मारहाणीत जखमी झालेल्या बालिकेचा घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना रविवारी (३ ऑगस्ट) मृत्यू झाला. याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

लोकशाही दिनासाठी कर्मचारी उसनवारीवर

$
0
0
महसूल कर्मचारी बेमुदत संपावर असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनासाठी सोमवारी (४ ऑगस्ट) जिल्हा परिषदेतील १५ कर्मचारी उसनवारीवर आणले होते.

भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांनी केली गर्दी

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद पूर्व, फुलंब्री आणि सिल्लोड मतदारसंघातून भाजपच्या तिकिटासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. सोमवारी (४ ऑगस्ट) भाजप कार्यालयात झालेल्या मुलाखतींसाठी गर्दी झाली होती.

‘नानां’साठी आता ‘ना - ना’

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीत फुलंब्री मतदारसंघातून माजीमंत्री हरिभाऊ बागडे यांच्या उमेदवारीला पक्षातील इच्छुक उमेदवारांनीच जोरदार विरोध केला आहे. १६पैकी १४ इच्छुकांनी हरिभाऊ उर्फ नाना बागडेंशिवाय कुणालाही उमेदवारी द्या, अशी मागणी पक्ष निरीक्षकांसमोर केली.

शहाजीराजे स्मारकाचे भिजत घोंगडे

$
0
0
छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्यांच्या इतिहासात अजरामर ठरलेले छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या वेरूळ येथील स्मारकाचे काम अद्याप अपूर्ण आहे. या स्मारकासाठी देण्यात आलेला ७२ लाख रुपयांचा निधी पडून आहे.

शहरात वाळूची सर्रास साठेबाजी!

$
0
0
वाळू साठेबाजीवर बंदी असताना, शहराच्या मध्यवस्तीत सर्रास वाळूविक्री होत आहे. ग्रामीण भागांतून उपसा करुन शहरात भाजीपाल्याप्रमाणे ही विक्री सुरू आहे. महापालिका, पोलिस आणि महसूल प्रशासन या प्रकाराकडे कानाडोळा करीत आहे.

‘एमई-एमटेक’चे तंत्र बिघडले

$
0
0
मास्टर इन इंजिनीअरिंग (एमई) आणि मास्टर इन टेक्नॉलॉजी (एमटेक) अभ्यासक्रमांची निवड यादी जाहीर केल्यानंतर ती रद्द करण्याची वेळ तंत्रशिक्षण विभागावर आली आहे. यादी आणि प्रवेश क्षमतेत तफावत असल्याने ही वेळ आल्याचे सूत्रांनी सांगितले.

धनगर समाजाचा एल्गार

$
0
0
धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दयावरून सर्वत्र आंदोलने सुरू आहेत. अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यात यावे यासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. सोमवारी नांदेडमध्ये हजारो समाजबांधवाच्या उपस्थित मोर्चा काढण्यात आला.

केंद्राकडून मराठवाड्याची थट्टा

$
0
0
२९१ किलोमीटरच्या परभणी-मनमाड रेल्वेमार्ग दुहेरीकरण सर्वेक्षणासाठी, केंद्राने फक्त एक हजार रुपयांची तरतूद रेल्वे अर्थसंकल्पात केली आहे. केंद्राकडून मराठवाड्याची क्रूर थट्टा सुरू आहे.

अजितदादांच्या ताफ्यावर बूटफेक

$
0
0
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सुरेश धस यांची गाडी अडवली. कार्यकर्त्यांपैकी एकाने धस यांच्या गाडीवर बूट फेकला. गाडीच्या काचा लावलेल्या असल्याने बूट गाडीच्या काचेला लागून खाली पडला.

उस्मानाबादवर कोरड्या दुष्काळाचे सावट

$
0
0
उस्मानाबाद जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत केवळ १५३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत सुमारे २१० मिमी इतका पाऊस झाला होता.

‘माळीण’चा बोध घेऊन निसर्गविनाश थांबवा

$
0
0
केदारनाथ व माळीण येथील भौगोलिक रचना वेगळी असली तरी, दोन्ही दुर्घटनांना निसर्ग व्यवस्थेत केलेला अविवेकी हस्तक्षेप कारणीभूत आहे. त्यामुळे प्रशासनाने माळीण घटनेचा योग्य घेऊन नैसर्गिक ऱ्हास थांबवावा, अशी विनंती करणारे पत्र अर्थतज्ज्ञ प्रा. एच .एम. देसरडा यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवले आहे.

काटेपिंपळगावात शिक्षक द्या

$
0
0
तालुक्यातील काटेपिंपळगाव येथील जिल्हा परिषेदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी येथील गट साधना केंद्रात मंगळवारी (५ ऑगस्ट) दुपारी बारापासून शाळा भरविली, परंतु सायंकाळपर्यंत या विद्यार्थ्यांची कोणीही दखल घेतली नव्हती.

सिटीबस अस्तित्वशून्य

$
0
0
शहरात साडेअकरा लाख लोकसंख्येसाठी फक्त चाळीस सिटीबस सुरू आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ उडाला आहे. लोकाभिमुख सेवा देण्यात एस. टी. महामंडळ सपेशल अपयश ठरले आहे.

आयआयएम औरंगाबादलाच पाहिजे!

$
0
0
आयआयएम औरंगाबादलाच झाले पाहिजे, आयआयएम अॅट औरंगाबाद, आयआयएम औरंगाबाद-आयआयएम औरंगाबाद’ अशा घोषणांनी भर पावसात सिडको एन - २ चे मैदान मंगळवारी (५ ऑगस्ट) दणाणले. विद्यार्थी, उद्योजक, सामान्य नागरिक या मागणीसाठी एकत्र आले.

पत्राच्या आधारे खुनाच्या तपास करा

$
0
0
खून करून मृतदेह जमिनीत पुरल्याबाबत मृताच्या बहिणीला आणि पोलिस आयुक्तांना आलेल्या निनावी पत्राच्या आधारे तपास करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी (४ ऑगस्ट) दिले आहेत. पुढील सुनावणी १३ ऑगस्ट रोजी होणार आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images