Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नवे पिंजरे केले तरच प्राणी

0
0
प्राणिसंग्रहालयात सेंट्रल झू ऑथॅरिटीच्या निकषानुसार नवीन पिंजरे उभारले तरच नवीन प्राणी मिळतील, असे झू ऑथॅरिटीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापालिकेने प्राणिसंग्रहालयासाठी सिंहाची एक जोडी, प्रत्येकी एक बिबट्या, लांडगा आणि कोल्ह्याची मागणी नोंदविली आहे.

शामली भारुकाचे अरंगेत्रम

0
0
नृत्यझंकार संस्थेची विद्यार्थिनी शामली भारुका हिचा अरंगेत्रम कार्यक्रम येत्या मंगळवारी (१२ ऑगस्ट) सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात होणार आहे. सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल.

पन्नाशीच्या तरुणांचा थरारक प्रवास

0
0
पन्नाशीतील तिघा मित्रांनी जगातील सर्वात उंच रस्ता खरदुंग्ला पासवरून स्वतःची व्हॅगनार चालविली आणि औरंगाबाद ते लडाखपर्यंतचा ५८७९ किलोमीटरचा थरारक प्रवास पूर्ण केला.

‘समांतर’ला १ सप्टेंबरचा मुहूर्त

0
0
समांतर जलवाहिनीच्या कामाला १ सप्टेंबरपासून सुरुवात केली जाणार असल्याची माहिती महापौर कला ओझा यांनी गुरुवारी (७ जुलै) पत्रकार परिषदेत दिली. या योजनेचा शुभारंभ १५ ते २० ऑगस्टदरम्यान केला जाणार आहे.

पाणी हवे सर्वांना पण, आंदोलनास आले २५ जण

0
0
हक्काचे पाणी सर्वांनाच हवे आहे, मात्र पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी मोजक्याच नागरिकांची असल्याचे मराठवाडा पाणी हक्क संघर्ष समितीच्या निदर्शनांच्या वेळी दिसून आले. हक्काच्या पाण्यासाठी मरावाड्याच्या जनतेवर सातत्याने अन्याय होत आहे.

‘पेट-३’ परीक्षेचा विद्यापीठाला विसर

0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘पेट-३’च्या नावाखाली विद्यार्थ्यांचे अर्ज घेतले. साडेनऊ हजार विद्यार्थ्यांकडून शुल्कापोटी जमा झालेले ५० लाख रुपये विद्यापीठाच्या तिजोरीत पडून आहेत. अर्ज मागवून सहा महिने उलटले तरी परीक्षा घेतलेली नाही. परीक्षा घ्यायचे विद्यापीठ विसरले की काय, असा प्रश्न आता विद्यार्थ्यांना पडला आहे.

पंचनामे केलेल्या वाळू डेपोंना दंड लावणार

0
0
शहरात वाळुची साठेबाजी, विक्री करण्यात येत आहे, मात्र महसूल प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत आहे. किराडपुऱ्यातील ११ मोठ्या वाळुसाठ्यांचे पंचनामे केले. आता त्यांना दंड लावणार असल्याचे तहसीलदार विजय राऊत यांनी सांगितले. इतर डेपोंवर महापालिका, महसूल व पोलिस प्रशासनाच्या वतिने संयुक्त कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाठलाग करून मंगळसूत्र चोर जेरबंद

0
0
एका मजूर महिलेल्या गळ्यातून मंगळसूत्र तोडून पळून जाणाऱ्या गुंड बीट मार्शलमुळे पकडला गेला. या गुंडाला पकडण्यासाठी पोलिसांनी तब्बल अर्धा किलोमीटर पाठलाग केला. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात गुरुवारी (७ ऑगस्ट) सायंकाळी घडलेल्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

‘त्या’ चोराने नाशिकमधील शोरूममधूनही पळवली होती कार

0
0
अदालत रोडवरील धूत मोटर्समधून ३२ लाख रुपयांची पळविणाऱ्या आरोपीने २२ जुलै रोजी नाशिकमधील एका शोरूममधून याच पद्धतीने कार पळविल्याचे निष्पन्न झाले आहे. औरंगाबादमधील घटना २५ जुलैरोजी घडली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून दोन्ही आरोपी एकच असल्याचे स्पष्ट झाले असल्याने येथील कारचोरी प्रकरणात तपासाची सुई नाशिककडे वळविण्यात आली आहे.

मदरशांच्या आधुनिकीकरण योजनेला प्रतिसाद

0
0
धार्मिक शिक्षणासोबतच व्यवहारीक शिक्षण देण्यास तयार असलेल्या मदरशांसाठी महाराष्ट्रात डॉ. जाकीर हुसेन आधुनिकीकरण योजना राबविली जात आहे. या योजनेच्या पहिल्याच टप्प्यात राज्यातील सव्वाचारशे मदरशांनी नोंदणी केली असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री मोहंमद नसीम खान यांनी दिली.

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पेटले

0
0
ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे, या मागणीसाठी मराठवाडा पाणी हक्क संघर्ष समितीतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गुरुवारी (७ ऑगस्ट) आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी मेंढेगिरी समितीसंदर्भात राज्यपालांना विभागीय आयुक्तांमार्फत निवेदन पाठविले.

रेल्वे मार्ग सर्वेक्षणासाठी लाखाचा निधी

0
0
औरंगाबाद-चाळीसगाव या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात एक लाखाचा निधी मंजूर केला आहे. या कामासाठी १४ लाख २५ हजार रुपये लागणार आहेत.

पाच रुपये देऊनही जीव होतो नकोसा

0
0
पाच रुपये देऊनही मुख्य बसस्थानकाच्या सुलभ शौचालयात प्रवेश करताच, महिलांच्या अंगावर काटा येतो. दुर्गंधी, घाण, किळसवाणे वातावरण यामुळे गंभीर आजार होण्यीच भीती जास्त आहे. एसटी प्रशासनाचे मात्र इकडे दुर्लक्ष आहे. नियमबाह्य वसुली आणि वरून अस्वच्छता भरलेली, हा कुठला न्याय? असा सवाल प्रवासी करत आहेत.

गरज ५०० किडनींची, मिळतात २

0
0
गेल्या काही वर्षांत दोन्ही मूत्रपिंड निकामी (किडनी फेल्युअर) होण्याचे प्रमाण पाच पटींनी वाढले आहे. मराठवाड्यात या रुग्णांचे प्रमाण पाच हजारांपेक्षाही जास्त आहे. औरंगाबादेत महिन्याला ५०० ते १००० नवीन रुग्णांचे निदान होत आहे. दुसरीकडे, मूत्रपिंड उपलब्ध होत नसल्यामुळे प्रत्यारोपणाचे (ट्रान्स्प्लान्ट) प्रमाण दोन-तीन टक्क्यांच्याही खाली आले आहे.

‘स्पिल’वर ‘समांतर’चा उतारा

0
0
स्पिलओव्हरच्या कामांसंदर्भात नगरसेवकांच्या रागावर गुरुवारी (७ जुलै) आयुक्त आणि पदाधिकारी यांनी समांतर जलवाहिनीचा उतारा शोधून काढला. समांतर जलवाहिनीचे काम सुरू करून नाराज नगरसेवकांना शांत करण्याचा हा एक फंडा असल्याचे मानले जात आहे.

मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट

0
0
गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे विभागात भीषण दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विभागात असलेल्या ४२१ मंडळांपैकी १४५ महसुली मंडळांमध्ये केवळ २५ टक्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर ३३६ मंडळात आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

औरंगाबाद-जालना दरम्यान ‘ड्राय पोर्ट’

0
0
औरंगाबाद-जालना रस्त्यावर लवकरच १५ हजार कोटी रुपये खर्चून पाचशे एकरवर ‘ड्राय पोर्ट’ उभारले जाणार आहे. या ड्राय पोर्टमुळे मराठवाड्यातील शेतमाल आणि औद्योगिक उत्पादने थेट निर्यात करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

नांदेडवरील पाणीसंकट कायम

0
0
पावसाळा सुरू होऊन तीन महिने लोटले तरी विष्णुपुरी प्रकल्पाच्या कॅचमेंट परिसरात पाऊस झालेला नाही. परभणी जिल्ह्यातील दिग्रस बंधाऱ्यातून पाणी घेऊनही नांदेड शहर व जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

नगरसेवकांच्या उटी दौऱ्यावर टीका

0
0
नांदेड वाघाळा महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनासह अनेक गुत्तेदारांची देयकेही थकली आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या नगरसेवकांचा उटी या थंड हवेच्या ठिकाणाचा अभ्यास दौरा टीकेचा विषय झाला आहे.

दरोडेखोरांच्या टोळीला अटक

0
0
बिडकीनजवळील पांगरा रस्त्यावर एटीएम फोडण्याच्या तयारी असलेल्या ८ दरोडेखोरांच्या टोळीला गुरूवारी (७ ऑगस्ट) मध्यरात्री पकडले. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images