Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘डीएमआयसी’त गुंतवणूक

$
0
0
‘डीएमआयसी’ प्रकल्पासाठी अमेरिका, जर्मन आणि जपानच्या प्रत्येकी एका कंपनीने शेंद्रा येथील वाढीव औद्योगिक वसाहतीमध्ये जागा घेतली आहे. याशिवाय जर्मनीच्या आणखी दोन कंपन्या येऊ घातल्या आहेत, अशी माहिती एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी शनिवारी दिली.

भाजप, काँग्रेसला पर्याय तिसरी आघाडी

$
0
0
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे यूपीए सरकारचे दुसरे रूप आहे. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. थेट परकीय गुंतवणूक मुद्यावर या दोन्ही पक्षांची भूमिका सारखीच आहे.

पती-पत्नीला पोलिस कोठडी

$
0
0
सुपर पॉवर घोटाळ्यातील पती-पत्नीला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम .व्ही. भराडे यांनी १५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

भोई समाज संघातर्फे तीव्र निषेध

$
0
0
माजलगाव येथे भोई समाजातील मच्छिमारांवर ठेकेदारांने केलेल्या हल्ल्याचा अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघातर्फे निषेध करण्यात आला. खासगी ठेकेदारांनी मच्छिमारांवर हल्ला केल्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत.

प्राध्यापकांना दोन वेतनवाढी

$
0
0
१९८६ ते १९९६ या काळात सेवेत असताना पीएचडी पदवी प्राप्त केलेल्या महाविद्यालयीन शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. ए. एम. वदर यांनी दिला आहे.

जोमदार पिकांना पावसाची प्रतीक्षा

$
0
0
जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस पडल्यामुळे ९५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. काही तालुक्यात पाऊस कमी असून तिथे पेरणीचे प्रमाण घटले आहे. तसेच कडधान्याचे क्षेत्र कमी होऊन कापसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १८० मिलिमीटर पाऊस झाला असून खरीप पिकांसाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे.

विद्यार्थ्यांची समस्या, बसची मागणी

$
0
0
बसचा पास असुनही निधोना येथील सुमारे १५० विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. शाळेच्या वेळेत बस सोडण्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने विद्यार्थ्यांची कुचंबना होत आहे.

तात्काळ दुष्काळ जाहीर करा

$
0
0
‘मराठवाड्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचे पीक कर्ज, वीज बिल माफ करा,’ अशी मागणी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली. ते रविवारी (१० ऑगस्ट) परतूर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतिने आयोजित शेतकऱ्यांच्या बैलगाडी मोर्चासमोर बोलत होते.

बहिणीने दिला पुनर्जन्म

$
0
0
आईने जन्म दिला असला, तरी जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकल्यावर लहानग्या बहिणीने किडनी देऊन पुनर्जन्म दिल्याचे उदात्त उदाहरण याच शहरातील आहे. विशेष म्हणजे या बहिणीने वयाच्या २२ व्या वर्षी किडनी दिली आणि आता तर तिचा विवाह होऊन ती स्वतःच्या एका वर्षाच्या मुलीचा सांभाळ करीत समाज रक्षणाचे अर्थात पोलिस सेवेचे कार्य करीत आहे.

महिलांना ‘भविष्या’ची चिंता

$
0
0
पेन्शन मंजूर व्हावी यासाठी दाद मागण्यासाठी परभणीहून आलेल्या दहा वृद्ध महिलांची ऐन रक्षाबंधनादिवशी फरफट झाली. भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील रविवारी (१० ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेली अदालत रद्द झाल्याने त्यांना दाद मागता आली नाही.

‘किडनी ट्रान्सप्लान्ट’ आवाक्याबाहेरच

$
0
0
मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या (किडनी ट्रान्सप्लान्ट) शस्त्रक्रिया शहरात मोठ्या प्रमाणावर होत असल्या तरी त्या अजूनही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रियेसाठी औषधांसह दीड ते तीन लाखांपर्यंतचा खर्च येतो; शिवाय प्रत्येक पेशंटला नेहमीसाठी लागणाऱ्या औषधांसाठी ८ ते १२ हजारांपर्यंतचा खर्च येतो.

व्हॉटस् अॅपवर अनाठायी धडपड!

$
0
0
बहुतांश तरूण, नोकरदार, व्यावसायिक अनेकांकडे व्हॉटस् अॅपची सुविधा आली आहे. अनेकांना ते प्रतिष्ठेचे, तर अनेकांना अत्यंत उपयोगी असे वाटत आहे. मात्र, त्याच्या वापरात काही गोष्टी अनाठायी धडपड केल्यासारख्या आता वाटू लागल्या आहेत.

बडे मासे लागणार गळाला

$
0
0
महाराष्ट्रातील सर्व पक्षातील अनेक मोठे नेते भारतीय जनता पक्षामध्ये येण्यास इच्छुक आहेत. तशी बोलणी सुरू आहे आणि कोणकोणते नेते भाजपमध्ये येणार, हे पुढच्या आठवड्यात स्पष्ट होणार आहे, असा गौप्यस्फोट विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी रविवारी (१० ऑगस्ट) पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

राज्यातील पेट्रोल पंप बंद

$
0
0
पेट्रोलवरील स्थानिक कर कमी करून, राज्यातील किमती एकसमान करण्याच्या मागणीसाठी पेट्रोल पंप एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्यातील पेट्रोल पंप सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

‘कार्गो हब’साठी प्रतीक्षा

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्याच्या शेतीमालासाठी वरदान ठरू शकणारे विमानतळावरील ‘कार्गो हब’चे काम लवकरच सुरू होणार असून, पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत ही सुविधा सुरू होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतीमाल अन्य राज्यांसह परदेशामध्ये निर्यात करण्यासाठी हक्काचे माध्यम कार्यान्वित होणार आहे.

जगात कोठेही वाचा विद्यापीठातील पुस्तके

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी, प्राध्यापकांना विद्यापीठांच्या ग्रंथालयात असलेली ई-पुस्तके व नियतकालिके जगात कोठूनही पाहता, वाचता येणार आहेत. ग्रंथालयाने आपल्या विद्यार्थी, प्राध्यापकांना आता ‘रिमोट अॅक्सेस’ दिला आहे.

पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांची कुचंबणा

$
0
0
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सरकारकडून देण्यात येणारे २०१३ साठीचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे.

बिबट्याने पाडला घोडीचा फडशा

$
0
0
मुदखेड तालुक्यातील बारड वनपरीक्षेत्रातील डोंगरगाव शिवारात बिबट्याने ३ लाख रुपये किंमतीच्या घोडीचा फडशा पाडला. ही घटना रविवारी घडली. आतापर्यंत या बिबट्याने या परिसरातील २४ जनावरांवर हल्ला केला आहे.

विलासरावांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार

$
0
0
विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर विकासाची कामे थांबू देणार नाही असे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. पर्यटन राज्यमंत्री अमित देशमुख यांनी लातूरला महसूल खात्याचे आयुक्तालय निर्माण करण्याचे विलासरावांचे स्वप्न पूर्ण करण्याची मागणी त्यांच्या भाषणात केली होती.

पिके वाया जाण्याची भीती

$
0
0
बीड जिल्ह्यात यावर्षी पावसाळयाचे अडीच महिने संपले आहेत. त्यानंतरही केवळ सरासरीपेक्षा कमी म्हणजेच १४३ मिलि मीटर पाऊस पडलेला आहे. मात्र, पावसाअभावी जिल्ह्यातील हे खरीपाचे पीक संकटात आले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images