Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आठ तालुक्यांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

0
0
गेल्या तीन वर्षांपासून उस्मानाबादेत पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे जिल्ह्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील आठपैकी सात तालुक्यात सरासरीच्या २५ टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाला तर केवळ परंडा तालुक्यात ३१ टक्के इतका पाऊस झाला आहे.

हज यात्रेकरूंचे पहिले विमान सात सप्टेंबरला

0
0
सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या हज यात्रेसाठी या वर्षी औरंगाबाद विमानतळावरून पहिले विमान ७ सप्टेंबर रोजी उड्डाण करणार आहे. यंदा मराठवाडयात २४०० यात्रेकरू हजसाठी रवाना होणार आहेत.

सिंचन प्रश्नावर कोंडी कायम

0
0
मंजूर करून दोन दिवसांत रद्द केलेल्या २८ प्रशासकीय मान्यतांची माहिती लेखी स्वरुपात द्यावी, या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्यांनी सोमवारी (११ ऑगस्ट) सलग तिसऱ्या दिवशी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले.

ध्यास वेदनामुक्तीचा !

0
0
शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग करिअर करण्याची संधी उपलब्ध झालेली असताना वडिलांच्या आजारामुळे अॅक्युप्रेशर थेरपी या उपचार पद्धतीत त्यांनी मास्टर्स डिग्री संपादन केली. या थेरपीचा उपयोग करून हजारो लोकांना वेदनामुक्त करण्याची अवगत झालेली कला हीच त्यांची जीवनशैली बनली.

‘डीएमआयसी’ला गायरानाचा खोडा

0
0
दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) भूसंपादनाला आता गायरान जमिनीने खोडा घातला आहे. प्रकल्पासाठी वर्ग १ च्या जमिनींचे भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे, मात्र सरकारनेच दिलेल्या गायरान (वर्ग २) जमिनींचे लोकांत परस्पर खरेदी विक्री व्यवहार झाले आहेत.

प्रत्यारोपण वाढू शकते दुपटीने

0
0
मुळात किडनी दात्यांची संख्या कमी असताना आणि त्यातही दात्यांची किडनी जुळण्याचा प्रश्न पुन्हा वेगळाच असताना ‘कॅडेव्हर ट्रान्सप्लान्ट’ हा एक सक्षम मार्ग ठरतो, मात्र त्यासाठी अत्यावश्यक असणारी ‘झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन कमिटी’ (झेडटीसीसी) कार्यरत नसल्याने प्रत्यारोपणाचा हा मार्ग पूर्णपणे बंदच होता.

वाळू साठ्यात ‌कुणाचा वाटा?

0
0
वाळुची साठेबाजी करण्यावर बंदी असताना शहर आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सर्रास साठेबाजी सुरू आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी वाळू साठेबाजांविरूद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले, मात्र या आदेशांवर फक्त पंचनाम्याचे सोपस्कर करण्यात आले.

...अन् ज्येष्ठ झाले त्रस्त !

0
0
‘केंद्र सरकारने औषधाच्या किंमती कमी केल्या. मधुमेह, ह्रदयरोग, कॅन्सरच्या पेशंटना दिलासा. महागडी औषधी झाली स्वस्त.’ अशा बातम्या वाचल्या आणि ऐकून खूप बरे वाटले. प्रत्यक्षात याची अंमलबजावणी नाहीच.

पोलिसांचा निर्णय झाल्यावर एसटी महामंडळात आरक्षण

0
0
पोलिस विभागाकडून भरतीमध्ये पोलिसांच्या मुलांसाठी दहा टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. त्याविभागाकडून निर्णय घेतल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी केली.

१५ ऑगस्टपूर्वी २५० कोटी

0
0
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतनकरारातील तफावतीचे सुमारे अडीचशे कोटी रुपये १५ ऑगस्टपूर्वी वाटप करण्यात येतील, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी दिली.

मतदारांना दिसणार केलेले मतदान

0
0
यंदा विधानसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यासह अमरावती, नाशिक व नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रिंटरचा वापर करण्यात येणार असून, यामुळे मतदारांना आपण कुणाला मतदान केले, हे दिसणार आहे.

पालिकेवर कर्जाचा डोंगर, नव्या कामांना कात्री

0
0
मंजूर असलेली विकास कामे होत नाही, ठराविक नगरसेवकांच्या वॉर्डात कामे होतात, स्पिलओव्हरची कामे करण्याची करण्याची मागणी नगरसेवकांनी करताच महापालिकेवर कर्ज व देणी वाढत असून, आपण उत्पन्नवाढीमध्ये कमी पडत आहोत.

विद्यापीठ करणार कॉलेजांची तपासणी

0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पुन्हा कॉलेजांची तपासणी करणार आहे. कुलगुरू, कुलसचिव, बीसीयूडी यांच्या नेतृत्वाखाली असलेली कमिटी ही तपासणी करेल. यात कॉलेजांमधील सोयी-सुविधांपासून ते विद्यार्थी, रिक्त जागांचा आढावा घेतला जाणार आहे.

बंद पथदिव्यांवरून गोंधळ

0
0
सिडको आणि शहरातील काही भागांमध्ये बीओटीवर उभारण्यात आलेल्या पथदिव्यांची अवस्था अत्यंत वाईट असून, बहुतांश दिवे बंद असतात. मे महिन्यामध्ये कंत्राट संपले आहे.

अखेर ‘ZTCC’ला मिळाला अध्यक्ष

0
0
‘कॅडेव्हर ट्रान्सप्लान्ट’ अर्थात ‘ब्रेन डेड’ रुग्णांच्या अवयव दानातून केल्या जाणाऱ्या प्रत्यारोपणासाठीच्या ‘झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन कमिटी’ला (झेडटीसीसी) अखेर अध्यक्ष मिळाला आहे.

शहराची ‘ढकलगाडी’

0
0
‘समान कर, समान दर’ या मागणीसाठी पेट्रोल पंप चोवीस तास बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे शहरातील वाहनचालकांची चांगलीच फरफट झाली. बहुतेक पंपचालक या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते, तर याचा फायदा रिक्षा चालकांनी उचलला.

KBC, सुपरनंतर धनदाचा घपला?

0
0
‘केबीसी’, ‘सुपर पॉवर’प्रमाणे शहरातील नागरिकांना पुण्याच्या धनदा होल्डिंग प्रा. लि या कंपनीने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.

...तिरंगा फडकत ठेऊ नभांगणी !

0
0
मराठवाड्यात तयार झालेले राष्ट्रध्वज स्वातंत्र्यदिनी देशभर फडकणार आहेत. खादी ग्रामोद्योग भांडारातून आतापर्यंत सुमारे पन्नास लाख ध्वज विक्रीसाठी पाठविण्यात आले आहेत. वर्षभरात जवळपास एक कोटी रुपयांच्या राष्ट्रध्वजांची विक्री होते.

आईने दिली मुलाला किडनी

0
0
वयाच्या २८व्या वर्षी विवाह झाला असताना अचानक दोन्ही किडनी निकामी झाल्याचे स्पष्ट झाले, मात्र पोटच्या गोळ्याचे दुःख आई पाहू शकली नाही आणि तिने किडनी देण्याचा निर्णय मोठ्या हिमतीने प्रत्यक्षात आणला. आता त्यांनी स्वतःचा शेती-व्यवसायही पूर्ववत सुरू केला आहे.

हृदयाची हृदयावर निराळी मात

0
0
अवयव दान व अवयव प्रत्यारोपणासाठी अजूनही फारसा पुढाकार न घेणाऱ्या याच आपल्या समाजामध्ये अनेकांच्या यशकथा मात्र खूपच प्रेरणादायी आहेत. या सगळ्याच अवयव दात्यांनी आणि अवयव प्राप्त करणाऱ्यांनी सगळे गैरसमज दूर करीत आपले आपले स्वतःचे आयुष्य पुन्हा एकदा हिमतीने उभे केले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images