Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्राणिसंग्रहालयाचा प्लान मंजूर

$
0
0
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाच्या मास्टरप्लानला सेंट्रल झू अॅथाॅरिटीने मंजुरी दिली. मंजुरीचे पत्र येत्या दोन-तीन दिवसांत महापालिकेला प्राप्त होईल. मास्टरप्लानमुळे १४ एकरांचे प्राणिसंग्रहालय ३४ एकरांचे होणार आहे.

पर्यटन व्यवसायात ‘कोकण मॉडेल’

$
0
0
जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाच्या बळकटीकरणासाठी कोकणच्या धर्तीवर ‘निवास-न्याहारी’ योजना सुरू करण्यात आली आहे. अजिंठा व सोयगाव येथे प्रायोगिक तत्त्वावर राबवलेल्या या योजनेला पर्यटकांचा प्रतिसाद मिळाला आहे.

महिला संशयितांना अवैध कोठडी

$
0
0
एसटीमध्ये पर्स चोरीच्या प्रकरणात प्रवाशांनी चार महिलांना पकडून मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या प्रकरणी तक्रार अथवा नोंद न घेता प्रवासी महिलेला दागिने देऊन रवाना करण्यात आले. मात्र, चार संशयित महिला आरोपींना मात्र रात्रभर पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले.

पालिकेला नागरिकांचा ठेंगा

$
0
0
मालमत्ता कर वसुलीपोटी जमा करण्यात आलेल्या चेकपैकी सुमारे एक कोटी रुपये किंमतीचे चेक वटले नव्हते. हे चेक कॅश करण्यासाठी महापालिकेच्या कर वसुली विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेनंतरही पन्नास लाख रुपये किंमतीचे चेक वटलेच नाहीत.

परतीच्या पावसावरच रब्बीचे भवितव्य

$
0
0
वरुण राजाच्या अवकृपेने यंदा खरिपापाठोपाठ रब्बीबाबत देखील साशंकता व्यक्त केली जात आहे. परतीच्या पावासावरच रब्बी हंगामाचे भवितव्य अवलंबून आहे. ११ ऑगस्टअखेर जिल्ह्यात सरासरी १६५ मिलि मीटर इतका पाऊस झाला आहे.

लाच घेताना महिला सरपंच, रोजगार सेवकास अटक

$
0
0
रोहयो अंतर्गतच्या रस्ता कामाचे दोन लाख रुपयांचे पेमेंट काढण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना इजोरा (ता. वाशी) येथील महिला सरपंच व रोजगार सेवकास अटक करण्यात आली. या प्रकरणी वाशी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यात काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा काँग्रेस समितीने इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी ४२ जणांनी उमेदवारी मागितली आहे. निलंगा मतदारसंघातून यावेळी माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी उमेदवारी मागितली नाही.

आरक्षणासाठी उद्या चक्काजाम

$
0
0
धनगर समजाचा अनुसुचित जमातीच्या आरक्षणाचे आंदोलन थंड करण्यासाठी राज्य सरकारने फसवी घोषणा केली आहे. त्याचा निषेध करण्यात आला असून १४ ऑगस्ट रोजी राज्यात चक्काजाम आंदोलन करणारच असल्याची माहिती लातूर जिल्हा धनगर आरक्षण कृती समितीचे नेते श्रीरंग शेवाळे यांनी दिली.

निवडणुकीसाठी नवा ‘नांदेड पॅटर्न’

$
0
0
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २0१४ मध्ये निवडणूक प्रक्रियेत नांदेड जिल्हा निवडणूक यंत्रणेने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्यामुळेच भारत निवडणूक आयोगाच्या 'बेस्ट इलेक्ट्रोरोल प्रॅक्टिसेस' अर्थात उत्कृष्ट निवडणूक कार्यक्रम अंमलबजावणीसाठीच्या नामांकनात नांदेडच्या तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर या प्रकारात निवड करण्यात आली.

वैधानिक विकास मंडळांना मिळणार शंभर कोटी

$
0
0
राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर अनेक निर्णय घेण्याची घाई सुरू केली आहे. जे वैधानिक विकास मंडळे मोडीत काढण्याची तयारी गेल्या काही वर्षापूर्वी सरकारने सुरू केली होती.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दोन तास ठिय्या

$
0
0
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेतर्फे तालुक्यातील अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी (१३ ऑगस्ट) पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

राष्ट्रवादी मतदारसंघावर काँग्रेस इच्छुकांची नजर

$
0
0
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. परंतु या मतदारसंघावर काँग्रसमधील इच्छुकांची नजर आहे. जागा वाटपात वैजापूर व मध्य मतदारसंघाची अदलाबदल होण्याची शक्यता असल्याने १९ इच्छुकांनी मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

नोंदणीला थंड प्रतिसाद

$
0
0
संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेला थंड प्रतिसाद असून २७ जुलैपासून आतापर्यंत केवळ पाच हजार ३६६ मतदारांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर प्रत्येक रविवारी ही मोहीम राबविली जात आहे.

प्राचार्या पोलिस ठाण्यांत

$
0
0
जीवे मारण्याची धमकी आणि अश्लील शिवीगाळप्रकरणी राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके यांनी बुधवारी (१३ ऑगस्ट) पोलिस ठाण्यात धाव घेतली. जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले.

चुकीची शिक्षा होणारच

$
0
0
जिल्हा परिषदेतील सिंचन विभागात गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरण तापले आहे. जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या पाच कोटींच्या निधीवर डोळा ठेवून अधिकारी आणि निवडक सदस्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले.

मुख्याध्यापिकेला सासरी पेटवून मारण्याचा प्रयत्न

$
0
0
एका शाळेच्या मुख्यध्यापिकेचा सासरच्या मंडळीनी विविध कारणावरून छळ करीत पेटवून देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.सिडको एन-८ भागातील रॉयल कॉलनीत ६ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेबद्दल सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपअभियंत्याला लुबाडणारे ठेकेदार गजाआड

$
0
0
जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्याला मारहाण करून लु‌बाडणाऱ्या दोन ठेकेदारांना क्रांती चौक पोलिसांनी बुधवारी (१३ ऑगस्ट) सकाळी ताब्यात घेतले आहे. यापैकी एक आरोपी झेरॉक्स आणण्याचा बहाणा करीत वडिलांसोबत पसार झाला. पण पोलिसांनी दबाव आणताच तो दीड तासात शरण आला.

...हा खेळ विजेशी !

$
0
0
वीज वितरण योग्य पद्धतीने करण्यासाठी जीवावर उदार होऊन महापारेषणचे कर्मचारी कायम दक्ष असतात. हर्सूल उपकेंद्रातील हॉट लाइन टीमही दक्ष असते. ‘सचेत तारामार्ग दुरुस्ती पथक’ अशी या टीमची ओळख.

उमाप टोळीला दोन दिवस पोलिस कोठडी

$
0
0
बँक फोडणाऱ्या उमाप टोळीला बुधवारी (१३ ऑगस्ट) कोर्टापुढे हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या टोळीबाबतची माहिती इतर राज्यांना देण्यात आली आहे. ही टोळी शहरात कशासाठी आली होती याचा तपास करण्यात येत आहे.

मराठवाड्याच्या खासदारांची दांडी

$
0
0
महाराष्ट्रातील उद्योगांच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज (सीआयआय) च्या राज्यशाखेने मंगळवारी (१२ ऑगस्ट) दिल्लीत महाराष्ट्रातील खासदारांची बैठक बोलाविली होती.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images