Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

एसी बस खरेदीला एसटीचाच खोडा

$
0
0
शहरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना पर्यटनासाठी वातानुकूलित (एसी) बस सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून एक कोटी ८० लाख रुपयांचा धनादेश चार महिन्यांपूर्वीच दिला, तरीही महामंडळाच्या गलथान कारभारामुळे अद्यापही पर्यटकांसाठी नवीन एसी बस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही.

१३६ कोटींचा गोठा !

$
0
0
चिकलठाणा शिवारातील गोठ्याच्या जागेच्या विकासासाठी महापालिकेने आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. आराखडा तयार झाल्यावर ती जागा विकसित कशी करायची, याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.

दलित वस्ती सुधारणेसाठी भोपळा

$
0
0
नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी राज्य सरकारने १७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असताना, औरंगाबादसाठी छदामही देण्यात आलेला नाही. औरंगाबाद महापालिकेच्या क्षेत्रामध्ये शासनमान्य ५२ झोपडपट्ट्या असतानाही, नगरविकास खात्याच्या अध्यादेशामध्ये काहीच तरतूद करण्यात आलेली नाही.

‘समांतरवाल्यां’चे लक्ष गळत्यांवर

$
0
0
समांतर जलवाहिनीचे काम एक सप्टेंबरपासून सुरू होणार असून, ‘समांतर’च्या कंत्राटदारांनी गळत्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. जलवाहिन्यांमधून होणारी गळती थांबवण्याला त्यांचे प्राधान्य असणार आहे.

गुणवंतांना मदतीचा हात

$
0
0
बिकट परिस्थितीतही शैक्षणिक आलेख कायम उंचावत ठेवणारे औरंगाबादमधील चार निवडक हिरे ‘मटा’ने यंदा निवडले आणि त्यांची यशोगाथा समाजापुढे आणली. तसेच, त्यांना मदत करण्याचे आवाहनही केले.

सफारी गाडीतला दरोडेखोर अटकेत

$
0
0
घनसांवगी ता. अंबड येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकून पसार झालेल्या मुख्य सूत्रधाराला गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (१३ ऑगस्ट) दुपारी लेबर कॉलनी परिसरातून अटक करण्यात आली.

जागो रे जागो रे जागो रे....

$
0
0
१५ ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. आजच्या तरुणपिढीला स्वातंत्र्यदिनाबद्दल काहीच वाटत नाही, असा सूर अनेकदा काढला जातो. मात्र, या तरुणांना देशाच्या स्वातंत्र्यदिनाविषयी काय वाटते?

चारा, पाणी पुरवण्याचे आव्हान

$
0
0
राज्य सरकारने १२३ तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिति जाहीर केली आहे. यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात यंदा पावसाअभावी दुष्काळी संकट गडद झाले आहे. पावसाळ्याचे अडीच महिने सरले तरी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या २२ टक्के पाऊस पडलेला आहे.

बँकांकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची लूट

$
0
0
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हे बिगर व्याजी देण्यात येत असल्याचा गवगवा राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून केला जात आहे. मात्र, राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना १२ टक्के व्याजदर आकारत असल्याचे दिसून येते.

वाळू तस्कराची तलाठ्याच्या अंगावर गाडी

$
0
0
चोरटी वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक अडवणाऱ्या तहसील कार्यालयाच्या पथकातील तलाठी ज्ञानेश्वर क्षीरसागर यांच्या अंगावर स्कॉर्पिओ गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हायवा ट्रकचा चालक व मालक फरार झाले आहेत.

रिक्षांचे भाडे अव्वाच्या सव्वा

$
0
0
रिक्षाचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत आहेत. प्रत्येक रिक्षांना सक्तीने इल्येक्ट्रॉनिक मीटर बसवण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. या नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचे याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे.

झालर आराखडा रद्द

$
0
0
औरंगाबादचा विस्तार लक्षात घेता २००६मध्ये सिडकोने झालर आराखडा प्रसिद्ध केला. त्यात २८ गावांतील भूखंडावर चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकले. या अन्यायाविरोधात गावकऱ्यांनी एकत्र येऊन दंड थोपटले.

पुस्तकांसाठी झेलल्या लाठ्या!

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. ज्या महामानवाचं नाव विद्यापीठाला, ते नाव मिळावं यासाठी लढा लढावा लागला. या महामानवाचं पुस्तकांवर जीवापाड प्रेम, त्या पुस्तकांसाठीही विद्यापीठात विद्यार्थ्यांना लढा उभारावा लागला. हा विलक्षण योगायोग.

पाण्यासाठी १२ वर्षे जीवघेणा लढा!

$
0
0
पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल एक तप दिलेल्या जीवघेण्या लढ्याची आठवण, आजही पुंडलिकनगरवासीयांच्या अंगावर शहारे आणते. या घटनेलाही २४ वर्ष लोटली. आजही पाण्यासाठी झगडा सुरूच असतो.

जकातीसाठी हालचाली सुरू

$
0
0
स्थानिक संस्थाकराऐवजी (एलबीटी) जकात कर पुन्हा लागू करावा, यासाठी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याच्या हालचाली महापालिकेत सुरू झाल्या आहेत.

प्री-पेड रिक्षाकडे प्रवाशांची पाठ

$
0
0
प्रवाशांच्या सोयीसाठी औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकासमोर प्री-पेड रिक्षा केंद्र सुरू करण्यात आले होते, मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ही सेवा बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर रेल्वे स्टेशनवरील प्री-पेड रिक्षांनाही फारसा प्रतिसाद मिळत नाही.

टंचाईच्या नावाने केवळ मलमट्टीच

$
0
0
मराठवाड्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. पिके वाया गेली. शेतकरी आत्महत्या करत आहेत, मात्र शासनाने दुष्काळ जाहीर करण्याएेवजी केवळ टंचाईसदृष्य स्थिती जाहीर करून वरवरची मलमपट्टी केली आहे.

दुसऱ्याचे जीवन फुलवा...

$
0
0
‘चांगले काम करण्याची संधी सर्वांनाच मिळत नाही. त्यामुळे चांगले काम करा. दुसऱ्यांचे जीवन फुलवा, तुमचेही जीवन फुलत राहील,’ असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी गुरुवारी (१४ ऑगस्ट) केले.

तिरंग्याच्या निर्मितीत साथ

$
0
0
भारताच्या राष्ट्रध्वज निर्मितीत लातूर जिल्ह्याचा सहभाग अभिमानास्पद आहे. औसा, किनगाव, हडोळती, उदगीर, नांदेड ही मराठवाड्यातील गावे तिरंग्याच्या निर्मितीस हातभार लावतात. देशभर वितरित होणारे राष्ट्रध्वज मराठवाड्यातून रवाना होतात.

‘इबोला’साठी पालिका सतर्क

$
0
0
‘इबोला’ या आजाराने दार ठोठावल्यानंतर महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. हा आजार आपल्याकडे येऊ नये यासाठी दक्षता घेण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व मौलाना आझाद महाविद्यालयाला पत्र लिहून आफ्रिकन विद्यार्थ्यांनी माहिती मागवली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images