Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बजाजमध्ये ऑक्टोबरपूर्वीच दिवाळी

0
0
वाढती महागाई लक्षात घेता चाकणच्या धर्तीवर घसघशीत वेतन वाढ मिळावी, अशी मागणी बजाज अॅटो कंपनीच्या कामगारांनी केली आहे. वेतन करार जुलै महिन्यातच संपला असून नवीन करारबाबत कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटनेत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत.

अशोक उजळंबकर यांना पुरस्कार

0
0
पुणे येथील आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठाणतर्फे ज्येष्ठ सिनेसमीक्षक अशोक उजळंबकर यांना ‘चित्रकर्मी आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुण्यात नुकताच हास्य-विनोद-आनंद महोत्सव पार पडला.

निसर्ग भ्रमणात विकेण्ड साजरा

0
0
चार दिवस लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे औरंगाबादकरांनी हा विकेण्ड निसर्ग भ्रमणात घालवला. या चार दिवसात शहरात पाऊस नसला तरी डोंगरमाथा, म्हैसमाळ, गोगाबाबा टेकडी या परिसरातील पावसाच्या हजेरीने औरंगाबादकर सुखावले. काही युवकांनी, कुटुंबासह पश्चिम महाराष्ट्र व नाशिक परिसरात जाणे पसंत केले.

खैरेंच्या भूमिकेवरून पदाधिकाऱ्यांची कोंडी

0
0
महापालिकेा हद्दीत जकात कर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्याच्या मागणीवरून पालिकेतील पदाधिकाऱ्यांची स्थिती ‘तळात- मळ्यात’ अशी झाली आहे. खासदार चंद्रकांत खैरे यानी एलबीटीला पाठिंबा दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांसमोर यक्षप्रश्न उपस्थित झाला आहे.

‘हाडा’चा सेवक!

0
0
हाडाचा कुठलाही विकार असो. साताऱ्यातील आसाराम पारखे त्यावर उपाय करतात. वयाच्या १८ व्या वर्षांपासून त्यांनी रुग्णसेवेचे हे व्रत हाती घेतले, ते आज वयाच्या ८२ व्या वर्षीही न थकता, कसलाही मोबदला न घेता सुरू आहे.

बांधकाम बंदी धाब्यावर

0
0
जिल्हा प्रशासनाने २३ जुलैला जाहीर केलेली बांधकाम बंदी धाब्यावर बसवत, सातारा आणि देवळाई परिसरात सर्रास बांधकामे सुरू आहेत. पाणीटंचाईमुळे सध्या सातारा गावात ९, तर देवळाईमध्ये ४ टँकर सुरू आहेत.

उत्सवाचे अखंड भरते!

0
0
विठ्ठलनगर, एन २ परिसरातील म्हाडा कॉलनी. धार्मिक आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम इथे वर्षभर केले जाते. विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमातून सामाजिक समरसता जपण्याचा प्रयत्न इथले कॉलनीवासीय करतात. सुखाने नांदणारी ही कॉलनी, एकता अभंग ठेवण्यासाठी सदोदित पुढे असते.

गुरू गोविंदाने मारली बाजी

0
0
निरालाबाजार चौकात राजगौरव प्रतिष्ठानने आयोजित केलेली दहीहंडी सात थर लावत, गुरू गोविंदा पथकाने फोडली. एकूण तेरा गोविंदा पथकांना सलामीची संधी देण्यात आली. रात्री दहाच्या वेळेचे बंधन असल्याने क्रेनवर बांधलेली हंडी खाली उतरविण्यात आली.

पथकांनी झुगारले कोर्टाचे नियम

0
0
डांबरी रस्त्यावर चिमरड्यांचे थरावर थर. ना डोक्याला हेल्मेट, ना खाली अंथरलेल्या गाद्या. पाहणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप. जीव मुठीत आणि सुरक्षिततेसाठी कसलिही उपाययोजना नाही; असे चित्र शहरातल्या बुहेतक दहीहंडी महोत्सवात होते.

‘मत’मोराचा कसा पिसारा फुलला

0
0
अगदी असेच मतांचे लोणी खाण्यासाठी विधानसभेतल्या इच्छुक उमेदवारांनी, सोमवारी दहीहंडीचे निमित्त साधत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यात कॉँग्रेसपासून राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि मनसे उमेदवार एकाच रांगेत होते.

गोविंदा रे गोपाळा; धत्तड-तत्तड

0
0
पाच, सहा, सात असे थरावर थर. दुपारपासून सायंकाळपर्यंत गोविंदा पथकांची सलामी. ढोलताशांचा ‘धत्तड, तत्तड’ असा उत्साह जागविणारा आवाज. डॉल्बीवर सुरू असलेले ‘गोविंदा रे गोपाळा.’ कॅनॉट परिसरातील स्वाभिमानी मंडळाच्या दहीहंडीत हे सारे होते.

शिटी वाजली अन् हंडी फुटली

0
0
‘शिटी वाजली गाडी सुटली’ या गाण्यावर बेफाम नाच करीत गोविंदा पथकांनी दहीहंडी महोत्सवात रंगत आणली. पुंडलिकनगर चौकात भवानीनगर मित्रमंडळ पथकाने ‘नमो’ दहीहंडी फोडली. शहरातील नावाजलेल्या गोविंदा पथकांची सलामी पाहण्यासाठी गारखेडा भागातील नागरिकांनी तुडूंब गर्दी केली.

नव्या बदलाचे वारे

0
0
कोणताही देश, विभागाच्या सामाजिक, आर्थिक विकासात शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा असतो. उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ पुरविण्याची जबाबदारी, ही मुख्यत्वे शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून असते.

स्पर्धा परीक्षेत वाढता सहभाग

0
0
अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षेमध्ये युवकांचा सहभाग व उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच युवकांचा स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग जास्तीत जास्त प्रमाणात देशपातळीवर वाढवा म्हणून प्रीआयएस सेंटरसारख्या अनेक संस्था प्रयत्नशील आहेत.

डीएमआयसीला पूरक शिक्षण

0
0
एमआयडीसीकडून डीएमआयसीकडे जाताना टेक्निकल एज्युकेशनमध्ये आऊटकम बेस्ड् एज्युकेशनला पर्याय नाही. येथील प्रकल्पांमध्ये ८० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

प्रस्ताव पाठवा, पाठपुरावा करू

0
0
अत्यल्प पाऊस पडल्यामुळे मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून मदतीसाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा.

सर्वेक्षण नाही, खर्च ६७ लाख

0
0
सोलापूर-जळगाव ४५० ‌किलोमीटर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण करून, यावर ६७ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती रेल्वे अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. मात्र, या रेल्वेमार्गाचे कोणतेही सर्वेक्षण झाले नसल्याचे माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या उत्तरात स्पष्ट झाले.

मीटरचा ५६ कोटींचा गंडा

0
0
समांतर जलवाहिनी योजनेअंतर्गत घरोघरी बसवण्यात येणाऱ्या मीटरमुळे शहरातील नागरिकांना तब्बल ५६ कोटी रुपयांचा गंडा घातला जाणार आहे. ‘पीपीपी’ योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या खर्चाच्या तपशिलातही या ५६ कोटी रुपयांचा समावेश असल्यामुळे मीटरच्या माध्यमातून कंत्राटदाराचाच खिसा गरम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंकजा यांच्या नेतृत्वाची कसोटी

0
0
बीड म्हटले की गोपीनाथ मुंडे हे सूत्र ४०-४५ वर्षे राज्याच्या राजकारणात ओळखले जात होते. मात्र, जूनमध्ये गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीत अपघाती मृत्यू झाला आणि या घटनेने बीडच्याच नव्हे; तर राज्याच्या राजकारणाला नव्या वळणार नेऊन ठेवले.

बीडमधून मुंडेची दुसरी कन्या लढणार?

0
0
भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांची द्वितीय कन्या डॉ. प्रीतम मुंडे-खाडे या बीडमधून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. या वृत्ताला भाजप वर्तुळातून दुजोरा देण्यात आला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images