Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

राष्ट्रवादीला हव्यात आता पाच जागा

$
0
0
येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला किमान पाच जागा सोडवून घ्याव्यात. त्या सर्व जागा निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यासह जिल्ह्यातील पक्षाचे सर्व नेते स्वीकारतील, असा दावा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कुंटूरकर यांनी केले.

चिखलीकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जिल्ह्यात नवी समीकरणे

$
0
0
कंधार - लोहा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासमवेत कंधारच्या नगराध्यक्षा अनुसया केंद्रे, जिल्हा परिषदेचे सभापती प्रवीण पाटील यांनीही पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधनाचा धागा बांधला.

लातूरमध्ये अंनिसची मानवी साखळी

$
0
0
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांची हत्या करणारे खुनी आणि खुनामागचे सुत्रधार अद्यापही पोलिसांनी सापडले नाहीत.

नांदेड सेफ सिटी प्रकल्पाचे उद्या लोकार्पण

$
0
0
जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपुर्ण योजनेअंतर्गत नांदेड महापालिकेने पोलिस दलासाठी साकारलेल्या सेफ सिटी प्रकल्पाचे लोकार्पण गुरुवारी (२१ ऑगस्ट) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.

उस्मानाबाद उपक्रेंद्रात आता ‘कमवा व शिका’

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राबविण्यात येणारी ‘कमवा व शिका’ योजना आता उस्मानाबाद येथील उपकेंद्रातही राबविण्यात येणार आहे. हा प्रयोग पहिल्यांदाच प्रायोगिक पद्धतीवर राबविला जात आहे.

दुष्काळी तालुक्यात बीडवर अन्याय

$
0
0
राज्य सरकारने १२३ तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली, याचा शासन आदेश मंगळवारी काढण्यात आला. यामध्ये बीड जिल्ह्यावर अन्याय झाला आहे.

नायब तहसीलदारांची ज्येष्ठता यादी करणार

$
0
0
लोकसेवा आयोगामार्फत निवडण्यात आलेल्या ३३ टक्के नायब तहसीलदारांची राज्यस्तरावर ज्येष्ठता यादी तयार केली जाईल, असे आश्वासन महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनी दिले आहे.

मराठवाड्याची भिस्त परतीच्या पावसावर

$
0
0
यंदाच्या पावसाळ्यात मराठवाड्यात अंत्यत कमी पाऊस पडला आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यातील अपवाद वगळता एकही दमदार पाऊस झाला नाही. या परिस्थितीत दुष्काळाच्या छायेतील मराठवाड्याची भिस्त आता परतीच्या पावसावरच आहे.

सरकारने शेतकऱ्यांना नागवले

$
0
0
‘तीन वर्षापासून निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, परंतु राज्य सरकारने शेतकऱ्यांना उभारी देण्याऐवजी नागवले आहे,’ असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आबांच्या कार्यक्रमांकडे वाघचौरे विरोधकांची पाठ

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार संजय वाघचौरे यांच्याविरोधकांनी मंगळवारी (१९ ऑगस्ट) गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तालुक्यातील कार्यक्रमांवर अघोषित बहिष्कार टाकला. यामुळे आमदार वाघचौरे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

अंधश्रद्धेविरोधात अलोकनगरात जागर

$
0
0
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आघाडीवर असलेली कॉलनी म्हणजे अलोकनगर. विज्ञानयुगातील सुशिक्षित वर्गही अंधश्रद्धेला बळी पडतो. त्यासाठी साताऱ्यातल्या या कॉलनीत अखंड जागर सुरू असतो. जादूटोणा, पैसे दुप्पट करून देणे आदी प्रकारांना नागरिक बळी पडू नयेत, यासाठी वेगवेगळी व्याख्याने, कार्यक्रमांचे आयोजन येथे केले जाते.

महिला तस्करीचा चंबळ खाेऱ्यात पर्दाफाश

$
0
0
चक्क चारवेळेस मरणाच्या दारातून परत येत जालन्याच्या बहाद्दर पोलिसांनी, महिलांची परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. मध्यप्रदेशातील चंबलच्या खोऱ्यात जाऊन हे शौर्य गाजवले.

साताऱ्यातील समस्या सोडविण्याचे आश्वासन

$
0
0
साताऱ्यात पाणी, रस्ते, ड्रेनेज, क्रीडांगण, आरोग्य केंद्र आदी समस्या समस्या आहेत. परिसराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता समांतर जलवाहिनीतून पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले आहे.

दुष्काळ जाहीर करा, जायकवाडीत पाणी सोडा

$
0
0
मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा, नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या धरणातून जायकवाडीमध्ये तात्काळ पाणी सोडा, अशा मागणीचा ठराव मंगळवारी (१९ ऑगस्ट) जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

श्री घृष्णेश्वर मंदिरात बॅग, मोबाइलवर बंदी

$
0
0
श्रावण महिन्यात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिराच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे. मंदिरात मोबाइल फोन, बॅग, कॅमेरा घेऊन जाण्यास मंगळवारपासून (१९ ऑगस्ट) बंदी करण्यात आली आहे.

एटीएम व्यवहाराची खिशाला झळ

$
0
0
एटीएममधून पैसे काढणार असाल, तर सावधान. नक्कीच विनाकारण तुमच्या खिशाला वीस रुपयांचा भुर्दंड बसू शकतो, कारण आता होमबँकेच्या एटीएम व्यतिरिक्त इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून फक्त तीनवेळाच पैसे काढता येतील.

अभ्यासाच्या तणावामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

$
0
0
समतानगरमध्ये राहणाऱ्या कोमल चंद्रकांत चव्हाण (वय २१, रा. जातेगाव, ता. गेवराई, जि. बीड) या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (१८ ऑगस्ट) उघडकीस आली. डी. एड्. चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती येथे टीईटीचे क्लास करत होती.

विद्यार्थ्यांना बॉम्बशोधक पथकाची ओळख

$
0
0
श्री सरस्वती भुवन प्रशालेच्या पूर्व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना बाँबस्फोट व दहशतवाद या विषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. बाँबशोधक व नाशक पथकाचे सुशील जुमडे यांनी विद्यार्थ्यांना याची माहिती सांगितली.

अपिलावर निर्णयापूर्वीच ‘समांतर’साठी घाई

$
0
0
शासनाकडे दाखल करण्यात आलेल्या अपिलावर निर्णय होण्यापूर्वीच महापालिकेने समांतर जलवाहिनीच्या भूमिपूजनाचा घाट घातला आहे. त्यामुळे त्रुटी काय ठेवून समांतर जलवाहिनीची योजना पूर्ण केली जाणार का?

दुष्काळाच्या मागणीसाठी भाजपचा शुक्रवारी मोर्चा

$
0
0
अपुऱ्या पावसामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मराठवाड्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून ठोस उपाययोजना आखण्यात याव्यात, यांसह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी (२२ ऑगस्ट) विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, आमदार पंकजा पालवे मुंडे यांनी दिली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images