Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

परभणी, हिंगोलीत दमदार पाऊस

0
0
परभणी हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी स‌‌काळी दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परभणी शहरात दिवसभर ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नाही.

नांदेड जिल्ह्यात मान्सून दमदार

0
0
नांदेड जिल्ह्यात आज मृग नक्षत्रापूर्वीच सकाळी सहा ते सातच्या दरम्यान जोरदार मान्सून कोसळला. विजेच्या गडगडाटासह धो-धो कोसळलेल्या या पावसाने शेतकरी सुखावला आहे.

लातूर जिल्ह्यात दमदार पाऊस

0
0
एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मराठ‍वाड्यात पूर्व मोसमी पावसाच्या सरींनी दमदार हजेरी लावली. नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनापूर्वी मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३.३५ टक्के पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ८९.२३ टक्के आहे.

उस्मानाबादकर तहानलेलेच!

0
0
उस्मानाबाद शहरवासीयांची तहान अद्यापही कायम आहे. उस्मानाबाद शहरात उजनीहून दररोज ८० लाख लिटर पाणी येणार असे सांगत आले. मात्र सध्या हे पाणी २० लाख लिटरसुद्धा येत नसल्याचे समजते.

'ते' कालवे पावसाळ्यात बंद करा

0
0
उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांचे कालवे पावसाळ्यात बंद करण्यात यावेत, अशी मागणी जायकवाडी धरणग्रस्त शेतकरी संघर्ष कृती समितीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.

रेल्वे भुयारी मार्ग ४ तासांत पूर्ण

0
0
रेल्वे विभागाने भुयारी मार्गासाठी सहा तासांचा लाइन ब्लॉक घेतला होता. या रेल्वे लाईन ब्लॉकमुळे सहा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. मात्र, या कालावधीत रेल्वे विभागाने भुयारी मार्गासह रेल्वे स्लीपर बदलण्याचे आणि नगरसोल फूट-वेचे काम केले.

केंद्राकडून आलेले सहा कोटी पडून

0
0
देशभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्यत्तूर पदवीच्या जागा वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारने श्रेणीवर्धन (अपग्रेडेशन) कार्यक्रम मंजूर केला. त्याअंतर्गत घाटी हॉस्पिटलला पाच कोटी ९१ लाख रुपये वर्षभरापूर्वी पाठवूनही दिले, पण राज्य सरकारचा शेअर न दिल्याने हा निधी पडून आहे.

इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया

0
0
'इंजिनिअरिंग' प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला उद्या शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत १३ जूनपर्यंत देण्यात आली आहे. तसेच 'एआरसी' सेंटरची यादी ही जाहीर करण्यात आली आहे. या सेंटरवरुन जाऊन विद्यार्थ्यांना आपली कागदपत्रांची तपासणी करता येणार आहे.

'तपोवन'चा अपघात टळला

0
0
दुपारी दोनची वेळ. मुंबईला जाणारी तपोवन एक्स्प्रेस एकनाथनगरच्या रेल्वे क्रासिंगहून पुढे निघाली, मात्र जोरदार पावसामुळे रूळाजवळ टेकड्यांची दरड कोसळली. आणि तपोवन एक्स्प्रेस अचानक थांबवावी लागली. रेल्वे चालकाने रुळाजवळील पडलेले दगड पाहिल्याने मोठा अनर्थ टळला.

बीडमध्ये पोलिओचा रुग्ण

0
0
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कान्हापूर येथील अकरा महिन्याच्या मुलाला पोलिओ असल्याचे तपासणीत निष्पन झाले आहे. पोलिओचा पी२ नावाचा विषाणू पोझिटिव्ह आला आहे. पोलिओपासून मुक्ती हा सरकारचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे.

मान्सून मराठवाड्यात

0
0
मराठवाड्यात गुरुवारी नैऋत्य मोसमी वाऱ्याचं आगमन झालं. नियोजित वेळेपेक्षा एक दिवस आधीच मान्सून मराठ‍वाड्यात आला. उस्मानाबाद, लातूरसह नांदेड जिल्ह्याचा काही भाग त्याने व्यापून टाकला. उर्वरित मराठवाड्यात गुरुवारी पूर्व मोसमी पावसाच्या सरींनी दिलासा दिला. येत्या तीन-चार दिवसांत संपूर्ण मराठवाडा व्यापून नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकतील.

पावसानंतर वाढली भाजीपाला लागवड

0
0
जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी नसल्याने गेल्या तीन महिन्यांपासून भाजीपाला लागवड पूर्णपणे थांबली होती. या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा भाजीपाला लागवड सुरू केली आहे. त्यामुळे भाजीपाला बियाणे विक्री जोरात सुरू असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.

लेव्ही वसूल करण्यासाठी निदर्शने

0
0
बेकायदेशीरपणे कामावरून कमी केलेल्या माथाडी कामगारांना कामावर पूर्ववत घ्यावे, लेव्हीसह कारखान्याकडे असलेली सुमारे ४० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात यावी, यासह अन्य मागण्यासाठी मराठवाडा लेबर युनियनने शुक्रवारी कामगार उपायुक्त कार्यालयावर जोरदार निदर्शने केले.

कार्तिकीला करायचंय 'म्युझिक'मध्येच करीअर

0
0
झी मराठीच्या सारेगमप लिट्ल चॅम्पसची विजेती व लाईव्ह शो करणारी चिमुकली कार्तिकी गायकवाड शुक्रवारी दहावी पास झालीय. आयुष्याच्या याच टर्निंगपाईंटवर तिनं आर्टस शाखेची निवड करत 'संगीत' विषयातच करीअर करण्याचा निर्णय घेतलाय. तिच्याशी झालेला संवाद...

धोकादायक इमारतींमधील नागरिकांना बाहेर काढणार

0
0
महानगरपालिका शहरातील अतिधोकादायक २१ इमारतींमधील नागरिकांना बळाचा वापर करून काढले जाणार आहे. येत्या आठ दिवसात ही कारवाई होईल, अशी माहिती आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.

पावसाचा आनंद जीटीएलचा वैताग

0
0
मृगाच्या पावसाने शहरात दमदार हजेरी लावली असून शुक्रवारी पहाटे १०.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे सुखावलेल्या नागरिकांचा आनंद जीटीएलने हिराऊन घेतला.

मोबदल्याच्या वितरणावर आता तक्रारींचे सावट

0
0
शेंद्रा अतिरिक्त औद्योगिक वसाहतीसाठीचा भूसंपादनाचा मोबदला वाटपाला सुरवात झाली खरी, मात्र आता जमिनीवर हक्क सांगणारे सुमारे पन्नास अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यात विलंब होण्याची चिन्हे आहेत.

दहावी परीक्षा निकालाचा 'तो' दिवस आणि 'हा' दिवस

0
0
'ये सन्नाटा क्यू है भाई?' हा डायलॉग आठवल्यावर शोले चित्रपटाची आठवण येते. या डायलॉगसाठी शोले चित्रपटात प्रसंग वेगळा होती. महापालिकेतील शुक्रवारच्या वातावरणात पुन्हा तो डायलॉग आठवला. दहावी परीक्षेचा निकाल लागला आणि पालिकेत सामसूम निर्माण झाली.

नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी नगरसेवकांची मोर्चेबांधणी

0
0
औरंगाबाद महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी महापालिकेत इच्छुक नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या समितीवर बिनविरोध निवड व्हावी यासाठी बडे नगरसेवक नेत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.

जायकवाडीच्या कालव्यातील गाळ काढण्याचे काम अर्धवट

0
0
औरंगाबाद महानगर पालिकेने मोठा गाजावाजा करून जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून सुरू केलेल्या गाळ काढायच्या कामात संबंधित गुत्तेदाराने काढलेला गाळ कालव्याच्या तोंडावर जमा केल्याने व हा गाळ शेतकऱ्यांनी न नेल्याने, पावसामुळे काढलेला संपूर्ण गाळ परत कालव्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images