Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

डेंगीमुळे नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

$
0
0
समतानगर येथील प्रज्ञा आनंद भुजंग या नऊ वर्षांच्या मुलीचा बुधवारी (२१ ऑगस्ट) डेंगीमुळे मृत्यू झाला. तिला उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखवले होते. नगरसेविका सविता घडामोडे आणि त्यांचा मुलगा गजानन घडामोडे यांच्यावरही धूत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोघांनाही डेंगीची लागण झाल्याचे सांगितले जाते.

सिडको: जुळ्या शहरांचा शिल्पकार

$
0
0
वर्तमान; तसेच भविष्यातही नागरिकांच्या निवासी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, व्यवसायविषयक व सामाजिक - सांस्कृतिक गरजांची पूर्तता होईल, अशा पायाभूत-भौतिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या पर्यावरणपूरक आदर्श नगरांची निर्मिती करणे.

वाळूज महानगराची वाटचाल

$
0
0
सिडकोच्या नवीन औरंगाबाद प्रकल्पाचा झपाट्याने केलेला विकास विचारात घेऊन शासनाने ७ ऑक्टोबर १९९१च्या अधिसूचनेद्वारे वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत निवासी क्षेत्र विकसित करण्यासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली.

नगर-४ ग्रोथ सेंटरचा विकास

$
0
0
नगर-४मधील विकास केंद्राचा ले-आउट मंजूर करण्यात आले आहे. १.५ चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) असून, जास्तीत जास्त नागरिकांना भूखंड विकत घेता यावा, यासाठी भूखंडाचे आकार लहान असतील.

सिडकोचा कारभार लवकरच ‘नेट’वर

$
0
0
प्लॉटचे हस्तांतरण असो की करारनामा. सिडकोच्या संपूर्ण कारभाराची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी सर्व माहिती वेबसाइटवर अपलोड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. करारनाम्याची मुख्य प्रत व इतर माहिती नागरिकांना याद्वारे उपलब्ध होणार आहे.

उद्यान विकासावर भर; वनऔषधीची लागवड

$
0
0
वाळूज महानगरातील लोकांना पर्यावरणपूरक वातावरण अनुभवता यावे, लहान मुलांना खेळण्यासाठी, नागरिकांना फिरण्यासाठी परिसरात पाच उद्याने विकसित करण्यात येणार आहेत; तसेच रस्त्याच्या कडेलाही ग्रीन बेल्टसाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे.

रस्ते होणार चकाचक

$
0
0
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ६६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात पहिल्या टप्प्यांच्या कामांना गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आली आहे.

जकात कर की एलबीटी?

$
0
0
जकात कर लागू करावा की स्थानिक संस्था कर (एलबीटी), याचा निर्णय महापालिकांनीच घ्यावा, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आणि महापालिकेत चर्चेला तोंड फुटले. उत्पन्न वाढीसाठी जकात कर लागू करण्याची भूमिका नगरसेवक, कामगार संघटनांनी घेतली आहे, मात्र त्याला व्यापाऱ्यांच्या संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

बिल थकले; व्हाइट टॉपिंग बंद

$
0
0
पेमेंट थकल्यामुळे कंत्राटदाराने रस्त्यांच्या व्हाइट टॉपिंगची कामे बंद केली आहेत. त्यामुळे शहरात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. १४ रस्त्यांच्या कामांसाठी ९ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. कामच बंद करण्यात आल्यामुळे दिलेल्या मुदतीत कामे होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

भाजपसमोर शिवसेनेचे नमते

$
0
0
समांतर जलवाहिनीच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत आक्रमक झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांसमोर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः नमते घेतले. या कार्यक्रमात आमदार पंकजा मुंडे यांना मानाचे स्थान देण्याची भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मागणी होती. ती अखेर शिवसेनेला मान्य करावी लागली.

‘बजाज’च्या कामगारांचे वाढले

$
0
0
बजाज अॅटो कंपनीच्या कामगारांना, १० हजार पन्नास रुपयांची वेतनवाढ मिळाली आहे. कंपनी व्यवस्थापक समिती व बजाज अॅटो कामगार संघटनेत वाटाघाटीला सुरू होत्या. त्यात संघटनेला यश आल्याची माहिती, संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे यांनी दिली.

‘समांतर’, ‘भूमिगत’चे आज भूमिपूजन

$
0
0
महापालिकेच्या शहर समांतर पाणीपुरवठा योजनेचा व भूमिगत गटार योजनेच्या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ शनिवारी (२३ ऑगस्ट) होणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दोन्हीही प्रकल्पांचे भूमिपूजन केले जाणार आहे.

डासांसाठी पुन्हा एकदा कोम्बिंग ऑपरेशन

$
0
0
डेंगीचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे हायरिस्क एरियात पुन्हा एकदा डास निर्मूलनासाठी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज वर्धापन दिन

$
0
0
‌डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा शनिवारी ५६ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. सकाळी १० वाजता ध्वजावंदनाचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर जीवन गौरव पुरस्कारांचे वीतरण होणार आहे.

परभणी जिल्हा तूर्त टँकरमुक्त

$
0
0
संपुर्ण राज्यात पाऊस होत असतांना मराठवाड्यात मात्र पावसाने अद्यापही दडी मारली आहे. ऐन पावसाळ्यात पावसाच्या रुसव्यामुळे विभागातील सातही जिल्ह्यात टँकर सुरू असतांना परभणी जिल्ह्यामध्ये तूर्त तरी एकाही गावामध्ये टँकर सुरू नाही.

केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार

$
0
0
पंतप्रधानाच्या कार्यक्रमात राजकीय खोडी काढून जर कोणी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणावेळी हुल्लडबाजी करीत असेल तर, हे आम्ही फार काळ सहन करू शकणार नाहीत. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा राज्याचे पर्यटन राज्यमंत्री अमित देशमुख यांनी दिला.

पन्नास टक्के खरीप उत्पादन घटण्याची शक्यता

$
0
0
पावसाळ्याचे दोन-अडीच महिने संपत चालले आहेत. बीड जिल्ह्यात खरीप पिकांच्या वाढीच्या अवस्थेसाठी आवश्यक पाऊस झालेला नाही. पावसाअभावी जिल्ह्यातील हे खरीपाचे पीक संकटात आले आहे.

३० ऑगस्टला दहीहंडीचा जल्लोष

$
0
0
गेल्या १८ वर्षापासून सातत्याने घेण्यात येत असलेल्या कै. खेडकर चषक दहीहंडी स्पर्धेला यावर्षी ३० ऑगस्टला जुनामोंढा भागात प्रारंभ होणार आहे. या उपक्रमाचे सातत्य कायम ठेवण्यासाठी युवा सैनिक महेश खेडकर यांनी यावर्षी देखील जल्लोषात सहभाग नोंदवून अनेकांना या दहीहंडीत सामील होण्याचे आवाहन केले आहे.

भायगावच्या विद्यार्थ्यांची पंचायत समितीत शाळा

$
0
0
वैजापूर तालुक्यातील भायगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मागणीसाठी शुक्रवारी (२३ ऑगस्ट) पंचायत समिती कार्यालयात शाळा भरवली. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष नीळकंठ ठोंबरे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी कार्यालयातच अभ्यासाचे धडे गिरवून शिक्षण विभागाच्या कारभाराचा निषेध केला.

पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

$
0
0
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. सावंत यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना ८ मार्च २०१० रोजी खुलताबाद तालुक्यातील रसूलपुरा येथे घडली होती.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images