Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आईचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा

0
0
वैजापूर तालुक्यातील सावखेडखंडाळा येथील रमेश धोंडिराम नाजिरे (वय ३२) यास आईचा खून केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रमेशने मार्च २०१३ मध्ये आई भागुबाई धोंडिराम नाजीरे (वय ६५) यांचा कुऱ्हाडीने खून झाला होता.

...इथे चालते दीदीगिरी !

0
0
शुभम शिवानीपेक्षा पाच मिनिटांनी मोठा असला तरी, दोघांमध्ये बॉस शिवानी! शुभमनंही तिचा अधिकार मान्य केलाय. सरस्वती भुवन महाविद्यायलात अकरावीमध्ये शिकणाऱ्या शुभम व शिवानी काळे हे दोघं पाचवीपासून वसतिगृहात राहतात.

लेबर कॉलनीचा वाद कोर्टात

0
0
लेबर कॉलनी शासकीय वसाहत निष्कासित करण्याच्या निर्णयाविरोधात जमिनीचे मूळ मालक नवाब युसूफूद्दीन खान वजुद्दीन खान यांनी जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दुष्काळाची झळ पाणचक्कीला

0
0
पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेली पाणचक्की दुष्काळामुळे ओस पडली आहे. पाऊस नसल्यामुळे पाणचक्कीचे नैसर्गिक स्त्रोत आटले आहेत. मोटारीने पाणी चढवून पर्यटकांसाठी पाणचक्की चालवण्यात येत आहे.

दुष्काळप्रश्नी आयुक्तालयावर धडक

0
0
मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी शुक्रवारी (२२ ऑगस्ट) भरपावसात भारतीय जनता पक्षाने विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शेतकरी अस्मानी संकटाच्या कचाट्यात सापडला असताना, सरकार मजेत आहे.

काँक्रिटच्या रस्त्यांना तडे

0
0
काम पूर्ण होण्यापूर्वीच काँक्रिटचा रस्ता आणि व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यांना तडे पडल्याचे समोर आले आहे. यामुळे रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पालिकेच्या लेखी डेंगीचे १९ रुग्ण

0
0
महापालिकेकडे असलेल्या तपशीलानुसार शहरात सध्या डेंगीचे १९ रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याशिवाय तापाचे ७७४ रुग्ण आढळून आले आहेत, त्यात डेंगी सदृश्य तापाच्या रुग्णांची संख्या ५७ आहे.

पाथ्रीकरांचा काँग्रेसला रामराम

0
0
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. दत्ता पाथ्रीकर यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. राज्यभरातून काँग्रेसमधून आउट गोइंग सुरूच असून, त्यात आता पाथ्रीकरांची भर पडली आहे.

औरंगाबादेत दमदार पाऊस

0
0
गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाने अखेर औरंगाबाद शहरात जोरदार हजेरी लावली. शहर परिसरात झालेल्या या पावसाची ३३.६ मि‌लि मीटर नोंद करण्यात आली आहे. या वर्षी शहरात पावसाची ही तिसरी मोठी नोंद आहे.

‘एसटी बॉइज’ना पाच टक्के आरक्षण

0
0
पोलिसांच्या पाल्यांना पोलिस भरतीत पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने दोन दिवसांपूर्वी घेतला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना एसटीमध्ये पाच टक्के राखीव जागा देण्याचा प्रस्ताव आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

0
0
महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मध्यरात्री जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या पावसामुळे पाणीसाठ्यामध्ये अल्पशा प्रमाणात वाढ झाली.

पोलिसांकडून गावकऱ्यांना अमानुष मारहाण

0
0
गावात दारुबंदीसाठी म्हणून गेलेल्या वाशी येथील पोलिसांनी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे सोडून गावकऱ्यांना बेदम झोडपून काढत हुकुमशाही प्रवृत्तीचे दर्शन घडविले. मांडवी गावच्या निष्पाप नागरिकांना त्यांनी मारहाण केली.

‘केंद्रीय विद्यापीठ’ दर्जासाठी पाठपुरावा

0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी (२३ ऑगस्ट) येथे दिली.

दोन्ही योजना दोन वर्षांत पूर्ण करा

0
0
शहर म्हणजे नुसत्या उंच इमारती नव्हे. उंच इमारतीच्या शेवटच्या मजल्यापर्यंत पाणी पोचले पाहिजे. ड्रेनेजची व्यवस्थाही असलीच पाहिजे. त्यामुळे समांतर जलवाहिनी व भूमिगत गटार योजना या दोन्ही योजना दोन वर्षांत मार्गी लावा, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.

समाजकंटकांवर करडी नजर

0
0
गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी म्हणून पोलिसांनी मोर्चेबांधणी केली आहे. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर असून, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी दिले आहेत.

आयुक्तालयाची नियोजनशून्य वेबसाइट

0
0
सरकारी कामकाज ऑनलाइन करण्याचे धोरण राज्यात स्वीकारण्यात आले. विविध सरकारी खात्यांनी वेबसाइट सुरू केल्या, औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयाची वेबसाइट मात्र नियोजनशून्य कारभाराचा नमुना ठरली आहे.

विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय झेप

0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आंतरराष्ट्रीय झेप घेण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. स्पेन, इटली, फ्रान्स, कॅलिफोर्नियानंतर आता जागातील पहिल्या पन्नास विद्यापीठांमध्ये समावेश असलेल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’सोबत संशोधनातील देवाण-घेवाणीबाबत सामंजस्य कराराची बोलणी सुरू आहे.

बापानेच माझा गळा कापला

0
0
‘‘होय मी राष्ट्रवादीवर नाराज आहे. ज्या शरद पवार यांना मी बाप मानले. त्यांनीच माझी उमेदवारी कापून माझा गळा कापला. मला हे अपेक्षित नव्हते. राजकारणात चित-पट होतच असतात, परंतु मला अतिशय अलगदपणे बाजूला केले,’’ अशी खंत माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी शनिवारी (दि.२३) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

हायटेक चोर इंजिनीअर अटकेत

0
0
मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. व्यवसाय सुरू केला; पण तो तोट्यात गेला. त्यातच इन्स्टंट लॉटरीची सवय जडली. घरात भांडणे होऊ लागली. त्यामुळे इंजिनीअर तरूण चोऱ्या करू लागला. त्याने हॉस्पिटल लक्ष्य केले.

युतीच्या कार्यक्रमावर बहिष्कार

0
0
युतीची सत्ता असलेल्या शहरात युतीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. आता हे लोण मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोचले आहे. पालिकेच्या समांतर जलवाहिनी आणि मलनि:सारण योजनेच्या भूमिपूजनात शनिवारी (२३ ऑगस्ट) त्याची प्रचिती आली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images