Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दर्डांच्या पोस्टरबाजीवर फडणवीसांची टीका

0
0
‘कॉँग्रेसच्या चिन्हावर आणि नावावर मत मिळणार नाही, हे लक्षात आल्यानेच कॉँग्रेसच्या कांही नेत्यांनी व्यक्तिगत पातळीवर जाहिरातबाजी सुरू केली आहे,’ अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (२२ ऑगस्ट) केली.

राष्ट्रवादीचे ३३ उमेदवार इच्छुक

0
0
औरंगाबाद जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ३३ इच्छुकांनी आपली दावेदारी पक्षाकडे दाखल केली आहे. गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक १३ उमेदवारांनी दावा केला आहे.

वाळू चोरांनी उडवली झोप

0
0
प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी दीक्षितकुमार गेडाम यांची बदली होताच पैठण शहरालगतच्या नदीपात्रातून वाळू चोरी सुरू झाली आहे. चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या आवाजाने पैठणकारांची झोप उडाली आहे.

..जाधववाडीचा धक्का !

0
0
आडते, हमाली, पट्टी, धान्याचे ढीग. ही दुनियाच न्यारी. इथल्या काट्याने कुणाचे भाग्य फळफळते, तर कुणाच्या हाती वर्षभर मेहनत करूनही त्याची अर्धी किंमतही नसते. टोमॅटोचा होणारा लाल चिखल इथलाच. महागाईमुळे डोळ्यांत पाणी आणणारा कांदा इथलाच. औरंगाबादमधल्या जाधववाडीचा हा संस्मरणीय धक्का, कधी आनंदाचा असतो. कधी दुःखाचा.

शौचासाठी पाहतात अंधाराची वाट

0
0
महिलांच्या सन्मानासाठी केंद्र सरकार ग्रामीण भागात ‘जहाँ सोच वहाँ शौचालय’ या जाहिरातीद्वारे व्यापक मोहीम राबवत असले, तरी शहरी भागातही उघड्यावर शौचास बसण्याचे लक्षणीय प्रमाण आहे. औरंगाबाद शहरातील अनेक वस्त्यांमध्ये वैयक्तिक किंवा सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे नागरिक उघड्यावर शौचास बसतात.

प्रशासन सुस्त, साठेबाज मस्त

0
0
वाळूची साठेबाजी करण्यावर बंदी असताना शहर आणि परिसरात काही महिन्यांपासून सुरू असलेल्या साठेबाजीला आवर घालण्यात महसूल प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. त्याचवेळी शहरातील पोलिसांकडूनही या साठेबाजांवर कारवाई होताना दिसत नाही.

मनसेनेत चलबिचल

0
0
विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्याने इतर पक्षांप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र माजी पदाधिकाऱ्यांनी वेगळीच चाल खेळल्यामुळे विद्यामान पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत.

ट्रॅक्टरच्या युगात ‘सर्जा-राजा’ बाद

0
0
जिल्ह्यात शेतीचे वाढते यांत्रिकीकरण आणि संगोपनाच्या समस्यांमुळे पशूधनात झपाट्याने घट सुरू आहे. दरवर्षी किमान दीड लाख जनावरे कमी होत असून, त्याचा कृषी क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाला आहे. दुष्काळी परिस्थितीत चारा आणि पाणी टंचाई जनावरांची संख्या घटण्याचे प्रमुख कारण आहे.

‘आयडिया’ला ‘एमसीआय’चा दणका

0
0
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडून (एमसीआय) शासकीय मेडिकल कॉलेजांची अचानक तपासणी सुरू केली आहे. शिक्षकांची पूर्ण पदे भरली गेली नसल्याने सरकार करत असलेल्या बनवाबनवीला लगाम बसणार आहे.

मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपचालक संपावर

0
0
राज्यभर एकच कर आणि एकच दर असावा, या मागणीसाठी ‘फेडरेशन ऑफ पेट्रोल ‌डिलर्स असोसिएशन’ने बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीपासून शहरातील पेट्रोलपंप चालकही संपावर जाणार आहेत.

सूर्यकांता पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

0
0
हिंगोलीच्या खासदार म्हणून निवडून आल्यानंतर देशाच्या ग्रामीण विकासमंत्री बनलेल्या सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा रविवारी राजीनामा दिला. येत्या पाच दिवसांत त्या निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुलींच्या होस्टेलमध्ये मद्यधुंद प्राचार्याचा गोंधळ

0
0
येथील एका सेवानिवृत्त प्राचार्याने मद्यधुंद अवस्थेत मुलींच्या हॉस्टेलमध्ये घुसून गोंधळ घातला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला झालेला हा खळबळजनक प्रकार आता उजेडात आला आहे. या पूर्वीही या महाभागाने दोन ते तीन वेळा असे गैरकृत्य केल्याचे समजते. मात्र, वेळीच त्याच्यावर कॉलेजच्या प्रशासनाने कारवाईचा बडगा न उगारल्यामुळे हॉस्टेलमधील मुलींमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.

तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षा रामभरोसे

0
0
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवस्थानची सुरक्षा यंत्रणा रामभरोसे आहे. सध्या कार्यरत असणारी यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने ‘फेल’ असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने जिल्हा पोलिस प्रशासनासह वरिष्ठांना पाठविला आहे.

तलाव होऊन ७ वर्ष लोटले, अद्याप मोबदला नाही

0
0
सात वर्षांपूर्वी साठवण तलावासाठी संपादित केलेल्या शेत जमिनीचा मावेजा संबंधित शेतकऱ्यांना दिलाच नाही. जालन्याच्या लघु पाटंबंधारे स्थानिक स्तर विभागाच्या अधिकाऱ्यांनी, त्यातून कंत्राटदाराचे बिल दिले. आता या जमिनीवर साठवण तलाव तयार होऊन पावसाने भरला आहे, मात्र मूळ शेतकरी मालक आजही मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहे.

अडीच लाखांसह दोन किलो चांदी लंपास

0
0
टिळकपथ येथील दुल्हा दुल्हन वस्त्रदालनात चोरट्यानी धाडसी चोरी केल्याचा प्रकार सोमवारी (२५ ऑगस्ट) सकाळी उघडकीस आला. या घटनेत चोरट्यांनी शेजाऱ्याच्या मोकळ्या इमारतीवरून केबल वायरच्या मदतीने दुल्हादुल्हनचे छत गाठले.

औरंगाबादच्या दहशतवाद्याचे छत्तीसगडमधून पलायन

0
0
वेरुळ शस्त्रसाठा प्रकरणातील दहशतवादी नईम उर्फ नय्यूने रविवारी सकाळी छत्तीसगडच्या रायगड येथून रेल्वेतून पलायन केले. मूळचा औरंगाबादचा असलेल्या नईमला सात वर्षांपूर्वी सीमा सुरक्षा दलाच्या पथकाने (बीएसएफ) बांगला देशाची राजधानी ढाका येथे अटक करण्यात आली होती. कोलकाता पोलिस मुंबईतील कोर्टामध्ये हजर करण्यासाठी आणत असताना, त्याने पलायन केले.

शहरात खाद्यतेल, दारू, सिगारेट महाग

0
0
रहदारी शुल्क रद्द केल्यावर महापालिकेची होणारी आर्थिक तुट भरून काढण्यासाठी शासनाने काही ठराविक वस्तूंवर स्थानिक संस्था कर (एलबीटी) आकारण्याची मुभा महापालिकेला दिली आहे.

विद्यापीठात ‘विद्यार्थी न्यायाधिकरण’

0
0
विद्यार्थ्यांना विविध पातळीवर अनेकदा करावा लागणारा संघर्ष पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘विद्यार्थी न्यायाधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात विद्यार्थ्यांना प्रवेशातील अडचणीपासून शुल्काबाबत तक्रारी असतील तर या न्यायाधिकरणाकडे दाद मागता येणार आहे.

प्रसादावर ‘एफडीए’ची करडी नजर

0
0
गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसाद तयार करणार आहात? गणेशोत्सवानिमित्त भंडारा आहे? तर त्यातून विषबाधा होणार नाही किंवा प्रसादाचे उत्पादन करताना मानवी सेवनास सुरक्षित राहील यांची खात्री करा, तशी काळजी घ्या, यांची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संबंधित गणेश मंडळावर सोपवली आहे.

सिल्लेखान्यात कत्तल सुरूच

0
0
सिल्लेखान्यातील कत्तालीला विरोध करीत आपला विस्तार करणाऱ्या शिवसेनेचा आवाज बोथट झाल्याची प्रचिती सिल्लेखाना परिसरातील सध्याची परिस्थिती पाहता लक्षात येते. पडेगावात स्वतंत्र कत्तलखाना तयार करण्यात आला असताना त्याला शह देत सिल्लेखान्यात मुक्तपणे जनावरींची कत्तल केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images