Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हिमोग्लोबिनने वाढविला ‘बीपी’

$
0
0
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या निम्याहून अधिक विद्यार्थिनींच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण, धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे पालकांची बीपी वाढली आहे.

तिकीट वाटपाआधीच प्रचार सुरू

$
0
0
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही याची शाश्वती नसताना जिल्ह्यातील नऊही मतदारसंघात इच्छुकांनी आपापला प्रचार सुरू केला आहे. निवडणूक आयोग कधीही घोषणा करो, औरंगाबादमध्ये मात्र रणधुमाळी सुरू झालीय.

राज्यात दारूबंदी अवघड

$
0
0
कायदा करून दारूबंदी होत नाही, त्यासाठी जनजागृतीच व्हायला हवी. आम्ही दारूबंदीसाठी दोन जिल्ह्यांमध्ये प्रभावी काम केले, पण संपूर्ण राज्यासाठी ही बंदी लागू करणे काहीसे अवघड आहे, असे मत सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना व्यक्त केले.

पिवळ्या वाघिणीने दिला दोन बछड्यांना जन्म

$
0
0
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा पिवळ्या वाघिणीचा पाळणा हालला आहे. रिद्धी नावाच्या वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला आहे. पिवळ्या वाघांची संख्या आता दहा झाली आहे.

‘पैशाच्या पावसा’चा तपास गुन्हे शाखेकडे

$
0
0
पैशाचा पाऊस पाडण्याचे ‌अमिष दाखवून दौंड येथील नागरिकाला लुबाडल्याप्रकरणी पाचवी तक्रार सोमवारी (२५ ऑगस्ट) सिडको पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सिडको एमआयडीसी पोलिस महिना उलटला तरी भोंदूबाबाच्या टोळीला पकडण्यात अपयशी ठरली आहे.

९ कोटींच्या पाणीयोजना झटक्यात मंजूर

$
0
0
कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या मंजुरीने अडचणीत आलेल्या जिल्हा परिषद जलसंधारण समितीच्या बैठकीत मंगळवारी (२६ ऑगस्ट) ९ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली. या ९ योजना आयत्यावेळचा विषय म्हणून तहकूब बैठकीत मंजूर झाल्या. बैठक झालीच नाही, असे काही सदस्यांचे म्हणणे आहे.

‘राष्ट्रवादी’च्या मुलाखतींमुळे काँग्रेसचा झाला खोळंबा

$
0
0
काँग्रेसकडे असलेल्या सहा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यामुळे, जागा वाटपाचा तिढा किचकट होण्याची चिन्हे आहेत.

वाळू तस्करीचा पर्दाफाश; महसूल विभागाची ‘झोपमोड’

$
0
0
गोदामाईला ओरबडणाऱ्या तस्करांचा पर्दाफाश महाराष्ट्र टाइम्सने सोमवारी (२५ ऑगस्ट) केला. त्यानंतर महसूल विभागाचे डोळे खाडकन उडलेत आहेत. या वृत्ताची गंभीर दखल घेत, गोदाखोऱ्यातील वाळू तस्करी रोखण्यासाठी अखेर ४० तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत.

पाणीकपातीचे ‘बालंट’ स्थायी सदस्यांनी टाळले

$
0
0
नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव तूर्त टळला आहे. स्थायी समितीकडून हा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आला आहे.

उस्मानाबादच्या आशा परतीच्या मान्सूनवरच

$
0
0
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ऑगस्टच्या अखेरीसही पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या अल्पशा पावसाने पिकांना जीवनदान मिळाले असले, खरिप हंगामामध्ये फारसे हाती लागण्याची शक्यता नाही. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प कोरडे आहेत.

प्रशांत बंब यांच्या प्रवेशाचा चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात

$
0
0
गंगापूर-खुलताबादचे अपक्ष आमदार प्रशांत बंब यांच्या शिवसेना प्रवेशाचा चेंडू पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात आहे. बंब यांच्या प्रवेशाबद्दल तेच निर्णय घेतील, अशी माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. या मतदारसंघातून इच्छुकांची संख्या जास्त आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

तंटामुक्त गावात अध्यक्षपदासाठी ‘तंटे’

$
0
0
गावागावात शांतता राबावी यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरू केले. आता या अभियानात चक्क सात लाखांचे बक्षीस मिळवणाऱ्या बाजारसावंगी गावात, तंटामुक्तीच्या अध्यक्षपदावरून तंटे सुरू झाले आहेत. प्रत्येक गटाला या समितीचे अध्यक्षपद हवे आहे.

गायरानावर स्मशानभूमीचा डाव!

$
0
0
पैठण तालुक्यातील लोहगाव येथे गेल्या ३० वर्षांपासून कसत असलेल्या गायरान जमिनीवर खांब उभे करून एका समाजाची स्मशानभूमी तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासंदर्भात जमीन कसत असलेल्या शेतकऱ्याने पोलिस; तसेच महसूल प्रशासनाकडे दाद मागितली आहे.

परीक्षा शुल्कमाफी केवळ घोषणा

$
0
0
दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीची सवलत देण्याची राज्य सरकारची घोषणा केवळ कागदापुरतीच मर्यादित राहिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊन १५ दिवस उलटले तरी, शुल्कमाफीवर ठोस निर्णय नाही. टंचाईसृदृश स्थिती घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांमधील दहावी, बारावीचे परीक्षा शुल्क आकारले जात आहे.

मराठी पाट्यांची सक्ती कागदावर

$
0
0
मराठी भाषेच्या अभिमानाखातर कडक कायदे केले. दुकानांवरील नामफलक मराठी भाषेत ठळक असावेत, असा सक्तीचा दंडक केला. शहरात फेरफटका मारला असता, या नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसते. हा नियम मोडणाऱ्या फक्त सात जणांवर गेल्या आठ महिन्यांत कारवाई करण्यात आली आहे.

‘सुपर पॉवर’चे तीन सितारे गजाआड

$
0
0
‘सुपर पॉवर’चे सुपर सितारे म्हणून ओळख असलेले व फसवणुकीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी साडेपाच वाजता अटक केली. जालना मंठा रोडवर ही कारवाई करण्यात आली.

सेनेचा दुष्काळाच्या प्रश्नाला हात

$
0
0
मराठवाड्यामध्ये या वर्षीही पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेनेने दुष्काळाच्या प्रश्नाला हात घातला असून, पक्षाचे खासदार मराठवाड्याच्या विविध भागांची पाहणी करत आहेत. तीन खासदारांच्या एका पथकाने बीड जिल्ह्याची पाहणी केली असून, केंद्रीय मंत्री अनंत गिते बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत.

मराठवाड्यात सर्वत्र पावसाची रिपरिप

$
0
0
मोठ्या विश्रांतीनंतर मंगळवारी सायंकाळी पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यात खरीप पिकांना जीवदान मिळाले असले तरी उत्पादनात कितपत वाढ होईल याबद्दल साशंकताच आहे.

भंडारदऱ्याकडे कूच; बिडकीनमध्ये अटक

$
0
0
समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार जायकवाडी धरणात हक्काचे पाणी सोडा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी व जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (२७ ऑगस्ट) पैठणहून भंडारदरा धरणाकडे मोटारसायकल मोर्चा काढून कूच केली, मात्र त्यांना पोलिसांनी बिडकीन येथे अडवून अटक केली.

...मृतदेहात गुंतलेला जीव !

$
0
0
कुजलेल्या, खांडोळी झालेल्या मृतदेहाला हात लावायला एक वेळ सख्खे नातेवाईक नाक मुरडतात. शववाहिनी चालक मात्र, माणुसकीच्या नात्यातून हा मृतदेह उचलून, हवा त्या ठिकाणी न कुरकुरता पोहचवतो.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images