Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उर्दू शाळांना मिळणार सर्व सुविधा

$
0
0
राज्यातील सर्वसामान्य जनतेला शिक्षण व आरोग्याच्या उच्च सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच अल्पसंख्यांक घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही शासनाची जबाबदारी आहे.

आचारसंहितेपूर्वी उद्घाटनाची लगीनघाई

$
0
0
आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या घोषणेपूर्वी विकास कामाच्या उद्घाटनाचा व भूमीपुजनाची लगीनघाई राजकीय पक्षांनी सुरू केली आहे.

तुटपुंज्या पगारात कसं जगणार ?

$
0
0
वनपाल आणि वनरक्षकांनी पुकारलेल्या संपामुळे वन विभागाचे ‘फिल्ड’ कामकाज कोलमडले आहे. सध्या वनमजूर आणि वनक्षेत्रपाल ही जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील संपामुळे वन जमिनीवर अतिक्रमण करण्याच्या घटना वाढल्या आहेत.

सत्ता परिवर्तन आवश्यक

$
0
0
‘ही संघर्ष यात्रा सत्ता परिवर्तनाची नांदी ठरणार असून महाराष्ट्रात पंधरा वर्षानंतर सत्ता परिवर्तन होणे भावी पिढीसाठी गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा पालवे-मुंडे यांनी केले.

जायकवाडी धरण ७५ टक्के रिकामेच

$
0
0
जायकवाडी धरणात साडेचार हजार क्युसेक प्रतितास याप्रमाणे पाण्याची आवक सुरू असून धरणात २५.२२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पाण्याची आवक सुरू झाली असली तरी, अद्याप ७५ टक्के धरण रिकामे आहे.

नापास खेळाडू अखेर ढकलपास

$
0
0
क्रीडा सवलत गुणांच्या प्रस्तावांना मुदतवाढ मिळाल्याने विभागातील दहावी, बारावीच्या ५२ विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. जवळपास ६५ विद्यार्थ्यांचे मुदतीनंतर प्रस्ताव आले होते. उशिरा आलेले प्रस्ताव स्वीकारण्याचे आदेश शासानाने मंडळाला दिले होते.

मोदकांची मेजवानी!

$
0
0
गणपती बाप्पांचा आवडता खाद्यपदार्थ म्हणजे मोदक. बाप्पांच्या स्थापनेपासून ते थेट विसर्जनापर्यंत घरोघरी मोदक आवर्जून बनविले जातात. मिठाई दुकानेही या मोदकांनी सजली आहेत.

तेथे गुरुजींचे चालेना !

$
0
0
पंतप्रधानांचे भाषण ऐकविण्यासाठी विद्यार्थ्यांना थांबविण्याची मोठ्ठी कसरत, दोन सत्रात चालणाऱ्या शाळांमधील शिक्षकांना करावी लागणार आहे. शहरात अशा शाळांची संख्या सुमारे ३२० असून, या शाळांमधील सरासरी संख्या काही हजारांमध्ये आहे.

५७ कोटींच्या कामांना मान्यता

$
0
0
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ऑगस्ट महिन्यात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमधून ५७ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

डेंगीच्या डासांचा कहर

$
0
0
डेंगी व डेंगीसदृश रुग्णांनी शहरातील बहुतांश हॉस्पिटल्स हाऊसफुल्ल झाले आहेत. विशेष म्हणजे तब्बल ७० ते ८० टक्के रुग्ण हे शहर व शहर परिसरातील आहेत. त्याचवेळी मागच्या तीन वर्षांतील सर्वाधिक प्रमाण यंदा असल्याचे निरीक्षणही तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

घाटात खळाळणार धबधबा

$
0
0
निसर्गरम्य दौलताबाद घाटात निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी वन विभागाने कृत्रिम धबधबे निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला आहे. नवीन सिमेंट बंधारे बांधून वर्षभर धबधबा खळाळता ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

आता भाजपचेही ‘पोश्टर बॉय’

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या इच्छुुकांनी शहरभर होर्डिंगच्या माध्यमातून ‘अच्छा’ असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. त्याचा कित्ता ‘पार्टी विथ डिफरन्स' म्हणविणाऱ्या भारतीय जनता पक्षानेही गिरविण्यास सुरुवात केली आहे.

शिवस्मारक हा ‘पोलिटिकल स्टंट’

$
0
0
‘अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यासाठी १८ परवानग्या आवश्यक आहेत. आतापर्यंत केवळ चार परवानग्या मिळाल्याचे राज्य सरकार सांगत असले तरी ही जनतेची निव्वळ दिशाभूल आहे. मागील सात वर्षांपासून हेच कारण ऐकत आहे. त्यामुळे निवडणूक काळात शिवस्मारकाची चर्चा करणे हा सगळ्याच पक्षांचा राजकीय स्टंट आहे,’ असे मत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.

आंदोलनांचा पूर

$
0
0
विधानसभा निवडणुकीत लोकसभेसारखे अपयश पदरी पडू नये, म्हणून आरक्षणासारख्या मुद्द्यांवर सरकारने निर्णय घेण्यास सुरुवात केल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा संघटना आणि सामाजिक-राजकीय संघटनांनीही आपल्या मागण्यांसाठी आंदोलने पुकारली आहेत.

‘यादगार’चा यंदाही ‘यादगार’ देखावा

$
0
0
देखाव्यांमधून वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्या जाधवमंडी (बांबू मार्केट) येथील यादगार गणेश मंडळाने यंदाही आपल्या भव्य-दिव्य देखाव्यांची परंपरा जपली आहे.

पाणीपुरवठा 'समांतर'च्या ताब्यात

$
0
0
शहराची पाणीपुरवठा योजना नियोजनानुसार सोमवारी, एक सप्टेंबर रोजी सायंकाळी समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या ताब्यात देण्यात आली.

प्रकाश महाजन सूत्रे स्वीकारणार

$
0
0
महापालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची नागपूर येथे नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतीपदी बदली झाली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश सोमवारी सायंकाळी प्राप्त झाले. डॉ. कांबळे यांच्या जागी धुळ्याचे जिल्हाधिकारी प्रकाश महाजन येणार आहेत.

औरंगाबाद पालिकेला प्रमोशन

$
0
0
औरंगाबादची महापालिका आता ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गात गेली आहे. पालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच वर्ग बदलला असून, त्यामुळे पालिकेचा दर्जाही वाढला आहे.

कार विहिरीत पडून दोघे ठार

$
0
0
चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे इंडिका कार विहिरीत कोसळून दोन बालकांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता आष्टूर (ता. लोहा) येथे घडली.

अडवाणी यांचे केंद्राला प्रशस्तिपत्र

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमधील प्रत्येक मंत्र्याने लक्षणीय काम केले आहे. शेजारी देशांशी मैत्री वाढविण्याचा प्रयत्नही मोदी अत्यंत उत्तमपणे करीत आहेत, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केंद्र सरकारला प्रशस्तिपत्र दिले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images