Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विद्यार्थ्यांचा खारीचा वाटा

0
0
देवगिरी इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पाकिटमनीमधून तब्बल १ लाख ५१ हजार रुपये गोळा करत ही रक्कम अनाथ मुलांना मायेची सावली देणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना शुक्रवारी (५ सप्टेंबर) सुपूर्द केली आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा केला.

आज ‘ढोल वाजवा’ स्पर्धा

0
0
गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे शनिवारी (६ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ‘ढोल वाजवा’ स्पर्धा होत आहे. शहरातील विविध ढोल पथक या स्पर्धेत आपले कौशल्य सादर करणार आहेत.

‘गणपती मोदक स्पर्धा’

0
0
विघ्नहर्त्या बाप्पांचे घरोघरी आगमन झाले आहे. या सुखकर्त्याच्या स्वागतासाठी कुठे ढोलताशे वाजत आहेत, तर कुठे भव्यदिव्य देखाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

पेट्रोल पंपांबाबत चाचपणी

0
0
शहराच्या पश्चिमेतील बेगमपुरा, छावणीसह विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेट्रोल पंपाची व्यवस्था नाही. या बाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जागेवर पंप सुरू करण्याबाबत विद्यापीठाकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

CMपदात स्वारस्य नाही-उद्धव

0
0
गणपतीसोबतच राज्यातील आघाडी सरकारचे विसर्जन करा. माझे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न नाही, अथवा त्यात फारसे स्वरास्यही नाही. पण, मी शिवसेनाप्रमुखांचा मुलगा असल्याने, जनतेचे प्रश्न सोड‌वण्याची अपेक्षा माझ्याकडून केली जाते, म्हणून या राज्यात सत्ता हवी आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

पुरस्कारावरून रंगला कलगीतुरा

0
0
विधानसभा डोळ्यासमोर पाहून जिल्हा परिषदेने तीन वर्षांपासून रखडलेल्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी केले. शिक्षक निवडण्यात राजकारण केल्याचा थेट आरोप पुरस्कारप्राप्त शिक्षक प्रभाकर पवार यांनी व्यासपीठावरून केला आणि कार्यक्रमाचा नूरच बदलून गेला.

नळदुर्ग पर्यटनाच्या नकाशावर

0
0
नळदुर्ग येथील प्राचीन किल्ल्याच्या विकासाला चालना देणारा करार शासन, पुरातत्व विभाग आणि बीओटी कंत्राटदार यांच्यामध्ये २६ ऑगस्ट २०१४ रोजी झाला. यामुळे आता नळदुर्गचा किल्ला लवकरच पर्यटनाच्या नकाशावर येणार आहे.

तिखट मोदक ठरले ‘लय भारी’

0
0
मोद अर्थात आनंद देणारा मोदक. गूळ-साखर, उकडीचे, रवा-मैदा या परिचित मोदक प्रकारांपेक्षा वेगवेगळ्या ३३ प्रकारांचे ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘इनपॅलिबल आयडियाज’ यांच्यातर्फे आयोजित मोदक स्पर्धेत सादर करण्यात आले.

तुफान गर्दीचा वीकेण्ड

0
0
श्रींचे दर्शन घेण्यासाठी व विविध गणेश मंडळांनी तयार केलेले देखावे पाहण्यासाठी शनिवारी (६ सप्टेंबर) नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. सोमवारी (८ सप्टेंबर) श्रींचे विसर्जन होणार असल्यामुळे उद्या (रविवारी) विक्रमी गर्दी होईल, असे मानले जात आहे.

डेंगीचा शहरात मुक्काम

0
0
शहरात डेंगीने आता मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील ४२ भागांत अति दक्षतेचा इशारा जारी केला आहे. या भागात आता मंगळवारपासून (९ सप्टेंबर) ८५ पथकांच्या माध्यमातून औषधी फवारणीचे काम केले जाणार आहे.

विनापरवाना विक्रीचा भांडाफोड

0
0
विनापरवाना औषध विक्री करणाऱ्या एका दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई करत ६७ हजार ५०० रुपये किमतीचा औषधांचा साठा जप्त केला.

महायुतीच्या सत्तेत स्वारस्य

0
0
‘गणपतीसोबतच राज्यातील आघाडी सरकारचे विसर्जन करा,’ असे आवाहन करतानाच ‘माझे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न नाही अथवा त्यामध्ये फारसे सारस्य नाही. मी शिवसेनाप्रमुखांचा मुलगा असल्याने, जनतेची प्रश्न सोड‌विण्याची अपेक्षा माझ्याकडून केली जाते.

गोदावरीच्या पाण्याचा ओघ

0
0
ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील दमदार पावसामुळे पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाकडे पाण्याचा ओघ येणे सुरू आहे. शनिवारी (६ सप्टेंबर) सायंकाळपर्यंत नाथसागरातील उपयुक्त जलसाठा ३२.१४ टक्क्यांपर्यंत पोचला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी ‘चले जाव’

0
0
मॉँ साहेब यांच्या स्मृतीदिनी काँग्रेस-राष्ट्रवादीला ‘चले जाव’ चा नारा देत लोहा येथून या आंदोलनाची सुरुवात करीत आहे. येत्या निवडणूकीत दोन्ही काँग्रेसचे विर्सजन करून लोहा-कंधारसह जिल्ह्यातील सर्व जागांवर भगवा फडकलाच पाहिजे, त्यासाठी सर्वांनी आतापासून कामाला लागावे असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

नांदेडकरांना दिवसाआड पाणीपुरवठा

0
0
विष्णूपुरी प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे नांदेडकरांना एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय स्थायी समितीचे सभापती उमेश पवळे यांनी सभेत घेतला. शहराला डिसेंबर २0१४ पर्यंत एक दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

नांदेडसाठी पर्यायी पाणी व्यवस्था

0
0
नांदेड शहरासाठी पर्यायी पाणी व्यवस्था म्हणून पैनगंगेचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी १४.८७ कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यापासून नांदेड शहराला पाणी टंचाई भासणार नाही.

नाथसागरातील जलसाठा ३४.६२ टक्के

0
0
ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात दोन दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे वरील धरणांमधून पाणी सोडणे सुरू आहे. त्यामुळे पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा रविवारी सायंकाळी सातपर्यंत धरणामध्ये ७५१.७२२ दशलक्ष घनमीटरपर्यंत (३४.६२ टक्के) पोचला.

हज यात्रेकरूंचा पहिला जत्था रवाना

0
0
यावर्षीच्या हजयात्रेसाठी चिकलठाणा विमानतळावरून रविवारी (७ सप्टेंबर) २३३ यात्रेकरूंचा पहिला जथ्था सायंकाळी सहा वाजता रवाना झाला. हज यात्रेकरूंनी ‘लबैक’चा जाप करीत जामा मशीद ते विमानतळ व तेथून पुढील प्रवास केला.

लाचखोर लाइनमन, पोलिस अटकेत

0
0
दुचाकीची मुळ कागदपत्रे परत करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना वाहतूक पोलिस व त्याच्या मदतनिसाला अटक करण्यात आली. अॅन्टी करप्शन विभागाने ही कारवाई रविवारी (७ सप्टेंबर) दुपारी पंढरपूरजवळील ओयासीस चौकात केली.

‘गवसलेले सत्य कवितेत उतरते’

0
0
‘कवी कवितेसोबत जगत असल्यामुळे कवितेत त्याच्या जगण्याचा धागा सापडतो. आपल्याला गवसलेले जगण्याचे सत्य मांडण्याचा प्रयत्न नक्कीच सोपा नसतो. त्यामुळे कविता कवीचे आत्मचरित्रच असते’ असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक रमेश इंगळे-उत्रादकर यांनी केले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images