Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सुमेधला प्रशिक्षणासाठी निमंत्रण

$
0
0
ग्रेनडा (स्पेन) येथे सुरू असलेल्या ५१व्या जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत औरंगाबादचा आंतरराष्ट्रीय नेमबाज सुमेधकुमार देवळाईवाला याने ५० मीटर फ्री पिस्तूल या प्रकारात १८वे स्थान संपादन केले.

आम्ही डोळ्याने मृत्यू पाहिला

$
0
0
रस्ते तुटलेले, सर्वत्र पाणी व यामध्ये जीव मुठीत धरुन बसलेले नागरिक अशी अवस्था असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये चार दिवस अडकलेल्या औरंगाबादच्या आठ प्रवाशांनी अक्षरक्षः डोळ्याने मृत्यू पाहिला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. वैष्णोदेवी येथे दर्शनासाठी गेलेल्या औरंगाबादचे प्रवासी नुकतेच सुखरूप परतले आहेत.

वैजापूरच्या बदल्यात पैठण!

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे असलेली वैजापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देऊन त्याच्या बदल्यात पैठण किंवा औरंगाबाद मध्यची जागा पदरात पाडून घेण्यासंदर्भात काँग्रेस वरिष्ठांमध्ये एकमत झाले आहे.

शहरात सोमवारी मेगा शटडाउन

$
0
0
शहराला जायकवाडीपासून पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिनीवरील गळत्यांची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेतर्फे सोमवारी (१५ सप्टेंबर) २४ तासांचे मेगा शटडाऊन घेतले जाणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस शहराला निर्जळीला समोरे जावे लागणार आहे.

औरंगाबादेत १४ मजली टॉवर्स

$
0
0
महापालिकेच्या वर्ग बदलाचे चांगले परिणाम आता लवकरच दिसू लागण्याची शक्यता आहे. वर्ग बदलामुळे शहरात आता १२ ते १४ मजली टॉवर्स (इमारती) उभ्या राहू शकतील, त्यातून शहराचा लुक बदलेल, असे मानले जात आहे.

‘स्वागत’ काळ्या डोक्याचे

$
0
0
मराठी साहित्याच्या परीघात नवे परिणामकारक लिखाण करणारांची संख्या निश्चितच वाढत आहे. साहित्याचे कार्यक्रम म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची सभा नसून तरूणांच्या विचारांना वाट करून देणारे हक्काचे व्यासपीठ आहे.

वैजापूर मतदारसंघ राष्ट्रवादीलाच सुटणार

$
0
0
वैजापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसलाच सुटेल, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवा संवाद कार्यक्रमानिमित्त ते येथे आले होते.

जम्मू-काश्मीरमध्ये परभणीतील तिघे बेपत्ता

$
0
0
जम्मू-काश्मीरमध्ये पुराच्या तडाख्याने हाहाःकार उडाला आहे. त्यातच आता जम्मू-काश्मीरात गेलेल्या नांदेडच्या दोन व्यापाऱ्यांसह परभणीतील एक अधिकारी बेपत्ता असल्याचे समजते. त्यांच्या शोधासाठी जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधला आहे.

माजी शहराध्यक्षाचा मनसेला जय महाराष्ट्र

$
0
0
पक्षातील प्रचंड गटबाजी व अंतर्गत मतभेदाला कंटाळून मनसेचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र आदमाने पाटील यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याचे सांगितले आहे.

चार दशकांची जलसेवा थांबणार

$
0
0
शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी पूर्णपणे बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एखाद्या महिन्यात ही जलवाहिनी बंद केली जाणार आहे. गेली चार दशके या जलवाहिनीने शहरवासीयांना पाणी पुरविले.

पर्यायी व्यवस्था नाही; पाणी जपून वापरा

$
0
0
पाणीपुरवठा योजेनवरील गळत्या दुरुस्त करण्यासाठी सोमवारी (१५ सप्टेंबर) मेगा शटडाउन घेतला जाणार आहे. या काळात पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याबद्दल समांतर जलवाहिनीचे कंत्राटदार असलेल्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीची अद्याप काहीच तयारी नाही.

जालना पोलिसांची आरोपीसह ‘फुक्कट पार्टी’

$
0
0
आरोपीसह जालन्याच्या सदरबाजार पोलिस ठाण्याच्या पथकाने जालना रोडवरील सुंदरवाडी परिसरात एका ढाब्यावर पार्टी केल्याचा प्रकार बुधवारी (१० सप्टेंबर) रात्री अकरा वाजता घडला. तेथे बिल देण्याच्या कारणावरून या पोलिस पार्टीने ढाबा चालकाला मारहाण केली व ते जीपमधून पसार झाले.

नाथसागरातील जलसाठा ४२.३९ टक्क्यांवर

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्हा; तसेच ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात झालेल्या पावसामुळे वरील धरणांमधून पाणी सोडणे सुरू आहे. त्यामुळे पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा गुरुवारी(११ सप्टेंबर) सायंकाळी आठपर्यंत धरणामध्ये ९२०.३०६ दशलक्ष घनमीटरपर्यंत (४२.३९ टक्के) पोचला आहे.

अजिंठा पर्यटन विकासासाठी जपान सरकारचा हातभार

$
0
0
अजिंठा-वेरूळ पर्यटक अभ्यागत केंद्राच्या प्रसिद्धीसाठी जपानमधील वाकायामा प्रांतिक शासन प्रयत्न करीत आहे. याअंतर्गत जपानमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयाला जागा देण्यात आली आहे तर, वाकायामा प्रांताच्या कार्यालयासाठी औरंगाबाद शहरात जागा उपलब्ध करून दिली आहे.

विशेष रेल्वेच्या यादीतून अख्खा मराठवाडा गायब!

$
0
0
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेने तीन विशेष गाड्यांच्या २६ फेऱ्या घोषित केल्या आहेत. या सहा रेल्वेमध्ये एकही रेल्वे मराठवाड्यासाठी सोडण्यात आलेली नाही.

मतिमंदांना मिळू लागली प्रमाणपत्रे

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) मनोविकृती विभागाच्या वतीने मागे सलग दोन-तीन आठवडे मतिमंदत्वाच्या प्रमाणपत्रांचे वाटप ठप्प झाले होते. एरवीही प्रमाणपत्रांचे वाटप दोन-तीन रुग्णांपेक्षा जास्त नव्हते.

जीटीएलच्या एलबीटीचा ग्राहकांना बसणार शॉक

$
0
0
जीटीएल कंपनीने २० कोटी रूपयांची एलबीटी थकबाकी २० सप्टेंबरपर्यंत भरावी, अशी नोटीस पालिकेने दिली आहे. जीटीएल हा एलबीटीचा भार शहरातील ग्राहकांवर टाकणार आहे. पालिका आणि जीटीएलच्या एलबीटी वादामुळे शहरवासीयांसाठी मात्र, वीज महागण्याची शक्यता आहे.

आता शिक्षणामुळेही आत्महत्या

$
0
0
प्राथमिक शिक्षणापासून इंजिनीअरिंग, मेडिकल शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. सरकारी प्राथमिक शाळाही बंद करण्याचा घाट घातला आहे. गोरगरीब मुलांचे शिक्षण उद्या संपलेल असेल. भाषा, सोशल सायन्स, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, संस्कृतसारखे विषय तर बंद पडत आहेत.

गोदावरीवर नव्या धरणाला स्टे

$
0
0
प्रस्तावित किकवी (जि. नाशिक) येथील नव्या धरणाच्या निविदा तात्पुरत्या स्वरुपात स्थगित कराव्यात, असे आदेश औरंगाबाद हायकोर्टाने गुरुवारी (११ सप्टेंबर) दिले. या धरणाची मान्यता रद्द करावी, अशी विनंती औरंगाबादच्या दोघांनी केली होती.

औरंगाबादचे सहा जण बेपत्ता

$
0
0
जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या पावसामुळे मोठ्या संख्यने पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असुन औरंगाबादहून श्रीनगर येथे गेलेले सहा जण बेपत्ता झाले आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images