Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

राष्ट्रवादीत रस्सीखेच

0
0
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी रस्सीखेच सुरू आहे.

धसांकडून कर्जत-जामखेडची चाचपणी

0
0
महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीला जावून श्रीनगरमध्ये तळ ठोकणारे मदत पुनर्वसन राज्यमंत्री म्हणून आष्टीच्या सुरेश धस यांची वेगळी ओळख आहे. मात्र, गेल्या पंधरा वर्षापासून आष्टीतून निवडून येणाऱ्या सुरेश धस यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत आष्टीऐवजी इतर सुरक्षित मतदारसंघाचा पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.

सर्वाधिक मतदान करणाऱ्या ग्रामसमितीचा सत्कार करणार

0
0
सक्षम लोकशाहीसाठी मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन निवडणूक प्रशिक्षण व्यवस्थापन प्रमुख तथा अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील केंद्रशाळा प्रमुख यांची बैठक नवीन कौठा येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

मु‌क्तिसंग्राम दिन साजरा

0
0
हैदराबाद मु‌क्तिसंग्राम दिनाच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त बीड येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त ‌शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

ZPमध्ये वर्चस्वाची लढाई

0
0
राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या असताना या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडीत राष्ट्रवादी सत्ता राखणार ‌की भाजपा सत्तांतर करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात मुक्त‌िसंग्राम दिन साजरा

0
0
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कारावास भोगलेल्या कृष्णकुमार शंकरराव सरोदे यांच्या स्मरणार्थ १९७३ मध्ये उभारण्यात आलेल्या स्मारकाला तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी हैदराबाद मुक्त‌िसंग्राम दिनानिमित्त पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.

मुक्तिसंग्राम साजरा

0
0
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. मुक्तिसंग्राम दिनाची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येऊन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

कारगिल स्मृती वनाचे हस्तांतर

0
0
गारखेड्यातील कारगिल स्मृती वनाची जागा सैनिकी कल्याण विभागाला विकसित करण्यासाठी हस्तांतरित करण्यात आली. ही जागा पालिकेने तीस वर्षांसाठी भाडेकरार करून दिली आहे. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून सैनिक कल्याण विभागाने जागा ताब्यात घेतली. उद्यानाच्या विकासासाठी सैनिकी कल्याण विभागातर्फे सुमारे तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

पालिकेलाही विकले पाणी!

0
0
शहराची पाणीपुरवठा योजना समांतरव योजनेच्या कंत्राटदाच्या ताब्यात गेल्यानंतर टँकरद्वारे दिल्या जाणाऱ्या मोफतच्या पाण्यावर गंडांतर आले आहे. महापालिकेलाही कंत्राटदाराकडून पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत असल्याची माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांना देखील भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी पाणी विकतच घ्यावे लागले.

हॉस्पिटलमध्ये गैरसोय

0
0
सुपरस्पेशालिटीच्या युगात महापालिका रुग्णालयांची स्थिती खेड्यांतील रुग्णालयांपेक्षाही भयंकर आहे. शहरातील २२ आरोग्य केंद्रांत; तसेच पाच रुग्णालयांमध्ये एकाही ठिकाणी सिझेरियन प्रसुती होत नाही तर, नैसर्गिक प्रसुतीदेखील केवळ एकाच ठिकाणी होते. सोनोग्राफीच्या तपासणी सोयही केवळ एकाच ठिकाणी आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांशिवाय इतर कुठल्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची सोय नाही.

लातूरचे निवडणूक रंग

0
0
आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रचारामध्ये काँग्रेस आणि भाजपाकडून इच्छुक असलेल्या मंडळीनी सध्या तरी आघाडी घेतली आहे. आमदार पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेने लातूर जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

सत्तेचा सारीपाट

0
0
औरंगाबाद जिल्हा परिषद पुढील अडीच वर्षांसाठी कुणाच्या ताब्यात जाणार याचा निर्णय रविवारी (२१ सप्टेंबर) लागणार आहे. मूळ औरंगाबादला तयार झालेला पण आता नाशिक पॅटर्न म्हणून ओळखला जात असलेली योजनेनुसार येथे काँग्रेसची सत्ता आहे. त्यानुसार झेडपीत आघाडीसोबत मनसे जाणार की दिलसे युतीच्या पाठिशी राहणार हे पुढच्या दोन दिवसांतील घडामोडींनंतर स्पष्ट होईल.

विजेवरील एलबीटीचा फटका

0
0
स्थानिक संस्था कराची (एलबीटी) वसुली ग्राहकांकडून करण्याची मुभा महावितरणने जीटीएल कंपनील्या दिल्यामुळे दरमहा शंभर युनिट वीज वापरणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांच्या बिलात २२५ रुपयांची वाढ होणार आहे.

बाळासाहेबांचे ऋण भाजप विसरतोय!

0
0
‘लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने शिवसेना खासदार निवडून आल्याचे बोलले जाते. मात्र, मागील दहा वर्षांपासून बाळासाहेबांच्या नावाने राज्यात टिकलेल्या भाजपला, आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा विसर पडला आहे, असा आरोप कॉँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी गुरुवारी केला.

‘सुभेदारी’वर ऑनलाइन वॉच!

0
0
व्हीव्हीआयपींचा पाहुणचार करणाऱ्या सुभेदारी विश्रामगृहाच्या संपूर्ण परिसरावर आता २४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून नजर ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनाही इंटरनेटच्या माध्यमातून ‘सुभेदारी’तील घडामोडी ‘अॅनलाइन’ समजणार आहेत.

सिटीबस सलाइनवर

0
0
चार वर्षांपासून एसट महामंडळाने शहर बस सेवा सुरू केली आणि तेव्हापासूनच या सेवेवर विविध प्रयोग करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे तोट्याच आकंठ बुडालेली ही सेवा सर्वसामान्यांसाठी काडीचीही उपयुक्त ठरलेली नाही.

मतदानासाठी मिळाले ११ तास

0
0
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी निवडणुकीची वेळ घोषित केली आहे.

नांदेडमध्ये काँग्रेस गळती

0
0
नांदेड जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. नायगाव, मुदखेड, उमरी व मुखेड तालुक्यातील ३०० कार्यकर्त्यांनी माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यामुळे काँग्रेसमधील चिंता आणखीनच वाढली आहे.

साठ दिवसांसाठी पोलिस निरीक्षक

0
0
येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यातील ८५ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांना ६० दिवसांसाठी पोलिस उपनिरीक्षक अशी पदोन्नती देण्यात आली. अशा स्वरूपाचे आदेश नांदेडचे विशेष पोलिस महानिरीक्षक जगननाथ यांनी दिले.

जप्तीचा फार्स

0
0
आचारसंहिता काळात निवडणूक आयोगाच्या आदेशाने राज्याच्या विविध भागात छापे मारुन जप्त करण्यात आलेले कोट्यावधी रूपये संबंधितांना परत करण्याची वेळ निवडणूक आयोगावर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत या अनुषंगाने करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एकाही प्रकरणात ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images