Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मेंदुतील रक्तवाहिनीवर यशस्वी अँजिओप्लास्टी

$
0
0
एमजीएम रुग्णालयात मेंदूच्या रक्तवाहिनीवर यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली. मराठवाड्यात या पद्धतीची अँजिओप्लास्टी पहिल्यांदाच करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

...आयुष्य बदलणारी शस्त्रक्रिया!

$
0
0
‘जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळू यावरची शस्त्रक्रिया ही संबंधित व्यक्तीचे जीवनच पालटून टाकते,’ असे अनुभवाचे बोल डॉ. जॉर्ज तेतुरस्वामी यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केले.

देवकरांची निवडणूक तुरुंगातूनच

$
0
0
घरकुल घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार गुलाबराव देवकरांचा जामीन अर्ज हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला. गुरुवारी (१८ सप्टेंबर) यावर सुनावणी झाली. त्यामुळे देवकरांची विधानसभा निवडणूक तुरुंगातूनच लढावी लागणार आहे.

अहमदाबादमधील अपघातात औरंगाबादच्या चौघांचा मृत्यू

$
0
0
अहमदाबादेत (गुजरात) गुरुवारी पहाटे (१८ सप्टेंबर) झालेल्या कार अपघातात शहरातील चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. व्यावसायिक कामानिमित्त हे सर्व जण टाटा सफारीने जात असतानाच त्यांची गाडी कंटनेरवर धडकली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांच्या मुलाचा अपघातात मुत्यू झाला आहे.

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

$
0
0
बीड लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक दक्ष रहावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

कार्यकर्त्यांची चांदी

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आघाडी व महायुती यांचे जागा वाटप होवून उमेदवरांची यादी जाहीर होण्याअगोदरच प्रचारासाठी इच्छूकांची धांदल उडाली आहे. या प्रचारामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना व भाजप आणि राष्ट्रीय समाज पार्टीच्या इच्छुकांनी आघाडी घेतली आहे.

दानवेंचा कस लागणार

$
0
0
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीत अनेक मातब्बरांना भाजपमध्ये आणले. या विधानसभा मतदारसंघातून दानवेंना ३३ हजारांची आघाडी मिळाली. त्यामुळे उमेदवार अंतिम करताना दानवे यांचाच आधी कस लागणार आहे. ते कोणाच्या पारड्यात वजन टाकतात, याकडे सर्व इच्छुकांचे लक्ष आहे.

झेडपीवर भगवा?

$
0
0
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक दोन दिवसांवर आली आहे. शिवसेना भाजपयुतीने मनसेच्या इतर सदस्यांना सोबत घेऊन अध्यक्षपद मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

‘ग्रुप फार्मिंग’मुळे मालामाल

$
0
0
आधुनिक तंत्रज्ञान वापरून कापसाचे विक्रमी उत्पादन काढण्याचा प्रयत्न ‘ग्रुप फार्मिंग’ उपक्रमात सुरू आहे. यावर्षी तालुक्यातील आडगाव सरक येथील शेतकऱ्यांनी कापूस पिकात नवीन पद्धत वापरली आहे. त्यामुळे विक्रमी उत्पादनासाठी पिकाची अनुकूल वाढ झाली आहे. ‘ग्रुप फार्मिंग’ पद्धतीने काही गावांनी एकरी तीस क्विंटल उत्पादन काढले आहे.

सोशल साइटवर प्रचाराची धूम

$
0
0
लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाद्वारे परिणामकारक प्रचार झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीतही प्रचारासाठी उमेदवारांनी ‘सोशल’ पर्याय स्वीकारला आहे. नाशिक, पुणे व दिल्ली या शहरांतील नामांकित कंपन्या सोशल मीडियातील प्रचारासाठी सक्रिय झाल्या आहेत.

आठवलेंचा रामबाण

$
0
0
‘विधानसभेच्या जागावाटपात टोकाची भूमिका घेण्यापेक्षा शिवसेनेने भाजपला सात ते दहा जागा जास्त द्याव्यात,’ असा तोडगा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी सुचवला आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप तुच्छ, शिवसेना श्रेष्ठ!

$
0
0
लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप आणि इतर पक्षांच्या महायुतीचे संयुक्त यश दिसत असले, तरी त्यात मोदी लाटेचा थोडाफार हातभार नक्कीच होता. तरीही भाजपला तुच्छ लेखण्याची जणू स्पर्धाच शिवसेनेत सुरू झाली आहे.

उत्सवाचा खर्च उमेदवारांना पडणार महागात

$
0
0
आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे दुर्गा महोत्सव व अन्य सण, उत्सवाचा खर्च करणे इच्छूक उमेदवारांना महागात पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आगामी उत्सवांचा निवडणूक प्रचारासाठी कोणत्याही परिस्थितीत वापर करू नये. राजकीय कारणासाठी आणि कोणत्याही स्वरूपातील निवडणूक प्रचारासाठी सण, उत्सवाचा वापर केल्याचे लक्षात आल्यास, ही बाब निवडणूक खर्चात गृहीत धरण्यात येईल, अशी तंबी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिली.

हदगाव तालुक्यात साथीच्या रोगाची लागण

$
0
0
हदगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे डासांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मलेरिया व डेंगीया साथीची लागण होत असून जांभळसावली येथे एका महिलेचा मृत्यू झाला. त्यासोबतच मनाठ्यासह लॅहरी, धानोरा, रुई, पळसा येथे देखील डेंगीचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

हिंगोलीत डेंगीचे पाच बळी

$
0
0
हिंगोली जिल्ह्यात गेल्या पंधरवाड्यात डेंगीचे पाच बळी गेले आहेत. परभणी जिल्ह्यात डेंगीसदृश्य आजाराचे रुग्ण खासगी व शासकीय रुग्णालयात वाढत आहेत. आरोग्य खाते मात्र त्यावर उपाययोजना अत्यंत मंद गतीने करताना दिसते त्यामुळे ग्रामीण, शहरी भागांतील रुग्णांचे हाल सुरू आहेत.

अटक टाळण्यासाठी विषप्राशन

$
0
0
कोर्टाच्या आदेशावरून वॉरंट घेऊन अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना हुलकावणी देत अटक टाळण्यासाठी आरोपीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ह‌ी घटना उस्मानाबाद शहरालगत असलेल्या घाटंग्री तांडा येथे गुरुवारी सकाळी घडली.

३२ लाखांचे मोबाइल जप्त

$
0
0
खामगाव फाट्यावर आचारसंहिता भरारी पथकाने शुक्रवारी (१९ सप्टेंबर) ३२ लाख रुपयांचे मोबाईल एका जीपमधून जप्त केले. विशेष म्हणजे वाहनचालकाकडे फक्त चार लाख १३१ रुपयांचा माल असल्याती पावती आहे. या प्रकरणी विक्रीकर खात्याच्या चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

मनसेची भूमिका महत्त्वाची

$
0
0
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी आशेचा किरण दिसल्यामुळे शिवसेना - भाजप युतीही सक्रीय झाली आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने मात्र पुढील अडीच वर्षे आपल्याच ताब्यात सत्ता राहावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अध्यक्षपदासाठी रविवारी (२१ सप्टेंबर) निवडणूक होत आहे.

दागिने पळविणारी टोळी पकडली

$
0
0
सोन्या चांदीच्या दुकानदाराला बोलण्यात गुंतवून दागिने लंपास करणाऱ्या टोळीला शुक्रवारी सकाळी (१९ सप्टेंबर) मुकुंदवाडीत पकडण्यात आले. ही कारवाई वाशिम पोलिस व गुन्हे शाखेने संयुक्तपणे केली. महागडी कार वापरणाऱ्या या टोळीला वाहनासह वाशिम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

डॉक्टरचे क्रेडिट कार्ड हॅक

$
0
0
एक महिला डॉक्टर डॉक्टर औरंगाबादमध्ये असताना त्यांच्या क्रेडिट कार्डवरून म्हैसूर येथे ४५ हजार रुपयांची खरेदी करण्यात आली आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images