Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उद्धव ठाकरे तुळजाभवानीच्या दर्शनाला

0
0
तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावून आघाडी घेतली. त्यांनी दर्शन घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकू दे असे साकडे घातले.

गोरंट्याल यांची उमेदवारी दाखल

0
0
काँग्रेसचे जालन्यातील विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांनी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज गुरूवारी दाखल केला. नव्या जालन्यातील शिवाजी पुतळा येथून निघालेल्या कार्यकर्त्यांच्या रॅलीने शहरातील प्रमुख मार्गावरून जात जुन्या जालन्यातील घायाळ नगरात काँग्रेसच्यावतीने प्रचारसभा झाली.

दोन नवीन चेहऱ्यांना संधी

0
0
लातूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या चार ही मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारी घोषित केली. या मध्ये विद्यमान आमदार माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील आणि लातूर ग्रामीण मतदारसंघातील वैजनाथ शिंदे या दोघांना वगळण्यात आले आहे.

शोध प्रबळ उमेदवारांचा

0
0
शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युती संपुष्टात आल्यामुळे तुटल्यामुळे जिल्ह्यात दोन्ही पक्षांसमोर ‘मित्रपक्षा’तील मतदारसंघात प्रबळ उमेदवार शोधण्याचे आव्हान आहे. दोन्ही पक्षांकडे सर्वच मतदारसंघात निवडून येऊ शकणारे उमेदवार नाहीत.

डॉ. झके‌रियांचे ‘झकास’ शहर दर्डांनी केले ‘भकास’

0
0
‘औरंगाबाद शहर’ विद्यमानमंत्री राजेंद्र दर्डा यांनी भकास केल्याचा आरोप करत व काँग्रेस आता भ्रष्टाचाराने बरबटलेली असल्याचे सांगत आपण काँग्रेसचा राजीनामा देत आहोत व औरंगाबाद पूर्व मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढवत आहोत, असे माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

सात दुकाने सील

0
0
थकित मालमत्ताकर वसुलीसाठी महापालिकेच्या पथकाने भावसिंगपुरा भागात गुरुवारी (२५ सप्टेंबर) कारवाई केली. ही कारवाई करताना पथकाने एक दुकानही सील केले. दरम्यानच्या काळात दुकान मालकांनी शिवीगाळ करून कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती वॉर्ड ‘अ’च्या अधिकारी रोशन मकवाणे यांनी दिली.

विनोद पाटील यांना अटक व सुटका

0
0
राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील यांनी सिटीचौक पोलिस ठाण्यात हजर होऊन गुरुवारी (२५ सप्टेंबर) अटक करून घेतली. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. विनोद पाटील यांच्यावर बुधवारी (२४ सप्टेंबर) मध्यरात्री समर्थकांकरवी पैसे वाटप केल्याचा आरोप आहे. ‌विनोद पाटील यांनी हे त्यांच्या विरूद्ध षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

जैस्वाल,शिरसाठ कोट्यधीश

0
0
पितृपंधरवड्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होत आहे. अर्ज भरलेल्या बहुतांश महत्त्वाचे उमेदवार कोट्यधीश आहेत. मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी सुमारे ९ कोटी १५ लाख तर, पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ यांनी सुमारे अडीच कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा तपशील सादर केला आहे.

नवरात्र उत्सवाला सुरुवात

0
0
‘आई राजा उदो उदो...’ च्या गजरात तुळजापूर येथे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास गुरुवारी विविध धार्मिक विधीने सुरुवात झाली. गोमुखापासून वाजत गाजत घट कलशाची मिरवणूक काढण्यात येऊन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांचे हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली.

मतविभाजन अटळ

0
0
महाराष्ट्रातील हिंदुत्त्ववादी मतांची फूट टाळण्यासाठी सुमारे पाव शतकापूर्वी करण्यात आलेली शिवसेना-भाजप युती अखेर तुटली. त्यापाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीही फुटली. निवडणुकीपूर्वीच सत्तांतर झाल्याच्या आविर्भावात विशेषत: शिवसेनेने घोषणा केल्या, तर सत्तांतर होणारच नाही असा समज काँग्रेसने करवून घेतला. त्याचे पडसाद या चारही पक्षांच्या जागावाटपाच्या चर्चेत उमटले.

पाणी धोरणाला ठेंगा

0
0
महापालिकेबरोबर करार करताना ठरवण्यात आलेल्या पाणी धोरणाला समांतर जलवाहिनीचे कंत्राटदार असलेल्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने ठेंगा दाखवला आहे. टँकरच्या संदर्भात गुंठेवारी भागात समांतरच्या कंत्राटदारांनी आपल्या सोईचे धोरण ठरवल्यामुळे या भागातील नागरिकांची टँकरसाठी ससेहोलपट होत आहे.

२२,५०० जणांना हजार रुपये पेन्शन

0
0
धनंजय कुलकर्णी, औरंगाबादकर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘एम्प्लॉइज प्रॉव्हिडंड फंड ऑर्गनायझेशन’तर्फे (ईपीएफओ) चालविल्या जाणाऱ्या ‘एम्प्लॉइज पेन्शन स्कीम १९९५’मध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशातील ३२ लाख पेन्शनरांना प्रतिमहिना किमान एक हजार रुपये पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

औरंगाबाद मध्य मध्ये मतविभाजन अटळ

0
0
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीत बेबनाव झाल्यानंतर औरंगाबाद मध्य मतदारसंघाची समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. एमआयएम आणि समाजवादी पार्टीच्या उमेदवारांमुळे मुस्लिम मतांचे विभाजन होणार आहे.

पश्चिममध्ये बहुरंगी लढत

0
0
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठी रंगत पाहावयास मिळणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे, बसप अशी बहुरंगी लढत पाहावयास मिळणार आहे. शेवटच्या टप्प्यात हे चित्र आणखी रंगतदार असेल.

मतांचे गणित बिघडले

0
0
युती आणि आघाडीतल्या फाटाफुटीने विधानसभा निवडणुकीचे समीकरण पूर्णतः बदलले आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात भाकप, एमआयएम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराबरोबर कॉँग्रेसमधून बाहेर पडलेले नाराज माजी खासदार उत्तमसिंह पवार रिंगणात आहेत. त्यामुळे पारंपारिक मताचे विभाजन अटळ आहे.

हृदयरोग्यांचे प्रमाण वाढले

0
0
देशाची पाच टक्के म्हणजेच सहा कोटी जनता हृदयरोगी आहे. ग्रामीण भागात हृदयरोग्यांचे प्रमाण चार ते सहा टक्के, तर शहरी भागात हृदयरोग्यांचे प्रमाण तब्बल दहा ते बारा टक्के आहे. गेल्या ३० वर्षांत हा विकार ३०० टक्क्यांनी वाढला असून, एकूण हृदयरोग्यांमध्ये ३० टक्के रोगी हे चाळीशीतील, तर १५ टक्के रोगी हे तिशीतील तरुण आहेत.

सरकारने दिले; बँकांनी लुबाडले

0
0
शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज बिगरव्याजी देण्याचे आदेश न पाळणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीच्या प्राथमिक चौकशीत शेतकऱ्यांना बँकांनी लुबाडल्याचे उघडकीस आले आहे.

बस्वराज राष्ट्रवादीत

0
0
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, प्रवक्ते बस्वराज पाटील नागराळकर यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्याबरोबर औसा तालुक्यातील साई शुगर या खासगी कारखान्याचे चेअरमन अॅड. राजेश्वर बुके यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या दोंघाचे स्वागत माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे आणि आमदार विक्रम काळे यांनी केले.

प्रीतम मुंडेंचा लोकसभेसाठी अर्ज

0
0
बीड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या डॉ. प्रीतम खाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी भरला. या वेळी त्यांनी विकासाचा मुद्दा घेऊन राजकारण करणार असल्याचे स्पष्ट केले.

चोरट्यांचे उद्योग तेजीत

0
0
वाळूज पोलिस ठाण्यात अधिकारी बदलीच्या प्रतीक्षेत गेल्या महिन्यापासून सुस्त झाले आहेत. तर चोरटे संधीचे सोने करत, मस्त झाले आहेत. त्यांनी महिन्याभरात तब्बल दहा ठिकाणी डल्ला मारून लाखो रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे परिसरात सध्या अंधेर नगरी आणि चौपट राजा असेच चित्र आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images