Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आयोगाला उमेदवारांच्या टोप्या

$
0
0
विधानसभा निवडणुकीत प्रचार खर्चाच्या बाबतीत निवडणूक आयोगाला टोप्या घालाण्याचे काम उमेदवारांकडून सुरू आहे. यामुळे खर्च कक्षाला व्हिडिओ सीडीवरून उमदेवारांच्या प्रचाराची बारकाईने तपासणी करावी लागत आहे.

'RBI मुख्यालय मुंबईतच राहणार'

$
0
0
रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबईतून इतरत्र स्थलांतरित करणार, ही केवळ विरोधकांनी उठवलेली अफवा आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकाराच्या काळात राज्यात अनेक घाटोळे झाले असून, त्यांनी आधी या १५ वर्षांचा हिशेब द्यावा आणि नंतरच भारतीय जनता पक्षावर टीका करावी, असे प्रत्युत्तर केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी (७ ऑक्टोबर) दिले.

भाजपला सत्तेची घमेंड

$
0
0
‘राज्यात गेल्या पंधरा वर्षांत असलेली राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसची आघाडी होती. मात्र, मुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादीचा डोळा होता. त्यामुळे राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदासाठी आघाडी तोडली’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

...म्हणून युती तोडलीत का?

$
0
0
महाराष्ट्राचा तुकडा पाडण्यासाठी युती तोडलीत का, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजपला केला. विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या नऊ उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे औरंगाबादेत आले होते.

अजित पवारांच्या बॅगेत ४ लाखाची कॅश

$
0
0
मतदानाचा दिवस जवळ येत असताना राज्यात काळ्या पैशांना उत आला असून आज, बुधवारी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे तपासणीदरम्यान एका कारमधून ४ लाख ८५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या गाडीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे व्हिजिटिंग कार्ड सापडले आहे.

शास्त्रींवर आचारसंहितेचा गुन्हा

$
0
0
दसऱ्याच्या दिवशी भगवानगडावर मेळावा घेऊन या मेळाव्यात राजकीय भाषणे केल्याच्या मुद्द्यावरून या गडाचे महंत व दसरा मेळाव्याचे मुख्य संयोजक नामदेव शास्त्री यांच्यावर भरारी पथकाचे प्रमुख देवराव रामभाऊ भोईटे यांनी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

मोदींच्या कृती आणि उक्तीत मोठे अंतर

$
0
0
लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान आणि चीनच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. आता त्यांच्या कार्यकाळातही चीन-पाककडून घुसखोरी आणि गोळीबाराच्या कारवाया होत आहेत.

‘देशमुखी’ टिकविण्यासाठी सर्व काही!

$
0
0
लातूर शहर विधानसभेची निवडणूक ही चुरशीची होईल असे वाटत नव्हते; परंतु भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्यामुळे ती चुरशीची झाली आहे. आजची चुरस मतपेटीतून किती टिकेल हे महत्त्वाचे मानले जात आहे.

अजित पवारांच्या बॅगांमध्ये पाच लाख

$
0
0
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरमधून पूर्णा येथे राहून गेलेल्या बॅगांमध्ये ४ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम सापडली असून, ही रक्कम गंगाखेड पोलिसांनी जप्त केली आहे.

‘अच्छे दिन’वर विश्वास नको

$
0
0
‘भारतीय जनता पक्षाने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली केंद्रातील सत्ता काबीज केली. परंतु, शंभर दिवसांत कोणते अच्छे दिन आले? ‘अच्छे दिन’च्या नावाखाली भाजप विधानसभेच्या निवडणुकीत तसाच प्रकार करू पाहत आहे. त्यावर विश्वास ठेऊ नका,’ असे आवाहन उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी नांदेड येथील सभेत केले.

शेतकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार

$
0
0
हदगाव तालुक्यातील शिबदरा म. येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. तसे निवेदन हदगावच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे.

‘घृष्णेश्वर’च्या नावे मतांचा जोगवा

$
0
0
खुलताबाद तालुक्यातील विधानसभेची निवडणूक उभारणीआधीच दिवाळखोरीत निघालेल्या गदाना- खतनापूर येथील घृष्णेश्वर सहकारी साखर कारखान्याभोवती गेल्या पस्तीस वर्षापासून फिरत आहे.

आघाडीचे घोटाळ्यांचे शतक

$
0
0
आघाडी सरकारने पंधरा वर्षांच्या कार्यकाळात १०१ घोटाळे करून महाराष्ट्राला देशोधडीला लावले आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सिल्लोड येथे बुधवारी (९ सप्टेंबर) झालेल्या सभेत केला.

पसार आरोपी अटकेत

$
0
0
शहरातील डॉ. डॉ. अजिज अहमद कादरी यांच्या कांचनवाडी येथील जमिनीच्या प्रकरणात एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्र्रकरणातील आरोपी प्रकाश बोडखे याला गुन्हे शाखेने बुधवारी (८ ऑक्टोबर) अटक केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटारडे

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. केंद्र सरकारने गेल्या तीन महिन्यांत घेतलेल्या उदाहरणासंह मी दाखवून दिले आहे. विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका बसेल, या भीतीने आता मोदी भाषणांमधून खुलासा करत आहेत.

घाटीत संपामुळे रुग्णांचे हाल

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) निवासी डॉक्टरला मारहाण केल्यावरून सोमवारी (६ ऑक्टोबर) मध्यरात्रीपासून सुरू झालेला बेमुदत संप बुधवारीही (८ ऑक्टोबर) कायम होता.

मंत्री मतदारसंघांमध्येच अडकले

$
0
0
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोमात आला आहे. युती आणि आघाडी दोन्हीही भंगल्याने चार प्रमुख पक्षांसह मनसे रिंगणात आहे. मतांची विभागणी अटळ असल्याने विजयाच्या काळजीने मराठवाड्यातील सर्व मंत्री आपापल्या मतदारसंघात अडकले आहेत.

सरकारकडून काँग्रेसचीच धोरणे

$
0
0
भाजपच्या नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार काँग्रेस सरकारचीच धोरणे राबवत असल्‍याची टीका बहुजन समाज पक्षाच्या राष्‍ट्रीय अध्‍यक्षा मायावती यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्‍या प्रचारासाठी जालना येथे झालेल्या सभेमध्ये मायावती यांनी मोदी यांच्यावर टीका केली.

पंतप्रधानांचे मौन का?

$
0
0
‘पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी प्रचारात सांगत होते, की मला निवडून द्या, त्यानंतर चीन, पाकिस्तानचे काही चालणार नाही. परंतु, आता घुसखोरी होत असून, पाकिस्तान गोळीबार करत आहे. असे असताना पंतप्रधान गप्प का आहेत,’ असा सवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

शहांनी शिवसेनेचा उंदीर केला!

$
0
0
‘अफझलखानाची फौज, महिषासुर, महाराष्ट्र तोडणारे’ अशा शब्दांत भाजपला हिणवणाऱ्या शिवसेनेला भाजपने त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. अमित शहा यांनी शिवसेनेची तुलना अप्रत्यक्षपणे उंदराशी केली आहे. ‘ज्या उंदराला वाघ बनविले तोच आता त्याच्या ‘करवित्याला’ खायला निघाला आहे,’ असा टोला शहांनी हाणला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images