Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

१५० कोटींच्या करारांची संधी

$
0
0
ऊर्जा, आयटी, हेल्थ सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो अशा विविध पंधरापेक्षा अधिक क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व युरोपियन युनियनमधील विद्यापीठांच्या सहकार्याने संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

राणे एकमेव स्टार प्रचारक

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसकडून राज्यभर फिरण्यासाठी नारायण राणे हे एकमेव स्टार प्रचारक आहेत. एका दिवसात तीन ते पाच सभांचा धडाका लावत आहेत. काँग्रेसचे अन्य बडे नेते आपापल्या मतदारसंघातच अडकल्याने राणेंवर प्रचाराची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

महापालिका पडली ओस

$
0
0
निवडणूक फिव्हरमुळे महापालिकेत सामसूम आहे. अधिकारी, कर्मचारी निवडणुकीच्या कामाला लागल्यामुळे सर्वसामान्य माणसांना त्यांच्या कामांसाठी आता २० ऑक्टोबरनंतरच महापालिकेत येण्याची सूचना केली जात आहे.

कारणे नकोत; पाणी द्या

$
0
0
विस्कळित झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांसह नगरसेवक त्रस्त झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी सिडको - हडको भागातील काही नगरसेवकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन विस्कळित झालेल्या पाणीपुरवठ्या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

चोरडियांचा सेनेला जय महाराष्ट्र

$
0
0
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बजाजनगरातील एका जिल्हा परिषदेच्या सदस्यांसह ६ ग्रामपंचायत सदस्यांनी शुक्रवारी (१० ऑक्टोबर) केंद्रीयमंत्री उमा भारती यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

केबीसी प्रकरणात गुन्हा

$
0
0
केबीसी प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब छबू चव्हाणसह अन्य दहा आरोपींवर कलम १५६ (३) फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एल. पठाण यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्याला दिले आहेत.

पोलचिटमुळे ‘बीएलओं’ची भंबेरी

$
0
0
मतदानाची तारीख जवळ येऊन ठेपल्याने राजकीय पक्षांबरोबरच निवडणूक विभागाचीही लगीनघाई सुरू झाली आहे. आठवडाभरापासूनच पोलचिटचे वाटप सुरू झाले असून, आतापर्यंत साठ टक्क्यांहून अधिक पोलचिटचे वाटप करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

मुस्लिमांचा विकास रखडला

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून एमआयएमवर विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत. हा पक्ष जातीवादी असल्यापासून ते हैदराबादचे पार्सलपर्यंत आरोप विरोधक करीत आहेत. गेल्या १५ वर्षांच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या धोरणांमुळे मुस्लिम, दलित समाजाचा विकास झाला नाही.

महाराष्ट्र लोडशेडिंग मुक्त करू

$
0
0
राज्यात लोडशेडिंग सुरू आहे. त्यामुळे अनेक कामे बंद पडली आहेत. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर राज्य लोडशेडिंग मुक्त करु असे अश्वासन केंद्रिय ग्रामविकासमंत्री नितीन गडकरी यांनी लातूर येथील सभेत दिले.

गुजरात मॉडेल चालणार नाही

$
0
0
महाराष्ट्रात गुजरात मॉडेल चालणार नाही. याठिकाणी फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे मॉडेल चालेल, असे मत माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केले.

शिवसेनेतून आउटगोइंग सुरूच

$
0
0
खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर तोफ डागत सिडको एन ६ वॉर्डाचे शिवसेनेचे नगरसेवक हुशारसिंह चव्हाण यांनी शनिवारी (११ ऑक्टोबर) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या बरोबर आजी-माजी शाखा प्रमुख, उपविभाप्रमुख अशा ४० जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दादागिरी चालणार नाही

$
0
0
दिल्लीची दादागिरी महाराष्ट्रात चालू देणार नाही, असे प्रतिपादन युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिल्लोड येथे आयोजित जाहीर सभेत केले.

रसायनांच्या स्फोटात २ ठार

$
0
0
साठवलेल्या रसायनांच्या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला. परभणी शहरातील महादेव मंदिर परिसरामध्ये ही घटना शनिवारी सकाळी घडली.

१० % पाणीपट्टी वाढीचे ‘गिफ्ट’

$
0
0
महापालिकेच्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाचे ‘साइड इफेक्ट’ आता नागरिकांच्या समोर येऊ लागले आहेत. घरगुती वापराचे अर्धाइंची नळ कनेक्शन घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना नऊ ते अकरा हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

निवडणूकपूर्व सर्वेवर बंदीची मागणी

$
0
0
निवडणूकपूर्व सर्वेक्षण जाहीर झाल्यामुळे काही पक्षांच्या गोटात आनंद झाला तर, काही पक्ष चिंताग्रस्त झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अंदाजाप्रमाणे राज्यातील निकालाचे अंदाज खरे ठरतील अशी चर्चा सुरू आहे.

सीतारामन यांचा प्रचार BJPसाठी अडचणीचा

$
0
0
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योजकांच्या कार्यक्रमामध्ये पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केल्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च उमेदवार किंवा पक्षाच्या नावावर जाण्याची शक्यता आहे.

आघाडी सरकारने १०१ घोटाळे केले

$
0
0
‘महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर होता. आता प्रत्येक क्षेत्रात पिछाडीवर गेला आहे. कॉँग्रेस - राष्ट्रवादीच्या सरकारने १५ वर्षाच्या काळात १०१ घोटाळे केले. तब्बल ११ लाख ८८ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. आघाडीच्या नेत्यांची नियत चांगली नाही, म्हणूनच राज्यात दहा वर्षांपासून दुष्काळ पडतो,’ अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी केली. ते जालना येथे बोलत होते.

जनजागृतीसाठी चालकांचाही पुढाकार

$
0
0
रिक्षावर चालकांनी स्टिकर व बॅनर लावून नांदेड शहरात मतदानाची जनजागृतीला रविवारी सुरुवात केली. जिल्हा निवडणूक अधिकारी धीरज कुमार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून अॅटो जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना करण्यात आले.

भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण

$
0
0
लातूरमधाील भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचार सभेची तयारी करणाऱ्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक दीपक सुळ, महापालिकेचे कर्मचारी बंडू किसवे यांच्यासह पंधरा जणांविरूद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

‘लोकसभाप्रमाणे चूक करू नका’

$
0
0
‘काही दिवसांपूर्वी झालेल्या नांदेडच्या लोकसभा निवडणुकीत केलेली चूक पुन्हा विधानसभा निवडणुकीत करू नका,‘ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images