Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तुळजापूरला हिंदुस्थानचे श्रद्धास्थान करणार

$
0
0
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा छत्रपती शिवाजी महाराजांची वरदायिनी असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेला हिंदूस्थानातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान करणार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुळजापूर येथे दिली.

दिल्लीची दादागिरी चालणार नाही

$
0
0
दिल्लीची दादागिरी महाराष्ट्रात चालू देणार नाही, असा इशारा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिल्लोड येथे शनिवारी (११ ऑक्टोबर) झालेल्या जाहीर सभेत दिला.

मंदिराचे छत कोसळून एक ठार

$
0
0
नागेश्वरवाडी, भोईवाडा भागातील गोरक्षनाथाच्या मंदिराचे छत रविवारी (१२ ऑक्टोबर) सायंकाळी साडेपाच वाजता कोसळून कोसळून एक महिला ठार झाली व एक जण जखमी झाला आहे.

प्रक्षेपण ठरतेय जीवन

$
0
0
भारतातील स्पेशल केस म्हणून शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलच्या वतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) तब्बल सात देशात एकाचवेळी थेट प्रक्षेपण नुकतेच करण्यात आले.

मोदी ड्रेसची आबालवृद्धांना भुरळ

$
0
0
रमजान ईद झाल्यावर तब्बल दोन महिन्याच्या खंडानंतर दिवाळीनिमित्त कपडे खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. ग्राहकांनी सुटी असल्यामुळे रविवारी (१२ ऑक्टोबर) कापड खरेदीसाठी झुंबड केली होती.

सभांचा खर्च गुलदस्त्यात

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रचार सभांचा खर्च अद्याप निवडणूक कार्यालयाकडे सादर करण्यात आलेला नाही. हा खर्च सादर करणे आवश्यक आहे.

...जळात उरले फक्त निळेपण!

$
0
0
अर्धे औरंगाबाद बाटली बंद पाण्याचा पिण्यासाठी वापर करते. जिथे महापालिकेचे पाणी येत नाही, तिथे सर्रास पाण्याचे जार मागविले जातात. एखादा सण, उत्सव, समारंभ, लग्न असेल तर तिथेही बाटली बंद पाणी, पाण्याचे जार असतातच. हे पाणी नऊ प्रक्रियेतून शुद्ध केले जाते.

राजकीय भाकितावर गरमागरमी

$
0
0
निवडणूकपूर्व सर्वेक्षण जाहीर झाल्यामुळे काही पक्षांच्या गोटात आनंद झाला तर, काही पक्ष चिंताग्रस्त झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अंदाजाप्रमाणे राज्यातील निकालाचे अंदाज खरे ठरतील अशी चर्चा सुरू आहे.

राज्यात भाजपचे बहुमत येणारच

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा रविवार सत्कारणी लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यामध्ये दोन सभा घेतल्या. दोन्ही सभेमध्ये त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका करतानाच, राज्यात भाजप स्वबळावर सत्तेवर येईल, असा दावा त्यांनी केला.

रबीच्या पेरण्या रखडल्या

$
0
0
जिल्ह्यात परतीचा पाऊस पडला नसल्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पेरणीसाठी किमान ५० मिलीमीटर पावसाची गरज आहे; मात्र मागील एक महिन्यापासून उघडीप दिल्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.

थ्री-डी पुरवणी, चष्मे वाटपाची परवानगी घेतली का?

$
0
0
औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमदेवार राजेंद्र दर्डा यांनी मतदारसंघात पुस्तिका, थ्री डी स्वरुपात असलेली रंगीत पुरवणी; तसेच चित्र पाहण्यासाठी चष्म्याचे वाटप केले.

विकासाचे मुद्दे विसरलेला प्रचार

$
0
0
मतदान अवघ्या काही तासांवर आले आहे. जालना जिल्ह्यात फक्त आरोप-प्रत्यारोप, घराणेशाही याभोवती निवडणुकीचा प्रचार फिरला. विकासाचे मुद्दे मात्र हवेत विरले.

नेमबाज, चित्रकार अन् बासरीवादक

$
0
0
इयत्ता चौथीमध्ये असताना त्यांनी मोठ्या भावाने आणलेली बासरी वाजवली आणि तेव्हापासून बासरी त्यांच्या ‌जीवनाची अविभाज्य घटकच बनली. रूक्ष विभाग अशी प्रतिमा असलेल्या पोलिस खात्यात उत्कृष्ट नेमबाज म्हणून ख्याती असलेले सहायक फौजदार प्रल्हाद चेंडीराम शेळके यांची ओळख एक उत्कृष्ट बासरीवादक‌ म्हणून निर्माण झाली आहे.

पणन संचालकांचे निलंबन रद्द

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसह अनेक बड्या धेंडांवरील कारवाईमुळे निलंबित करण्यात आलेले राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांचे निलंबन रद्द करण्याचा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) सोमवारी दिला.

इलेक्शन इफेक्ट; एटीएमवर शुकशुकाट

$
0
0
ऐन निवडणुकीच्या कालावधीत एटीएममधून पैसे काढण्यासाठीची गर्दी आश्चर्यकारकरित्या कमी झाली आहे. पण त्याच वेळी बँकांमध्ये पैसे काढणे व टाकणे यासाठी मोठी गर्दी आहे.

तीस लाखांच्या पेट्रोलचा धूर

$
0
0
उमेदवारांचा जय जयकार करीत प्रचार फेरीत उतरलेल्या कार्यकर्त्यांमुळे सोमवारी (१३ ऑक्टोबर) ३५ हजार लिटर पेट्रोलची अतिरिक्त विक्री झाली. त्यासाठी सुमारे तीस लाख रुपये खर्च केले आहेत. या तीस लाख रुपयांच्या पेट्रोलचा एका दिवसात धूर निघाला.

विनाअनुदानित धोरण रद्द करा

$
0
0
शासनाने विनाअनुदानित शिक्षण धोरण रद्द करावे. शाळांना परवानगी देताना अनुदानित शाळा म्हणूनच द्यावी, अशी याचिका खेड येथील चंद्रभान लोमटे बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे.

पोलिस पोहोचणार, अवघ्या चार मिनिटांत

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे पोलिसांनी जय्यत तयारी केली असून, अनुचित घटना घडल्यानंतर अवघ्या चार मिनिटांत फौजफाटा घटनास्थळी दाखल होईल, अशी माहिती पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी दिली.

नगरसेवक चक्क नजरकैदेत!

$
0
0
शिवसेनेचे विशिष्ट नगरसेवक दोन दिवसांपासून नजरकैदेत आहेत. भाजपच्या उमेदवारांना हे नगरसेवक मदत करतात, अशी शंका घेऊन कार्यकर्त्यांमार्फत त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारामुळे नगरसेवकांच्या प्रचार फेऱ्यांत सहभागी होण्यावरही बधने घालण्यात आली होती.

मतदानाच्या दोन दिवसांआधी उघडला सट्टा बाजार

$
0
0
विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढवित असल्याने सट्टा बाजारात संभ्रमाचे वातावरण होते. मतदानाच्या दोन दिवसांआधीच सट्टा बाजारात बुकींनी भाव घेण्यास सुरुवात केली आहे. बहुतांश मतदारसंघातील लढती चुरशीच्या असून, उमेदवारांसाठी ५० पैशांपासून पाच रुपयांपर्यंत भाव देण्यात आले आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images