Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘वीस वर्षांपूर्वीचा काळ कार्यकर्त्यांचा’

$
0
0
तो काळ खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा होता. समाजात प्रतिष्ठा असलेलीच माणसे निवडणूक लढवित. मतदारही हाच निकष पहायचे. पैशा हे माध्यम नव्हते. कारखानदार, गुत्तेदार, गुंड अशा प्रवृत्तींना तेव्हा उमेदवार म्हणून स्थान नव्हते.

...सरकार, सरकार, सरकार!

$
0
0
थेट मुद्द्यालाच हात घालतो. तुमी कामन अडचणीत आणून राह्यले राव आम्हाला. या प्रश्नानं तुम्ही गोंधळात पडाल. त्याचं कायय, आमचं नाव पडलं आबा. तसे आम्ही राहतो औरंगाबादच्या दिवाण देवडीत.

मतदार भेटीवर उमेदवारांचा भर

$
0
0
शहर मध्य मतदारसंघातील उमेदवारांनी प्रचाराचा शेवटचा दिवस मतदारांच्या भेटीसाठी वापरला. विशेषतः हडको परिसरात उमेदवारांची सर्वाधिक वर्दळ होती. शिवसेनेने ‘बाइक रॅली’ काढून वातावरणनिर्मिती केली.

पदयात्रा, फेऱ्यांनी प्रचाराची सांगता

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी काढलेल्या पदयात्रा, प्रचार फेऱ्यांनी सोमवारी (१३ ऑक्टोबर) शहरातील रस्ते गजबजून गेले. निवडणुकीसाठ बुधवारी (१५ ऑक्टोबर) मतदान होणार असून, आज दुपारी पाच वाजता प्रचाराची सांगता झाली.

विमानतळावर आली ७० विमाने

$
0
0
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी युती आघाडीच्या वादात गेलेला प्रचाराचा महत्त्वपूर्ण वेळ कव्हर करण्यासाठी अकरा दिवसांत सर्वच पक्षानी ताकद लावली. कमी वेळेत प्रचारासाठी सभा, दौरे काढण्यात आले.

मनसेचा उमेदवारच शिवसेनेत!

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास उरलेले असताना, परभणी मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अॅड. विनोद दुधगावकर यांनी सोमवारी संध्याकाळी अचानक शिवसेनेत प्रवेश केल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.

टँकर उलटला; अनर्थ टळला

$
0
0
तब्बल १७.५० टन गॅसचा टॅँकर गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारात उलटला. मंगळवारी (१४ ऑक्टोबर) पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. पोलिस आणि गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मदतीत तत्परता दाखविल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

जिल्ह्यात १२० गस्ती पथके

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी होणारे मतदान निर्भय वातावरण पार पडावे यावसाठी जिल्ह्यात पोलिस, होमगार्ड, केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान आदी साडेचार हजार अधिकारी- कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सिमेंट रस्त्यावर डांबरी मुलामा

$
0
0
साताऱ्यातील सर्वाधिक महत्वाच्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डांबरी मुलामा देण्यात आला आहे. एक किलोमीटरच्या या रस्त्यावर साधारणतः सहाशे मीटर लांब डांबरीकरण करण्यात आले. या डांबरीकरणाच्या दर्जाबद्दल नागरिक शंका उपस्थित करीत आहेत.

जिल्ह्यात पुन्हा टँकर सुरू

$
0
0
ऑगस्टअखेरनंतर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे पुन्हा एकदा पाणीटंचाई डोके वर काढत आहे. उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील नऊ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे.

एसटी बसमध्येही पुशबॅक सीट

$
0
0
लांब पल्ल्याच्या मार्गावर आरामदायी आसनांमुळे खासगी बसगाड्यांनी एस. टी. महामंडळाला कधीच मागे टाकले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने खासगी बसगाड्यांप्रमाणे पुशबॅक सीट असलेल्या सेमीलक्झरी बसगाड्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे.

३७ मतदान केंद्र जिल्ह्यात संवेदनशील

$
0
0
जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातील ३७ मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यापैकी सर्वाधिक १२ मतदान केंद्र सिल्लोड मतदारसंघात आहेत.

गारपिटीग्रस्तांच्या मदतीसाठी मतदानावर बहिष्कार

$
0
0
बदनापूर विधानसभा मतदारसंघातील देशगव्हाण येथील गावकऱ्यांनी गारपिटीचे अनुदान मिळावे, या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. अंबड तालुक्यातील हे गाव वगळता सर्व १३७ गावांमध्ये गारपीटग्रस्तांना अनुदान देण्यात आले आहे.

शहराच्या पर्यटनावर ‘इलेक्शन इफेक्ट’

$
0
0
विधानसभा निवडणुकीचा शहरातील पर्यटन व्यवसायावर परिणाम जाणवत आहे. ऑक्टोबर महिना अर्धा संपला तरी, पर्यटकांची अपेक्षित गर्दी नसल्यामुळे पर्यटन व्यावसायिक चिंताग्रस्त आहेत.

७०७ वाहने दिमतीला

$
0
0
बुधवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून मतदानाच्या व्यवस्थेसाठी एकूण ७०७ वाहनांचा बंदोबस्त केला आहे.

मराठवाड्यात १ कोटी ३२ लाख मतदार

$
0
0
विधानसभा निवडणुकीत बुधवारी होणाऱ्या मतदानासाठी, मराठवाड्यातील ४६ मतदारसंघात १ कोटी ३२ लाख ६९ हजार ८६५ मतदार ७७६ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करतील. यात ७० लाख ३५ हजार ४१३ पुरूष तर, ६२ लाख ३४ हजार ४५२ महिला मतदारांचा समावेश आहे.

आमदार होण्यासाठी लावली इस्टेट पणाला

$
0
0
‘अब नही तो कब नही’ च्या धर्तीवर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विविध पक्षांचे उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील सहा उमेदवारांनी आपल्या रिअल इस्टेटचा सौदा केला आहे. मोक्याच्या ठिकाणचे प्लॉट, शेती विकल्या आहेत.

मतदानासाठी ११ तास

$
0
0
जिल्ह्यातील ९ मतदार संघात असणाऱ्या १५६ उमेदवारांचे भवितव्य बुधवारी २४ लाख ८८ हजार मतदार इल्येक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बटण दाबून बंद करतील. सकाळी सात ते सायंकाळी सहा या ११ तासांत मतदान होणार आहे.

सर्व पर्यटनस्थळे आज राहणार बंद

$
0
0
विधानसभा निवडणुकीत सर्वांनी मतदान करावे, यासाठी बुधवारी (१५ ऑक्टोबर) जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयांसह पर्यटन स्थळेही बंद ठेवण्यात आली आहेत. मतदानानिमित्त सर्व खासगी उद्योग व आस्थापनांमधील कामगारांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

एटीएम फोडण्याचा प्रयत्न

$
0
0
स्टेट बँक ऑफ हैदराबादचे सिडको एन ९, एम २ येथील एटीएम सेंटरमधील मशीन सोमवारी (१३ ऑक्टोबर) मध्यरात्री गॅसकटरने कापण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images