Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

...नो उल्लू बनाविंग!

$
0
0
डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांची कंपनी बदलली की किंमत बदलते. ही किंमत कधी-कधी चक्क ९० पटींपर्यंत वाढते. त्यामुळे अनेक रुग्णांना हॉस्पिटलची पायरी चढायचे म्हटले की अंगावर काटा येतो.

निकाल दुपारी १२पर्यंत

$
0
0
विधानसभ निवडणुकीचे निकाल रविवारी (१९ ऑक्टोबर) दुपारी १२पर्यंत जाहीर केले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली. रविवारी सकाळी ८पासून मतमोजणी सुरू होणार आहे.

आचारसंहितेदरम्यान शहरात ६३४ अटक

$
0
0
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून शहर पोलिसांनी गेल्या महिनाभरात तब्बल ६३४ आरोपींना अटक करून प्रतिबंधात्मक कारवाया केल्या. त्याचबरोबर अवैध दारू विकणाऱ्या ११० जणांवर छापे टाकण्यात आले.

सेंट फ्रान्सिस मैदानावर फेस्टिव्हल शॉपी प्रदर्शन सुरू

$
0
0
जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस मैदानावर गुरुवारपासून (१६ ऑक्टोबर) फेस्टिव्हल शॉपी प्रदर्शनाला थाटात सुरुवात झाली. ग्राहकांना एकाच ठिकाणी एकाच वेळी अनेक वस्तू मिळाव्यात या उद्देशाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात गृहोपयोगी व गृह सजावटीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

आईसमोर लेकीचा अंत

$
0
0
स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नंदाबाई आईसोबत भंगार गोळा करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. त्यांची आई पाणी आणण्यासाठी दूर गेली होती. तेवढ्यात स्फोट झाला. आईने घटनास्थळी धाव घेतली असता, आपल्या लेकीचा तडफडत मृत्यू पाहणे त्यांच्या नशिबी आले.

‌व्हीआयपी रस्त्याची दुर्दशा

$
0
0
शहरातील अत्यंत वर्दळीच्या टीव्ही सेंटर चौक ते सुभेदारी या व्हीआयपी रस्त्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्यांवरील मोठे खड्डे व उडणारी धूळ यामुळे या रस्त्यावर सतत लहान- मोठे अपघात होत आहेत.

अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याने केली मारहाण

$
0
0
कॉलसेंटरच्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याने साथीदाराच्या मदतीने हॉकीस्टीकने मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे सिडको एमआयडीसी भागात घडला. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘पेट-३’ प्रक्रियेसाठी नोव्हेंबर उजाडणार

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या ‘पेट-३’चा गुंता कायम आहे. निकाल जाहीर होऊन आठवडा होत आला तरी पात्र विद्यार्थी किती, याचा गोंधळ विद्यापीठाला सोडविता आलेला नाही.

मतदानाचा टक्का भरघोस वाढला

$
0
0
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल १५.२ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. २००९मध्ये विधानसभेसाठी २२ लाख ४ हजार ४६६पैकी ११ लाख ९३ हजार ३३१ मतदारांनी (५४.१३ टक्के) मतदानाचा हक्क बजावला होता.

पालिकेच्या सभेत चुकून श्रद्धांजली!

$
0
0
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी (१६ ऑक्टोबर) चक्क माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. झालेली चूक लक्षात आल्यावर त्यात सुधारणाही करण्यात आली.

फुटीर नगरसेवकांची पालिकेत पळापळ

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेतून फुटून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या नगरसेवकांची गुरुवारी (१६ ऑक्टोबर) महापालिकेत अक्षरशः पळापळ झाली. त्यामुळे अन्य नगरसेवक व पदाधिकारी हस्यकल्लोळात बुडाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या अंदाजावर चर्चेने रंग भरला.

पेमेंटसाठी महापौरांना घेराओ

$
0
0
थकलेले पेमेंट देण्याच्या मागणीसाठी कंत्राटदारांनी गुरुवारी (१६ ऑक्टोबर) महापौर कला ओझा यांना घेराओ घातला. दिवाळीपूर्वी थकित पेमेंट देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी लेखाधिकारी संजय पवार यांच्या विरोधात तक्रारी करून घोषणाही दिल्या.

शिस्तीमुळे उंचावला यशाचा आलेख

$
0
0
शिस्तीमुळे वेळ पाळण्याची सवय लागली. यशाचा आलेख शिस्तीमुळेच वाढला. वेळ पाळल्यामुळे अनेक गोष्टी साध्य झाल्या. आता प्रशासकीय सेवेत काटेकोर काम करण्यावर भर असतो. वेळा पाळल्यामुळे लोकांची कामे होतात. त्यांचे समाधान होते, असा अनुभव आहे महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर यांचा.

निवडणूक यंत्रणा जुन्याच वळणावर

$
0
0
विधानसभेसाठी १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानाची टक्केवारीचे गणित जुळवताना प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतही प्रशासनाच्या हाती नेमकी आकडेवारी हाती आली नव्हती.

शहरात मतदारांसाठी वाहनांचा मुक्त वापर

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी, बुधवारी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी मतदारांच्या दिमतीसाठी तीन चाकी व चार चाकी वाहनांचा मुक्तपणे वापर केला. मतदानकेंद्रांच्या दारापर्यंत आणून वाहने उभी केली जात होती.

महिला लघु उद्योजकांची भरारी

$
0
0
शहरी व ग्रामीण भागातली महिला बचत गट, लघु उद्योग व गृहउद्योग यांचा समावेश असलेल्या प्रदर्शनातून स्त्रीच्या उद्योगमशीलतेचे दर्शन झाले. गुरुवारी (१६ ऑक्टोबर) यशोमंगल कार्यालयात या प्रदर्शनाला सुरुवात झाली.

उड्डाणपुलाच्या रस्त्याची चाळणी

$
0
0
जालना रोडवर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून शहर रस्ते एकात्मिक विकास योजनेंतर्गत क्रांती चौकात उभारलेल्या उड्डाणपुलाच्या रस्त्याची दोन वर्षांतच चाळणी झाली आहे.

कुटुंबाला आधार...!

$
0
0
ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक असलेल्या पतीचे अपघाती निधन...त्यातच कौटुंबिक कलहातून सासरच्या मंडळींनी सूड उगविण्यासाठी कोर्टातून पतीची संपत्ती सील केलेली...पतीच्या सरणाची राख थंड होत नाही तोच नेत्रतज्ज्ञ भावाचेही अपघाती निधन...असे एकापाठोपाठ एक भावनिक धक्के आणि अचानक आलेली कुटुंबाची जवाबदारी.

स्फोटात महिला ठार

$
0
0
सिडको एमआयडीसी परिसरात गुरुवारी सकाळी पावणेबाराला अज्ञात वस्तूच्या स्फोटामध्ये भंगार जमा करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने ही महिला दहा ते पंधरा फूट दूर फेकली गेली तसेच, मोठा आवाज झाल्याने परिसर हादरला.

प्रश्नांवर महापालिका चिडीचूप

$
0
0
दिवाबत्ती, पाणीपुरवठा, साफसफाई यांसारख्या अत्यावश्यक कामांबद्दल आचारसंहितेची ढाल करून महापालिका प्रशासनाने चर्चा करण्याचे टाळले. नागरी समस्यांबाबत नगरसेवक आक्रमक झाले होते. प्रशासनाने आचारसंहितेवर बोट ठेवत त्यांची आक्रमकता धुळीस मिळवली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images