Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मतमोजणी संथ; भोंग्यांचा आवाज बसला!

0
0
पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशासनाच्या अत्यंत ढिसाळ कारभाराचे चित्र पहावयास मिळाले. एकीकडे संपूर्ण राज्याचे निकाल वेगाने घोषित होत असताना पूर्व मतदारसंघाचा निकाल साडेतीन वाजता जाहीर करण्यात आला.

२९ वर्षांनी मुस्लिम आमदार

0
0
औरंगाबाद शहरामध्ये तब्बल २९ वर्षांनी मुस्लिम आमदार निवडून आला आहे. १९८५ मध्ये अमानुल्ला मोतीवाला हे निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच ‘एमआयएम’चे सय्यद इम्तियाज जलील हे ‘मध्य’मधून निवडून आले आहेत.

सेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार

0
0
प्रचंड उत्कंठावर्धक ठरलेल्या मध्य मतदारसंघात ‘एमआयएम’ पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले. शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांचा त्यांनी १९ हजार ९८२ मतांनी पराभव केला.

‘पूर्व’तील पराभवाने काँग्रेस हद्दपार

0
0
पूर्व मतदारसंघातून काँग्रेसचा दारूण पराभव झाल्याने शहरातील काँग्रेस हद्दपार झाली आहे. सहा महिन्यांनंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा आहे.

अटीतटीच्या लढतीत सावेंची बाजी

0
0
ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमिनने (एमआयएम) अनपेक्षितपणे मारलेल्या मुसंडीमुळे दिग्गज उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले होते. १० व्या फेरीनंतर चित्र नाट्यमयपणे बदलत गेले.

आयात उमेदवारांचे पानिपत

0
0
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेशी युती तुटल्यामुळे धांदल उडालेल्या भाजपने इतर पक्षांतून आयात केलेल्या ५५पैकी ३६ उमेदवारांना मतदारांनी नाकारले आहे.

धनुष्य, कमळ अन् पतंग

0
0
शहरातील तीनही मतदारसंघात शिवसेना, भाजप आणि एमआयएमने विजय मिळविला. मध्य मतदारसंघात मतांचे विभाजन झाल्यास विजय निश्चित असल्याचा एमआयएमने केलेला दावा अखेर प्रत्यक्षात उतरला.

सुविधांनुसार कॉलेजांचे शुल्क

0
0
आता कॉलेजमधील शिक्षकांची संख्या, पायाभूत सुविधा याचा आढावा घेऊन प्रवेश शुल्क ठरविले जाणार आहे. पुढील सत्रात कॉलेजांमधील सुविधांचा आढावा विद्यापीठ घेणार असून, यासाठी कमिट्या स्थापन करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे.

आनंदाच्या पणत्या, कंदील

0
0
विधानसभा निवडणुकीनंतर दिवाळीचा बाजार सोमवारी (२० ऑक्टोबर) ग्राहकांनी फुलून गेला. दिवाळीच्या खरेदीसाठी दुकाने, मॉलसह फेरीवाल्यांकडे गर्दी होत आहे. फेरीवाल्यांनी रंगीबेरंगी पणत्या, आकाश कंदील, रांगोळ्या आदी वस्तू विक्रिसाठी आणल्या आहेत.

पक्ष संघटन उभारण्याचे आव्हान

0
0
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने वैजापूर मतदारसंघाची एकमेव जागा जिंकली असली तरी ग्रामीण भागात लक्षणीय मते मिळवण्यातही पक्ष यशस्वी ठरला. पैठण, फुलंब्री आणि कन्नड मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केली; मात्र शहर पातळीवर पक्ष संघटन नसल्याचा फटका पूर्व आणि पश्चिम मतदारसंघातील उमेदवारांना बसला आहे.

भाजपच्या पदरात संमिश्र यश

0
0
गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या भाजपला यावेळी तीन जागांवर यश मिळाले. मोदीलाटेमुळे महाराष्ट्रात मिळालेले यश पाहता औरंगाबाद जिल्ह्यात मात्र भाजपला संमिश्र यशावरच समाधान मानावे लागले.

जिल्ह्यात काँग्रेस बॅकफूटवर

0
0
गेल्या विधानसभेत तीन आमदार, पाच नगरपालिका, दोन पंचायत समित्या, जिल्हा परिषद ताब्यात असूनही काँग्रेसला अंतर्गत गटबाजीचा या निवडणुकीत फटका बसला.

बुरूज राखले; गड ढासळला

0
0
विधानसभा निवडणुकीत शिवसनेने जिल्ह्यात तीन जागा जिंकल्या असल्यातरी मध्य मतदारसंघात झालेला पराभव पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या जिव्हारी लागण्यासारखा आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघात अभूतपूर्व मतविभागणी झाल्यामुळे ‘एमआयएम’च्या उमेदवाराचा विजय झाला, पण ही मतविभागणी झालीच कशी? असा प्रश्न नेत्यांनी स्वतःलाच विचारण्याची गरज आहे.

जेवणाच्या कारणावरून पत्नीचा खून

0
0
कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीच्या डोक्यात वार करून आणि पोटावर लाथा मारून खून केल्याची घटना सोमवारी (२० ऑक्टोबर) उघड झाली. घनसावंगी तालुक्यातील बोररांजणी शिवारात घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीविरुध्द गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

पालिका कर्मचाऱ्यांना अडीच हजार बोनस

0
0
महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त अडीच हजार रुपये बोनस देणार आहे. हा निर्णय मंगळवारी सायंकाळी उशिरा आयुक्त प्रकाश महाजन व महापौर कला ओझा यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला. ठेकेदारांना थकीत पेमेंटपैकी चाळीस टक्के पेमेंट करण्याचे आयुक्तांनी यावेळी मान्य केले. यामुळे पालिकेच्या तिजोरीवर १ कोटी ८० लाख रुपयांचा बोजा पडणार आहे.

वाघिणीने दिले बछड्यांना धडे

0
0
‘आई हीच पहिली गुरू असते,’ असे आपण नेहमीच म्हणतो. आईला गुरूचे स्थान केवळ मनुष्यातच नाही, तर प्राण्यांमध्येही असल्याची प्रचिती महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात फेरफटका मारल्यावर आली. सिद्धी या पिवळ्या वाघिणीने तीन महिन्यांपूर्वी दोन बछड्यांना जन्म दिला. त्यांना मंगळवारी पहिल्यांदाच आईसोबत बंदीस्त पिंजऱ्यातून खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आले.

‘शिवसेनेने केले अन्य पक्षांना मॅनेज’

0
0
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात आपला विजय व्हावा, यासाठी शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या उमेदवारांना मॅनेज केले. त्याचा फटका मला बसला, असा आरोप या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मधुकर सावंत यांनी केला.

मतदारांचा संभ्रम, हेच पराभवाचे कारण : जैस्वाल

0
0
‘भाजप की शिवसेना अशा संभ्रमात मतदार पडल्यामुळे मध्य मतदारसंघात अपेक्षित विजय मिळवता आला नाही. निवडणुकीत जय-पराजय होत असतो; मात्र विजयानंतर शहराच्या चौकाचौकात झालेला उन्माद पाहून लोकांना आपली चूक लक्षात आली. निवडणुकीत हरलो तरी २४ तास लोकांसाठी काम करीत राहू,’ असे शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी सांगितले. आपल्या पराभवाचे विश्लेषण मांडताना जैस्वाल मंगळवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलत होते.

आयुक्तांनी सोडली पालिका वाऱ्यावर

0
0
आयुक्त प्रकाश महाजन यांनी महापालिका अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिली. दिवाळीचा सण उद्यापासून सुरू होत असल्यामुळे बोनससाठी कर्मचाऱ्यांनी तर थकित पेमेंट मिळण्याच्या मागणीसाठी कंत्राटदारांनी मंगळवारी (२१ ऑक्टोबर) सकाळपासून महापालिकेत ठिय्या दिला.

हर्सूल जेलचा भार हलका होणार

0
0
जालन्यातील इंदेवाडी परिसरात ७०० कैदी क्षमतेचे जेल डिसेंबरअखेरीस सुरु होणार आहे. त्यामुळे हर्सूल मध्यवर्ती कारागृहावरील मोठा ताण कमी होईल. २००४मध्ये तत्कालीन सरकारने जालना जेलच्या निर्मितीसाठी मंजुरी दिली होती.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images