Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पराभव शिवसेनेच्या जिव्हारी

$
0
0
विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात प्रमुख जागी झालेला पराभव जिव्हारी लागल्यामुळे ‘मातोश्री’वर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची पक्षप्रमुखांसमोर परेड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या निवडणुकीच्या प्रचारात स्थानिक नेत्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखाच पक्षप्रमुखांनी विचारला. त्यामुळे नेत्यांची पाचावर धारणच बसली आहे.

दहा हजार मतांचा घोळ

$
0
0
विधानसभेच्या निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील सर्व मतदार ‘एमआयएम’च्या पाठीशी उभे राहिले आहे. यामुळे ६० हजाराचा पल्ला गाठता आला, मात्र मतमोजणीत झालेली अफरातफरीमुळे माझा पराभव झाला. मुस्लिम बहुल भागाबरोबर आंबेडकरनगर, मिसारवाडी भागातूनही ‘एमआयएम’ला चांगली मते मिळाली, मात्र त्यात अफरातफर झाली. यासंदर्भात न्यायलयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती औरंगाबाद पूर्वचे ‘एमआयएम’चे उमेदवार डॉ. गफ्फार कादरी यांनी दिली.

‘एमआयएम’कडे इच्छुकांचा लोंढा

$
0
0
दोन आमदारांसह राज्याच्या विधानसभेच्या प्रवेश करणाऱ्या ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादूल मुसलमीनने (एम. आय. एम.) औरंगाबाद महानगर पालिकेची तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीतील यशामुळे एम. आय. एम.कडे इच्छुकांची गर्दी वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आत्तापासूनच पालिका निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना पक्षनेत्यांकडून देण्यात आल्या आहेत.

पाणीपुरवठा, सफाईचे दिवाळे

$
0
0
ऐन दिवाळीत शहरवासीयांसमोर साफसफाई आणि पाणीपुरवठ्याचे संकट निर्माण झाले आहे. महापालिकेने सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी केलेल्या कामाचा थकीत मोबदला न दिल्यामुळे दिवाळीचे चार दिवस साफसफाई न करण्याचे पालिका कर्मचाऱ्यांनी ठरवले आहे. त्यामुळे उद्या गुरुवारपासून रविवारपर्यंत शहरात साफसफाईचे काम होणार नाही.

‘पूर्व’मधील पराभव खासदारांना झोंबला

$
0
0
महापौरांच्या विजयासाठी तुम्ही दीड दमडीचाही प्रचार केला नाही. तुमचे असे वागणे योग्य नाही, असे म्हणत खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी (२२ ऑक्टोबर) दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली. खैरे यांच्या अशा वागण्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

महिलांनो, रिचार्ज करताना जपून

$
0
0
मित्राच्या दुकानात रिचार्जसाठी आलेल्या महिलांचे क्रमांक मिळवून त्यांना त्रास देणाऱ्या एका तरुणाला सायबर सेलच्या पथकाने अटक केली आहे. विशेषतः पडेगाव, उस्मानपुरा व छावणी भागातील कांही महिलांना वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करून त्रास दिला जात होता.

भाजपची ताकद वाढली!

$
0
0
विधानसभा निवडणुकांचे निकाल जिल्ह्यातील राजकारणाला नव्याने वेगळ्या वळणावर घेऊन जाणारे आहेत. जालन्यात अर्जून खोतकर यांच्या गनिमी काव्याची सरशी झाली. घनसावंगीत राजेश टोपेंच्या एकतर्फी लढाईत त्यांचा विजय झाला. परतुरात लोणीकरांनी शह काटशहाच्या राजकारणात स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवले. बदनापुरात शत प्रतिशत भाजप, तर भोकरदनमध्ये केंद्रीय राज्यमंत्री परीक्षा पास झाले.

सेनेच्या विजयात खैरेंचा वाटा किती?

$
0
0
विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेने तीन जागा जिंकल्या. सहा जागांवर शिवसेनेला पराभवाचे तोंड पहावे लागले. पक्षाने जिंकलेल्या तीन जागांमध्ये खासदार चंद्रकांत खैरे यांचे योगदान काय, असा सवाल आता शिवसेनेच्याच काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

उस्मानाबादेत भाजपची निराशाच

$
0
0
फाजील आत्मविश्वास, संघटनात्मक बांधणीचा अभाव आणि विरोधकांशी केलेली हातमिळवणी यामुळेच उस्मानाबाद जिल्ह्यात भाजपची पीछेहाट झाली. जिल्ह्यातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बेफिकीरीमुळे व निष्क्रियतेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात मोदी लाटेचा प्रभाव दिसून आला नाही. त्यामुळे याठिकाणी भाजपला खाते उघडता आले नाही.

मुंडे यांचा आमदारकीचा राजीनामा

$
0
0
बीड जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची ‘द लूट’

$
0
0
दिवाळीसाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे यावर्षीची ट्रॅव्हसचालकांनी चांगलेच दिवाळे काढले आहे. डिझेलचे दर कमी होऊनही दरांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने खासगी ट्रॅव्हल्सचालक व एजंटांनी ऐन दिवाळीच्या हंगामात बुकिंग फुल्ल असल्याच्या सबबीखाली तिकीटाचे दर थेट दुप्पट केले आहेत.

कापसाचा भाव घसरला!

$
0
0
कापसाचा हंगाम तोंडावर असला, तरी बाजारपेठेत कापसाला भाव मिळत नसल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. किमान हमी भावाच्या दराभोवतीच कापूस बाजारपेठेतील भाव फिरत राहील, असे चित्र आहे.

आमदार सावे ‘इन अॅक्शन’

$
0
0
महापालिकेच्या साफसफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत सुट्टी घेतल्यामुळे निर्माण झालेली कचऱ्याची समस्या आणि या कर्मचाऱ्यांचे प्रश्न या संदर्भात आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (२३ ऑक्टोबर) भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांची भेट घेतली.

उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतेत

$
0
0
तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. हवालदिल झालेला शेतकरी दुष्काळी परिस्थितीत कसा मार्ग काढायचा या चिंतेत आहे. तालुक्यात यावर्षी फक्त ४३ टक्के पाऊस झाला असून खरीप उत्पादनात चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त घट होण्याची शक्यता आहे.

आजारी असतानाही काम केले!: खैरे

$
0
0
माझ्या पोटाला मोठी शस्त्रक्रिया झालेली असतानाही शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशीपासून डॉक्टरांच्या निगराणीत राहून मी अहोरात्र पक्षासाठी काम केले, असे स्पष्टीकरण खासदार चंद्रकांत खैरे दिले आहे.

वेरूळ लेणी पाहण्यासाठी सुट्टीत गर्दी

$
0
0
दिवाळीच्या सुट्टीत घरापासून दूर शांत, निवांत पर्यटनस्थळी भेट देऊन सण साजरा करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

नव्या पैसेवारीमुळे दिलासा

$
0
0
हिंगोली तहसील कार्यालयामार्फत तालुक्यात नव्याने पैसेवारी काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याआधी खरीप पिकांची हंगामी पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त असल्याचे ३० सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आले होते.

दोन भावांचा विहिरीत बुडून मृत्यू

$
0
0
पाणी आणायला विहिरीवर गेलेल्या दोन भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना नायगाव तालुक्यातील नरसी फाटा येथील मेहबूबनगर वस्तीत गुरुवारी घडली.

पर्यटन व्यवसाय, उद्योग ‌विकासाला प्राधान्य

$
0
0
वीस वर्षांपूर्वी औद्योगिक विकासात सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादची ओळख होती. शहराची ही जुनी ओळख पुन्हा मिळवून देणे आणि पर्यटन वाढविण्यावर अधिक भर देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.

ढगाळ वातावरण अन् भुरभुर

$
0
0
दिवाळीचा आनंद घेणाऱ्या औरंगाबादकरांना शनिवारी (२५ ऑक्टोबर) अचानक वातावरण बदलाला सामोरे जावे लागले. सकाळीच ढग दाटून आले आणि पावसाची भुरभुर सुरू झाली. दिवसभर अधूनमधून पाऊस सुरू होता. सायंकाळनंतर काही भागात पावसाचा जोर थोडा वाढला होता.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images