Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गणपती मंदिरात अवतरली दुर्गादेवी

$
0
0
मुकूल मंदिर शाळेतून २००८ उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन काळा गणपती मंदिरात दीपोत्सव साजरा केला. व्हॉट्स अॅपच्या साह्याने एकत्रित झालेल्या या माजी विद्यार्थ्यांनी फटाके फोडण्याऐवजी दीपोत्सवातून समाजाला इको फ्रेंडली दिवाळी साजरा करण्याचा संदेश दिला.

दोन गटात हाणामारी

$
0
0
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शनिवारी (२५ ऑक्टोबर) मुकुंदवाडी भागात घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून परस्पराविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फटाक्यांमुळे जखमींचे शतक

$
0
0
दिवाळीच्या काळात उडविल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे दरवर्षी मोठ्या संख्येने जखमी होणाऱ्यांचे प्रमाण निश्चितपणे घटले असले तरी, यंदाही जखमींची संख्या शंभराच्या घरात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरात प्लेटलेटचा कमालीचा तुटवडा

$
0
0
शहरभर दिवाळीचा जोरदार मूड असताना सगळ्याच रक्तपेढ्यांचे डोळे लागले आहेत रक्तदात्यांकडे. मागच्या दोन आठवड्यांपासून शहरातील रक्तदान शिबिरे पूर्णपणे थांबली असल्याने सगळ्याच रक्तपेढ्यांमध्ये रक्त व रक्तघटकांचा कमालीचा तुटवडा आहे.

गतवैभवासाठी झटण्याचा निर्धार

$
0
0
‘जगप्रसिद्ध लेणी, ऐतिहासिक वास्तुंचा वारसा औरंगाबादला लाभला आहे. आशिया खंडात झपाट्याने वाढणारे शहर म्हणून एकेकाळी शहराची ख्याती होती. हे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी झटू.

धुरिणांना मतदारांचा हाबाडा

$
0
0
सहकाराच्या मांडवाखालून निवडणुकीच्या फडात यश मिळविण्याची किमया साधण्यात विधानसभा निवडणुकीत भल्याभल्याना अपयश आले. गेवराईचे पंडित, माजलगावचे सोळंके, वसमतचे दांडेगावकर, जिंतूरचे बोर्डीकर, उस्मानाबादचे निंबाळकर यांना मतदारांनी नाकारले.

...आकाशाची ओढ, गगनभरारीचे वेड!

$
0
0
हवाई प्रवास म्हणजे एक विलक्षण अनुभव. एकदातरी विमानात बसून प्रवास करावा, अशी अनेकांची इच्छा असते. उद्योगपती, उद्योगांतील कार्यरत मोठे अधिकारी, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, मंत्री, राजकीय नेते कायम विमानातून प्रवास करतात.

...दाटलेला हुंदका; पावलेला देव!

$
0
0
कंठाशी रूतून बसलेले शब्द, दाटलेला हुंदका, काळजाचा चुकलेला ठोका, भीतीने चिमुरड्यांच्या गालावर अर्धवट ओघळून तिथेच गोठलेले अश्रूंचे थेंब. मिटमिटा शिवारात पहाटे दोन वाजता पॅसेंजरला आग लागल्यानंतरचे हे चित्र.

व्हॉट्सअॅप व्यासपीठाचे स्वागत

$
0
0
सतत वाचकाभिमुख उपक्रम राबवणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ने बातमी सांगण्याचे, कळविण्याचे व्यासपीठ व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. वाचकांनीही या व्यासपीठाला भरभरून प्रतिसाद दिला असून, पहिल्या दिवसापासून ‘मटा रिपोर्टर’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

धावत्या रेल्वेच्या डब्याला आग

$
0
0
नांदेड-मनमाड पॅसेंजरच्या डब्याला प्रवासादरम्यानच आग लागली, या आगीत डबा पूर्ण जळून खाक झाला. आग लागल्याचे लक्षात येताच, काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत साखळी खेचली.

पेटवलेल्या प्रेयसीचा मृत्यू

$
0
0
दिवाळीसाठी माहेरी जाण्याचा हट्ट केला म्हणून प्रियकराने पेटवलेल्या प्रेयसीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. उस्मानपुरा पोलिस ठाण्यात भाजलेल्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहो आश्चर्यम्, हिवाळ्यात लागला आंबा

$
0
0
हिमायतनगर येथील कृषी पुरस्कार विजेते शेतकरी विजयअप्पा बंडेवार यांच्या मालकीच्या शेतातील आंब्याच्या झाडाला ऐन दिवाळीत कैऱ्या लागल्या आहेत. ऐन हिवाळयाच्या काळात कैऱ्या लागल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काँग्रेसमुक्त झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

$
0
0
लातूर ग्रामीण मतदारसंघातील जनतेने ९० हजार मते दिली आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होत आहे. आगामी काळात लातूर काँग्रेस मुक्त होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार भाजपचे लातूर ग्रामीण मतदारसंघातील पराभूत उमेदवार रमेश कराड यांनी व्यक्त केला.

ढगाळ हवामानामुळे बागायतदार संकटात

$
0
0
ऐन दिवाळीत शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्याचबरोबर वातावरणात सर्वत्र असह्य असा गारवा होता. शनिवारी सायंकाळपर्यंत जेथे कडक उन्हाळ्यासारखे ऊन पडत होते व उकाड्याचे वातावरण होते.

आमदार राठोड यांच्यावर अंत्यसंस्कार

$
0
0
मुखेडचे नवनिर्वाचित भाजप आमदार गोविंदमामा राठोड यांच्या पार्थिवावर सोमवारी मुखेड तालुक्यातील कमळेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ४० हजार नागरिकांच्या उपस्थितीत साश्रू नयनाने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

दहा महिन्यांत ६७ आत्महत्या

$
0
0
नांदेड जिल्ह्यात यावर्षी केवळ वर्षी केवळ ४५.५८ टक्के पाऊस झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जानेवारी २०१४ ते २३ ऑक्टोबर २०१४ या दरम्यान ६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्यात पुढेही वाढ होईल अशी चिन्हे दिसत आहेत.

‘पाय ठेवायला जागा द्या हो’

$
0
0
दिवाळी आणि जोडून आलेल्या सुट्यांमुळे बाहेरगावी जाण्यासाठी नागरिकांनी रेल्वे व बससाठी गर्दी केली आहे. रेल्वेमध्ये तर किमान पाय ठेवलायला तरी जागा द्या, अशी विनंती करण्याची वेळ आली आहे.

पाण्यासाठी शेतकरी आक्रमक

$
0
0
गोदावरी नदीवरील आपेगाव, हिरडपुरी बंधारे पाणी नसल्यामुळे कोरडे पडले आहेत. या पाण्यावर ४० ते ५० गावांचे जीवन अवलंबून असल्यामुळे बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडावे, या मागणीसाठी जायकवाडी पाणी शेतकरी संघर्ष कृती समितीतर्फे सोमवारी (२७ ऑक्टोबर) कडा कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

बोगस मतदारांमुळे झाला पराभव

$
0
0
‘आपला पराभवास घनसावंगीतून आलेल्या हजारो बोगस मतदारांमुळे झाला. जातीय समीकरणातून दुहेरी मतदान झाले. विधानसभेची निवडणूक लोकशाहीविरोधी झाली. याविरुद्ध आपण न्यायालयात दाद मागणार आहोत,’ अशी माहिती कॉँग्रेसचे पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी सोमवारी (२७ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद-वाळूज-जालना

$
0
0
सिडको प्रशासनाने तब्बल तीन हजारांहून अधिक झाडांची वाळूज महानगर उद्यानामध्ये लागवड केली. झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images