Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कचऱ्याचे ढीग शहराच्या उरावर

$
0
0
सध्या शहरात कचऱ्याचे ढीग साचलेत. ठिकठिकाणच्या रस्ता दुभाजकांवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नाकात शिरणारी दुर्गंधी नागरिकांच्या डोक्यात तिडीक आणि संताप निर्माण करते आहे.

वृद्ध मातापित्यांना फक्त प्रेम द्या!

$
0
0
वृद्धापकाळ जीवनातील अत्यंत कठीण काळ म्हणून गणला जातो. व्यक्तीला शारीरिक, भावनिक, मानसिक, वैचारिक समस्यांना सामोरे जावे लागते. कौटुंबिक समस्या, वैवाहिक समस्या, शारीरिक समस्या वृद्धापकाळात सुरू होतात.

...तुझ्या सवे !

$
0
0
पती पत्नीचे नाते तसे प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, आपलेपणाचे. अनामिक हुरहुरीचे व युगेयुगे संसार रुपाने एकत्र राहण्याचे त्यांचे स्वप्न असते. ते कवटाळून बसणे. त्यात हुंदका, ओढ सारेच आले.

एटीएमफोड्यांची टोळी गजाआड

$
0
0
शहरातील एटीएम फोडणारी टोळी अखेर पोलिसांच्या हाती लागली आहे. बजरंग चौकातील एसबीआय बँकेचे एटीएम फोडून सूतगिरणी चौकातील एटीएम फोडण्यासाठी आलेले तिघे मुकुंदवाडी पोलिसांच्या हाती लागले.

चटणी - भाकरी खाऊन साजरी केली दिवाळी

$
0
0
महापालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे आम्हाला चटणी - भाकरी खाऊन दिवाळी साजरी करावी लागली. अधिकारी व त्यांची पोरं मिठाई खात होती तर, आमची पोरं आमच्याकडेच आशेने बघत होती.

फुटीरांवर कारवाईसाठी नेते सरसावले

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या वेळी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते सरसावले आहेत.

कोट्यवधींचा घोटाळा

$
0
0
रेडी रेकनरच्या जुन्याच दराने जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार नोंदवून बिल्डरांना दलालांच्या मदतीने लाभ दिला जात असल्याचा प्रकार मुद्रांक व दस्त नोंदणी (रजिस्ट्री) कार्यालयामध्ये समोर आला अाहे.

लेखणीभक्त आर. के.

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता पेन वापरतात? अमिताभ बच्चन कोणत्या पेनने लिहितात? असे प्रश्न तुम्हाला विचारले, तर तुम्ही गोंधळात पडाल. पहिला पेन कधी तयार केला? लिखाणानंतर कागदावरील शाई किती वर्षे टिकते? या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडेही नसतील.

डेंगी कायम, वातावरणाचा फटका

$
0
0
शहरात डेंगीचे प्रमाण काही अंशी कमी झाले असले तरी अजूनही डेंगीचे रुग्ण कायम असल्याचे चित्र आहे. अर्थातच, यामध्ये शहरासह शहराबाहेरच्या रुग्णांचाही समावेश आहे.

नियोजन प्राधिकरण कोणते?

$
0
0
सातारा-देवळाई नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर नियोजन प्राधिकरण (प्लॅनिंग अॅथॉरिटी) कोण, याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. तोपर्यंत नियोजनाची जबाबदारी सिडकोकडे असेल.

तरुणांमुळे दुचाकीचोर कचाट्यात

$
0
0
शहरामध्ये दुचाकी चोरींच्या संख्या वाढत होत असतानाच, काही सतर्क तरुणांमुळे दुचाकी चोर कचाट्यात सापडला. पाठलाग केल्यानंतर चोरट्याने या तरुणांवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला.

‘समांतर’साठी मुहूर्ताचा शोध

$
0
0
मोठ्या गाजावाजा करत पालिकेकडून पाणीपुरवठा योजना समांतरवाल्या कंपनीकडे हस्तांतरीत झाली, मात्र दोन महिन्यांनंतरही या प्रकल्पाची पाइपलाइन टाकण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही.

‘एसी’ हॉलची झाली अडगळ

$
0
0
हवा आणि पाण्याचा खुबीने वापर करत निजामाच्या राजवटीमध्ये तीनशे वर्षांपूर्वी हिमायतबागेत ‘एसी’ विश्रामगृह अवतरले होते. त्या काळातील वास्तूकलेचा अप्रतिम नमुना दाखवून पर्यटकांना आकर्षित करता येते.

मुस्लिम नगरसेवक MIMच्या वाटेवर?

$
0
0
शहरातील अनेक मुस्लिम नगरसेवक ‘एमआयएम’च्या वाटेवर असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिकेतील गटनेते अफसर खान यांनी मंगळवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वी एमआयएमचे प्रमुख खासदार ओवेसी यांच्याशी या संदर्भात चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जमिनीसाठी पत्नीने केला पतीचा खून

$
0
0
पतीने जमीन नावावर करून देण्यास नकार दिल्याने, पत्नीने साथीदारांसह मिळून पतीला बेदम मारहाण करत त्याचा खून केला. बदनापूर तालुक्यातील राजेवाडी शिवारात ही घटना घडली.

साथीच्या आजारांचा बीडमध्ये उद्रेक

$
0
0
अचानक बदललेल्या तापमानामुळे तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच, बीड जिल्ह्यामध्ये अन्य आजारांबरोबरच डेंगीनेही डोके वर काढले आहे. परळी येथील दोन बालकांचा डेंगीमुळे मृत्यू झाला आहे.

दुहेरी हत्याकांडातील पाच आरोपींना अटक

$
0
0
माहूरच्या रामगड किल्ला परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या प्रेमी युगुलाच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आले. दोन्ही विद्यार्थ्यांच्या प्रेमप्रकरणाला विरोध असल्यामुळेच दोघांचीही हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

इस्रायली तंत्रज्ञान औरंगाबादेत रुजले

$
0
0
कोरडे हवामान आणि पाणी टंचाईच्या परिस्थितीत केवळ आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आंबा लागवड यशस्वी करण्याचे धडे इस्त्रायलच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना शिकवले. ‘इंडो-इस्त्रायल’ कराराअंतर्गत हिमायतबाग फळबाग संशोधन केंद्रात केशर गुणवत्ता संशोधन प्रकल्प राबवला आहे.

गतिमंद मुलीवर पाटेगाव येथे बलात्कार

$
0
0
तालुक्यातील पाटेगाव येथे रविवारी (२६ ऑक्टोबर) एका गतीमंद मुलीवर बलात्काराची घटना घडली. याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार झाला आहे.

मतदानावरून बाप-लेकाला मारहाण

$
0
0
विधानसभा निवडणुकीत मतदान कोणाला केले, याचा जाब विचारत बाप-लेकाला मारहाण केल्याची घटना नंदापूर (ता. जालना) येथे घडल्याचे उघडकीस आले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images