Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नव्या कारभाऱ्यांपुढे आव्हानांचा डोंगर

0
0
जिल्हा परिषदेचा पुढील अडीच वर्षांसाठीचा नवीन डाव आता सुरू झाला आहे. ३० ऑक्टोबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. नव्या कारभाऱ्यांसमोर आव्हानांचे डोंगर असणार आहेत. सिंचन, बांधकाम आणि शिक्षण विभागातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

५० उद्योजक जपानला रवाना

0
0
मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर(मासिआ)च्या वतीने औरंगाबादमधील ५० उद्योजक जपान येथे अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झालेत. जपानमध्ये होणाऱ्या २७ व्या इंटरनॅशनल मशीन फेअर (जिमटॉक) व आठव्या इंटरनॅशनल प्लास्टिक फेअर (आय. पी. एफ.) मध्ये ते सहभाग नोंदवतील.

विद्यार्थ्यांनी केला परिसर स्वच्छ

0
0
एकीकडे शहरात कचऱ्याचे ढीग साचलेत. महापालिका प्रशासनासमोर शहर स्वच्छ ठेवणे आव्हानात्मक झाले आहे. दुसरीकडे पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेत विद्यार्थी परिसर चकाचक करत आहेत.

टंचाईच्या झळा; सुकला गळा!

0
0
ऐन पावसाळ्यात मराठवाड्यावर रुसलेल्या वरूण राजाने परतीची वाटही वाकडी केली. त्यामुळे औरंगाबाद, जालना आणि लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा टॅँकरचा फेरा सुरू झाला आहे. टंचाईच्या झळांनी नागरिकांचा गळा सुकला आहे.

नवा चेहरा हिट; फेसबुकवर फिट

0
0
कधी मैत्रिणीचे बिखरी जुल्फे, कधी बॉलिवुडची मेनका, कधी शाहरूख तर कधी धोनीसाठी वेडे होणारे फेसबूककर मंगळवारी मात्र नव्या मुख्यमंत्र्यांसाठी वेडे झाले.

फडणवीसांनी राज्याचा तुकडा पाडू नये!

0
0
मुख्यमंत्री म्हणून काम करताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा एकत्रित विचार करावा. वेगळ्या विदर्भाचा विचार करून राज्याचा तुकडा पाडू नये, अशी अपेक्षा राजकीय पक्षातील मंडळींनी व्यक्त केली.

...जिंदगी रहे गरमागरम!

0
0
डोंगराच्या कडेकोटात वसलेल्या औरंगाबादकरांना दिवाळीनंतर आता थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे त्यांची पावले बस स्टॅँड परिसरात उभारलेल्या तिबेटीयन बाजाराकडे वळत आहेत.

घाटीतील मनोविकृती विभाग वाऱ्यावर

0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) मनोविकृती विभागाचे एकमेव डॉक्टरही मागच्या आठवड्यापासून गायब आहे. त्यामुळे संपूर्ण विभाग हा हाऊस ऑफिसरच्या (एचओ) भरवशावर सुरू आहे.

जनधनावरही बडोदा बॅँकेचा डोळा

0
0
चक्क पंतप्रधानांनी सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या जनधन योजनेतल्या धनावरही बॅँक ऑफ बडोदाने डोळा ठेवला आहे. गारखेडा परिसरातल्या शाखेत खाते उघडण्यासाठी शंभर ते एक हजार रुपयांची मागणी केली जात आहे.

आजारी महिलेने घेतले पेटवून

0
0
आजारपणाला कंटाळलेल्या एका महिलेने स्वतःला पेटवून घेतले. तिला जळताना पाहून विझवण्यासाठी धावलेले मुलगा, मुलगी व महिलेची आई भाजले आहेत.

एटीएमफोड्यांचा म्होरक्या गजाआड

0
0
एटीएम फोडणाऱ्या टोळीचा सूत्रधार व कुख्यात गुन्हेगार दीपक बरडेला याला मुकुंदवादी पोलिसांनी सोमवारी (२८ ऑक्टोबर) रात्री अटक केली आहे. या टोळीने शहरी भागासोबत ग्रामीण भागातही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

सुरक्षारक्षक नेमा

0
0
‘एटीएमच्या सुरक्षेसाठी बँका उपाययोजना करीत नसल्याने पोलिसांनीच आता पुढाकार घेतला आहे. सुरक्षारक्षक नेमा किंवा सशुल्क पोलिस बंदोबस्त घ्यावा’, असा पर्याय बँकांसमोर ठेवण्यात आला आहे.

घड्याळाने काटे फिरवले

0
0
विधानसभा निवडणुकीत अवघी एक जागा मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात जम बसवण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. महानगरपालिका निवडणूक आणि पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या नगरसेवकांवरील कारवाईसाठी पक्षाने पुढील आठवड्यात बैठक बोलावली आहे.

सेवाभावाला आता तिलांजली

0
0
झोपडपट्टी वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना देखील समांतर जलवाहिनीचे पाणी विकत घ्यावे लागणार आहे. महापालिकेने समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीबरोबर केलेल्या करारातच त्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

गुटखा बंदी जेमतेम

0
0
राज्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली गुटखा व पानमसाल्यावरील बंदी यावर्षीही लागू करण्यात आली. भेसळयुक्त व अयोग्य अन्नपदार्थ व औषधांपासून राज्यातील नागरिकांचे संरक्षण करण्याची बजाजदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासनाने ( एफडीए) गुटखा बंदी कायद्यांची अंमलबजावणीसाठी जनजागृती अभियान राबविल्यानंतर कारवाईचा बडगा उगारला आहे

नगरसेवक ‘एमआयएम’च्या वाटेवर?

0
0
शहरातील अनेक मुस्लिम नगरसेवक ‘एमआयएम’च्या वाटेवर असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिकेतील गटनेते अफसर खान यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वी एमआयएमचे प्रमुख खासदार ओवेसी यांच्याशी या संदर्भात चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रब्बी हंगाम हातचा गेल्याने चिंता

0
0
सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे रब्बी हंगामावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. जिल्ह्यात रब्बीची केवळ ८.२६ टक्के पेरणी झाली आहे. पाच वर्षांतील सर्वात भीषण हंगाम असल्यामुळे शेतीचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडणार आहे.

जालन्यात जमते, औरंगाबादेत का नाही?

0
0
जालना शहरातील रस्त्यांवरील फेरीवाले, बेशिस्त पार्किंग व दुकानाबाहेर साहित्य मांडणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करून वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांपासून वाहतुकीली शिस्त लावली आहे.

शपथविधीसाठी मुंबईची विमाने हाऊसफुल्ल

0
0
मुंबईत होणाऱ्या शपथविधीला संपूर्ण मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या नेते-कार्यकर्त्यांसह दिवाळीच्या सुट्यांमुळे टूरवर निघालेल्या प्रवाशांमुळे पुढच्या काही दिवसात औरंगाबादहून मुंबईला जाणारी विमाने हाऊसफुल्ल झाली आहेत.

सिडको उद्यानात पुन्हा वृक्षारोपण

0
0
सिडकोच्या एलआयजी-एमआयजी योजनेतील उद्यानात बुधवारी (२९ ऑक्टोबर) शंभराहून अधिक झाडे लावण्यात आली. महाराष्ट्र टाइम्समध्ये बातमी प्रकाशित होताच प्रशासनाचे डोळे उघडले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images