Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

२८२ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पदोन्नती

0
0
गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना अखेर बढती मिळाली आहे. राज्यातील २८२ सहायक पोलिस निरीक्षकांना; तसेच ६०१ पोलिस उपनिरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे.

मुक्त विद्यापीठात ‘सर्व्हिस अॅडमिनिस्ट्रेशन’

0
0
बीपीओ, केपीओ अशा ग्राहकसेवा क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमकेसीएल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांनी एकत्र येऊन ‘बीए सर्व्हिस अॅडमिनिस्ट्रेशन’ अभ्यासक्रम सुरू केला आहे.

अल्पवयीन मुलीला पळविणारा गजाआड

0
0
एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या आरोपीस तब्बल दोन महिन्यानंतर पुण्याहून जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

देवस्थान घोटाळ्याप्रकरणी आज निदर्शने

0
0
पंढरपूर देवस्थानातील घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे आज, रविवारी दुपारी बारा वाजता क्रांती चौकात निदर्शने करण्यात येणार आहेत.

नाथसागरातील साठा ११ टक्क्यांवर

0
0
नगर, नाशिक जिल्ह्यांतील पावसामुळे नद्यांच्या पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जायकवाडी प्रकल्पाच्या जलसाठ्यात गेल्या आठवडाभरात वेगने वाढ झाली आहे.

स्कूल बसची विजेच्या खांबाला धडक

0
0
समोरुन आलेल्या एका मिनी बसची धडक बसून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस विजेच्या खांबावर जोरदार धडकली. शनिवारी सकाळी विभागीय स्टेडियमजवळ हा अपघात झाला.

गृहनिर्माण संस्थांचा हायवेला विरोध

0
0
धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या (क्रमांक एनएच २११) विरोधात सहकारी गृहनिर्माण संस्थांनी कृती समिती स्थापन केली आहे.

टंचाई असूनही टँकर बंद

0
0
दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये ३१ जुलैपर्यंत टँकर सुरू ठेवण्याची मुदत संपल्याने प्रशासनाने टँकर बंद केले आहेत. औरंगाबादेतील टंचाई अद्यापही न संपल्याने ११६ टँकर सुरू होते.

मालमत्ता जप्ती उद्यापासून

0
0
एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मालमत्ताकर ज्या मालमत्तांचा थकलेला आहे, त्या मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही पालिका सोमवारपासून हाती घेणार आहे.

खड्ड्यांमुळे मोडला पाय

0
0
औरंगाबाद शहरातील रस्ते, खड्डे आणि पथदिवे याबाबत जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे. ढिम्म महापालिकेचा फटका शहरवासियांना रोजच बसतो, पण देशात पर्यटनासाठी आलेल्या गो-या साहेबांना शुक्रवारी याचा दणका बसला.

गटबाजीपेक्षा कामाला महत्त्व द्या!

0
0
औरंगाबादच्या शिवसेनेमध्ये गटबाजी आहे हे अप्रत्यक्षपणे मान्य करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांना कोणत्याही व्यक्तीचा शिक्का आपल्या कपाळावर मारून घेऊ नका, शिवसेनेचाच शिक्का कपाळावर मारून घ्या, असे आवाहन शनिवारी केले.

स्वच्छतेशी ‘फ्रेंडशिप’ करण्याचा कृतीतून संदेश

0
0
शहरात स्वच्छता ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, पण तसे न करता कचरा कुंडीत न टाकता उघड्यावर फेकून अस्वच्छतेसाठी प्रशासनाला जबाबदार धरणे शहरातील अनेकांची सवय होत चालली आहे.

‘महसूली प्रकरणे वेळेत निकाली काढा’

0
0
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व पारदर्शक होण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महसूली प्रकरणे जलदगतीने निकाली काढावीत. त्यामुळे सामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचेल.

पैनगंगेच्या पुरात पुलावरील रस्ता उखडला

0
0
पंधरा दिवसांमध्ये तीन वेळा पूर अनुभवलेल्या हिमायतनगरमधील पाण्याचा प्रवाह ओसरला आहे. मात्र, या पुरामुळे विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या पुलाचा एक किलोमीटर लांबीचा रस्ताच वाहून गेल्याचे दिसून आले.

शेतीच्या कामांसाठी उघडीपीची प्रतीक्षा

0
0
पंधरा-वीस दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतातील पिके पिवळी पडू लागली आहेत. जमिनीत वाफसा नसल्यामुळे कोळपणी, निंदणीसारखी मशागतीची कामे खोळंबली आहेत.

‘युवक’च्या नोंदणीमुळे काँग्रेसमध्ये ‘जान’

0
0
युवक काँग्रेसतर्फे देशात नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली असून, या नोंदणीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काँग्रेस अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे.

नाथसागर ‘जिवंत’ झाल्याने पर्यटन क्षेत्राला संजीवनी

0
0
जायकवाडीच्या नाथसागर जलाशयामध्ये पाण्याची आवक सुरू झाली, तशी वर्षभरापासून पैठणकडे पाठ फिरवलेल्या पर्यटकांची पावले पुन्हा या धरणाच्या परिसराकडे वळत आहेत.

‘...तरच उमेदवारी मागे घेऊ’

0
0
पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तरच उमेदवारी मागे घेऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सीईओ पठाण यांच्या निर्णयांची चौकशी

0
0
महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या सीईओपदी असताना एन. डी. पठाण यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी करण्यासाठी माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पाण्यासाठी लोकलढा

0
0
‘मराठवाड्याच्या समग्र विकासासाठी पाण्याची गरज आहे. त्यामुळे पाणी सिंचनाला की उद्योगाला या सापळ्यात न अडकता लोकलढा उभारावा,’ असा निर्धार पाणी परिषदेत व्यक्त झाला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images