Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लातुरात आंदोलनाला हिंसक वळण

$
0
0
नगर जिल्ह्यातील जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ लातूरमध्ये काढण्यात आलेल्या महामोर्चाला शनिवारी हिंसक वळण मिळाले. या मोर्च्यातील आंदोलकांनी वाहने आणि दुकानांवर जोरदार दगडफेक केली.

जालना रोडची दुरुस्ती प्रतीक्षेत

$
0
0
वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी २१ कोटी रुपये मंजूर केल्याच्या राज्यकर्त्यांच्या घोषणा अखेर फोल ठरल्या आहेत. वर्ष उलटून गेले तरीही केवळ एक कोटीचाच निधी प्राप्त झाला आहे.

अंधश्रद्धा रोखा जबाबदारी तरुणांची

$
0
0
आजचा काळ बदलला असून, शिक्षणाने समाज शिक्षित होतो आहे. असे असले तरी समाजात छोट्या-छोट्या गोष्टीतून अंधश्रद्धा खोलवर रुजविली जाते आहे. अशा प्रकारांना ओळखून त्यांना आवर घालता आला पाहिजे आणि ही जबाबदारी तरुणांवर अधिक आहे, असे प्रतिपादन फँड्रीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.

‘बचेंगे तो और भी लडेंगे’

$
0
0
गेली १५ वर्षे सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीतील पराभव पचवणे कठीण जात आहे. वैजापूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचा शनिवारी (१ नोव्हेंबर) राष्ट्रवादी भवनात पक्षाने जाहीर सत्कार केला.

महिला कंडक्टरला मारहाण

$
0
0
शहर बसमध्ये महिला वाहक सुबम्मा सानिकारा यांना शुक्रवारी रात्री दोन महिला प्रवाशांनी मारहाण केली. क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर त्यांची घाटीत वैद्यकीय चाचणी झाली; मात्र या प्रकरणाची एस. टी. महामंडळाने शनिवारी दिवसभर दखल न घेतल्याचा आरोप सुबय्यांनी केला आहे.

समांतरच्या उंटावरून शेळ्या

$
0
0
समांतर जलवाहिनीच्या कामासंदर्भात महापालिकेने औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनीबरोबर करार केला असला तरी, ही कंपनी या कामावर फक्त देखरेख करणार आहे. या योजनेंतर्गत विविध टप्प्यांत केली जाणारी कामे कंपनी आऊटसोर्सिंगच्या माध्यमातूनच करून घेणार असल्याचे या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी अनौपचारिक गप्पा मारताना स्पष्ट झाले.

अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर देणार

$
0
0
‘फुलंब्री मतदारसंघातील सर्व प्रकारची अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर सर्वात आधी लक्ष केंद्र‌ित करणार आहे,’ असे नवनिर्वाचित आमदार हरिभाऊ बागडे यांनी ‘म.टा.’शी बोलताना सांगितले. पक्षाच्या भूमिकेप्रमाणे आमदार नव्हे तर, जनतेचा सेवक या नात्याने पाच वर्ष कामकाज करणार असल्याचे ते म्हणले.

पोलिसाचा संशयास्पद मृत्यू

$
0
0
जालना पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस नाईकचा मृतदेह त्याच्या राहत्या घरातच रविवारी (२ नोव्हेंबर) कुजलेल्या अवस्थेत आढळला. या मृतदेहामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती.

ऐन पर्यटन हंगामात प्रतिष्ठाणनगरीत अंधार

$
0
0
गेल्या दोन महिन्यापासून पैठण शहरातील लोडशेडिंग कमी प्रमाणात करण्यात आले होते. मात्र, दिवाळी संपताच पैठण शहरात सकाळी सहा ते नऊ व संध्याकाळी पाच ते साडेआठ याप्रमाणे साडेसहा तासाचे लोडशेडिंग पुन्हा सुरू झाले आहे.

लोंबकळणाऱ्या तारांचे हायटेंशन केले दूर

$
0
0
साताऱ्यातील छत्रपतीनगर गट क्र. १३८ मधील रहिवाशी ढगे यांच्या घराच्या स्लॅबला चिटकून खांबाच्या तारा गेलेल्या आहेत. दोन खांबांमधील अंतर जास्त असल्यामुळे या तारा लोंबकळत होत्या.

आरक्षण बदलांना विद्यापीठाचा चाप

$
0
0
आरक्षणाची वाढती व्याप्ती लक्षात घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘स्पेशल सेल’ सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर नियंत्रणासाठी ‘स्टँडिंग अॅडव्हाजरी कमिटी ऑफ रिझर्व्हेशन’ची स्थापनाही करण्यात आली.

परीक्षांचा रविवार

$
0
0
सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, स्टाफ सलेक्शन बोर्डातर्फे विविध पदांसाठी रविवारी (३ नोव्हेंबर) परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षा परिषदेतर्फे प्रज्ञा शोध परीक्षाही झाली.

राजकारणात धर्माला विकासापेक्षा महत्त्व

$
0
0
‘लोकशाही पद्धतीने होत असलेल्या निवडणुकांमध्ये विकास हा मुद्दा बाजूला पडला असून राज्यकर्त्यांना त्यापेक्षा धर्म आणि धर्मश्रद्धा हे विषय अधिक जवळचे वाटतात,’ अशी खंत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी राज्यव्यापी युवा संकल्प परिषदेचा समारोप करताना व्यक्त केली.

नामुष्की विद्यापीठ प्रशासनाची

$
0
0
विद्यापीठांच्या परीक्षेला काही गालबोट लागले नाही, परीक्षा सुरळीत पार पडली, असे अभावावानेच घडते, असे म्हणण्यासारखी स्थिती आहे. गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी नेमलेली भरारी पथके रद्द करणे आणि २४ तासात पुन्ह‌ा ते कायम ठेवण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढावली.

आरटीओ अधिकारी लाच घेताना अटक

$
0
0
नाशिक येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत वसंतराव पाटील यांना साथीदारासह दहा हजार रुपयांची लाच घेतना अँन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ( ३१ ऑक्टोबर) पकडले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तरपत्रिकेचा दर १९ ते २२ लाख

$
0
0
उत्तरपत्रिका फोडून विकणाऱ्या या टोळीची माहिती पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी सहा महिन्यापूर्वीच आर्थिक गुन्हेशाखेला दिली होती. मात्र परीक्षेची तारीख निश्चित नसल्याने पोलिसांनी वाट पाहिली. हे पोलिसांच्या पथ्यावर पडले. तब्बल ३६ तास प्रयत्न करून पोलिसांनी या टोळीला जेरबंद केले.

कचनेर यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी

$
0
0
श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर (ता. औरंगाबाद) येथे पाच ते सात नोव्हेंबर दरम्यान वार्षिक यात्रा महोत्सव होणार आहे. महोत्सवाला राज्यभरातील दोन लाख भाविक उपस्थित राहणार असून भाविकांसाठी निवास व प्रवासाची व्यवस्था केली आहे, अशी माहिती सुरेश कासलीवाल यांनी दिली.

शास्त्रीय जुगलबंदीचे निनादले सूर

$
0
0
तबला, पखावज आणि संवादिनीच्या शास्त्रीय सुरावटींची जुगलबंदी रसिकांसाठी पर्वणी ठरली. उपासना मंचच्या वतीने रविवारी (२ नोव्हेंबर) सायंकाळी तापडिया नाट्यमंदिरात शास्त्रीय मैफल आयोजित करण्यात आली होती. पं. नाथराव नेरळकर यांचे शास्त्रीय गायन श्रवणीय स्वराविष्कार होते.

सिव्हिल हॉस्पिटलचा मुहूर्त नवीन वर्षातच

$
0
0
गेल्या ४० वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णांना नवीन वर्षात सिव्हिल हॉस्पिटलची सेवा मिळणार आहे. डिसेंबर अखेर या इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार असून पुढील दोन महिन्यात यंत्रसामग्री खरेदीसाठी निधी उपलब्ध झाला, तर जानेवारीपासून रुग्णालय सेवेत उपलब्ध होणार आहे.

गोरगरिबांसाठी ‘मटा हेल्थ लाइन’

$
0
0
शहराला विविध सेवा पुरविणाऱ्या सेवेकऱ्यांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने हाती घेतलेल्या 'हेल्थलाइन' उपक्रमात तन-मनाने सहभागी होण्याचा निर्धार रविवारी (२ नोव्हेंबर) एकनाथनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि नागरिकांनी केला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images