Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विद्यापीठाला हवे चौकाचौकांत कॉलेज

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कल गुणात्मकतेपेक्षा संख्यात्मक वाढीकडे दिसतो आहे. कॉलेजांची संख्या ४००वर गेली असताना, विद्यापीठाला आणखी नवीन शंभर कॉलेज हवी आहेत.

दिव्यांचे टेंडर ठेकेदाराच्या हिताचे

$
0
0
पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी बदलीचे आदेश मिळाल्यानंतरही एलइडी पथदिव्यांची निविदाप्रक्रिया मंजूर केली. या प्रकरणात सर्व बाबी बेकायदा असून ठेकेदाराचे आर्थिकहित जपण्यासाठीच त्या करण्यात आल्या आहेत, अशा शब्दांत औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. बोर्डे व न्या. व्ही. के. जाधव यांनी कांबळे व पालिकेच्या कारभारावर कडक ताशेरे ओढले.

उत्तरपत्रिका फोडणारी टोळी जेरबंद

$
0
0
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या परीक्षेची उत्तरपत्रिका विकणारी टोळी पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री जेरबंद केली. त्यात औरंगाबादचा विक्रीकर निरीक्षक, वाडेकर क्लासेसचे संचालक, बँक क्लर्क, आरटीओ लिपिकासह तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

हा तेल नावाचा प्रवास आहे!

$
0
0
पेट्रोल संपले, डिझेल संपले तर जगणे थांबते. शहरीपट्ट्यातले सगळे जीवन इंधनावर आधारलेले आहे. फक्त कच्चे तेल महागले की पेट्रोल - डिझेल महागते इतकीच जाण आपल्याला असते. मात्र, खरेच हे इंधन नेमके तयार होते कुठे? ती प्रक्रिया असते कशी?

बीडमध्ये सैन्यभरतीवेळी मृत्यू

$
0
0
बीड जिल्ह्यात मेगा सैन्य भरती सुरू आहे. या सैन्य भरतीसाठी आलेल्या एकवीस वर्षीय तरुणाचा सोमवारी भरतीच्या ठिकाणी चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाला.

बेकायदा पाणी उपसा वाढला

$
0
0
पर्जन्यमान कमी असल्यामुळे गिरिजा मध्यम प्रकल्पात पाण्याचा साठा वाढला नाही. सध्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. या परिस्थितीत खुलताबादसह १८ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या येसगाव येथील गिरिजा प्रकल्पातून अनधिकृतरित्या बेसुमार पाणी उपसा केला जात आहे.

कांदा सडला, शेतकरी रडला

$
0
0
भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सडला आहे. सध्या कांद्याच्या भावात थोडीफार सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी काढला आहे. परंतु सडलेल्या कांद्याला भाव मिळत नसल्याने यावर्षी कांद्याचा व्यवहार तोट्याचा ठरत असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

बेकायदा वाळू उपसा

$
0
0
सध्या जिल्ह्यात सगळे नियम धाब्यावर बसवत वाळूचा उपसा आणि विक्री सुरू आहे. महसूल प्रशासनाच्या डोळ्यांदेखत हे सुरू असताना, अधिकारी मात्र जाणूनबुजून दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

साडेतीन लाखांचे दागिने लंपास

$
0
0
मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवासी महिलेचे साडेतीन लाख रुपयांचे दागिने पळविण्यात आले आहेत. गेल्या वीस दिवसांतील ही दुसरी घटना असून बसस्थानकात चोरांकडून सातत्याने महिला प्रवाशांना लक्ष्य केले जात आहे. शिवाय येथे सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याने चोरांचे चांगलेच फावत आहे.

‘तो’ जिवंतपणीच भोगतोय मरण

$
0
0
जालन्याच्या रेल्वेस्टेशन भागात एका दुचाकीने निर्दयपणे उडविले... जालन्याच्या रुग्णालयात थातूर-मातूर उपचार करून घाटीत पाठविले.. घाटीत कसे-बसे एक दिवस उपचार केले आणि घाटीच्याच ओपीडीसमोर आणून टाकले.. तेव्हापासून म्हणजेच गेल्या दहा दिवसांपासून एक चाळीशीतली व्यक्ती ओपीडीसमोरच पडून आहे..

साडेचार लाख औरंगाबादकर मधुमेहाच्या उंबरठ्यावर

$
0
0
तब्बल ३० टक्के शहरवासीय हे मधुमेहाच्या उंबरठ्यावर आहेत; म्हणजेच साडेचार लाख शहरवासीय मधुमेह आजाराच्या पूर्वस्थितीत आहेत आणि त्यांना कधीही मधुमेह होऊ शकतो. त्याचवेळी १३ टक्के म्हणजेच सुमारे दोन लाख शहरवासीय हे थेट मधुमेही आहेत. या स्थितीमुळेच प्रत्येकाने योग्य आहार व व्यायामातून मधुमेहावर मात करणे आवश्यक असून, या संबंधीच्या जनजागृतीसाठी रविवारी (१६ नोव्हेंबर) ‘वॉक फॉर डायबेटिस’ अर्थात विशेष फेरी होणार आहे

औरंगाबादमध्ये जळगाव रोडची दुर्दशा

$
0
0
औरंगाबाद शहरातील व्हीआयपी रोड म्हणून ओळखला जाणार जळगाव रस्ता आता खड्डेमय झाला आहे. चार किलोमीटरच्या रस्त्यावर दोन्ही बाजुंनी हजारो खड्डे पडले आहेत.

वसतिगृहांची दुर्दशा

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने कुलगुरू आणि संवैधानिक अधिकाऱ्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीसाठी तसेच कारसाठी लाखोंचा खर्च केला मात्र वसतिगृहांतील गैरसोयींकडे दुर्लक्ष केले आहे.

पुस्तकांचा पैसा कंत्राटदारांच्या घशात!

$
0
0
वाचन संस्कृती आणि महापालिकेचे प्रशासन यांचा काही संबंध आहे का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्याला कारणही तसेच आहे. चार वर्षांपासून महापालिकेच्या ग्रंथालयांसाठी पुस्तकांचीच खरेदी करण्यात आलेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

उत्तरपत्रिका फुटीचा तपास सुरू

$
0
0
जिल्हा परिषद पदभरती लेखी परीक्षेची उत्तरपत्रिका फोडून विकणाऱ्या टोळीतील एका एजंटाकडील यादीमध्ये पन्नासपेक्षा जास्त परीक्षार्थींनी अॅन्सर कीसाठी नोंद केल्याची माहिती सापडली आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्यापी मोठी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. हाती लागलेल्या यादीनुसार सुमारे पाच कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

मनपात भाजपचा स्वबळाचा प्रयोग?

$
0
0
महापालिकेच्या आगामी निवडणुकीतही स्वबळ आजमावण्याच्या तयारीत भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. सोमवारी (३ नोव्हेंबर) भाजपच्या विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत अनेकांनी स्वबळाचा सूर आळवला.

MIM प्रवेशास इच्छुकांची गर्दी

$
0
0
आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीनकडे (एमआयएम) इच्छुकांचा लोंढा वाढला आहे. त्यात काही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत, मात्र याबद्दलचा निर्णय हैदराबाद येथे होईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशी यांनी दिली.

दीड लाख किडणींची गरज

$
0
0
देशभरात दरवर्षी दीड लाख मूत्रपिंड प्रत्यारोपणाची (किडनी ट्रान्सप्लान्ट) गरज आहे, पण केवळ पाच हजार रुग्णांवरच प्रत्यारोपण होते. म्हणजेच प्रत्यारोपणाचे प्रमाण अवघे तीन टक्के आहे. त्यातच ‘कॅडेव्हर ट्रान्सप्लान्ट’ अर्थात मेंदूच्या दृष्टीने मृत ठरलेल्या व्यक्तींच्या अवयव दानातून होणाऱ्या प्रत्यारोपणाचे प्रमाण अगदीच अत्यल्प आहे.

श्वानदंश झाला जीवघेणा

$
0
0
कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रेबीज हा रोग जडू नये, यासाठी प्रभावी असलेल्या ‘अँटी रेबीज सिरम’ (एआरएस) या इंजेक्शनचा गेल्या आठ महिन्यांपासून घाटी रुग्णालयात तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यभर अशीच परिस्थिती असल्याने श्वानदंशाच्या रुग्णांच्या जीवाला धोका उद‍‍्‍भवण्याची शक्यता आहे.

एटीएममधून पैसे काढा बिनधास्त

$
0
0
पाचपेक्षा जास्तवेळा एटीएम वापरावर शुल्क आकारण्यास बँकांना शनिवारपासून (१ नोव्हेंबर) परवानगी मिळाली आहे, पण औरंगाबाद शहरात एकाही मोठ्या बँकेने शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला नाही. औरंगाबाद शहराचा मेट्रो शहरांच्या यादीत समावेश केला जात नाही, त्यामुळे तूर्त तरी औरंगाबाद शहरांतील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>