Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

एवढी तत्परता कशासाठी ?

$
0
0
पथदिव्यांच्या संदर्भात महापालिका प्रशासनाने दाखवलेली तत्परता न्यायप्रविष्ट झाली आहे. या तत्परतेवर ताशेरे ओढत हायकोर्टाने पथदिव्यांची निविदा पुन्हा नव्याने काढण्याचे आदेश महापालिकेला दिले. शुद्ध मनाने पथदिव्यांचे काम करायचेच होते आणि केलेल्या कामाचे दिवे लावायचेच होते तर, कोर्टाने फटकारण्याइतपत तत्परता कशासाठी दाखवली गेली असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो.

विजेवरील एलबीटीचा भडका

$
0
0
जीटीएलतर्फे या महिन्यात आलेल्या वीज बिलांमध्ये एलबीटी आकारणी करण्यात आली आहे. विजेवर एलबीटी आकारणीला वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली नसताना अतिरक्त कर वसूल केला जात आहे.

रसाळ डाळींबाची बाजारपेठेत चांदी

$
0
0
कमी पाणी आणि कमी कालावधीत फायदेशीर ठरलेल्या डाळींब उत्पादनाकडे शेतकरी वळले आहेत. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी डाळींब फळबागांची लागवड केली. सध्या मराठवाड्यात औरंगाबाद तालुका डाळींब लागवड आणि उत्पादनात अव्वल ठरला आहे.

टीडीआर, एफएसआयचा घोळ मिटेना

$
0
0
गेल्या काही वर्षांपासून विकास हक्क हस्तांतर (टीडीआर) मिळाला नाही, चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळाला नाही, असे गाऱ्हाणे घेऊन शहरातील काही बिल्डर आणि नागरिकांनी महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांची भेट घेतली.

चला, निघा गावाकडं

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात क्रीडा महोत्सव आहे. त्यामुळे वसतिगृहांतील विद्यार्थ्यांनी या कालावधीत घरी जावे, असे निर्देश विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. हा क्रीडा महोत्सव २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान होत आहे.

‘अन्सर की’ जुळली; परीक्षा रद्द

$
0
0
जिल्हा परिषद पदभरती लेखी परीक्षेची उत्तरपत्रिका फोडून विकणाऱ्या टोळीतील एका सदस्याकडे मिळालेली अॅन्सर ‌की हुबेहूब जुळली आहे. त्यामुळे यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी ही परीक्षा रद्द करून चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.

व्हाइट टॉपिंगचे रस्ते रखडले

$
0
0
समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला साडेपाच कोटी रुपयांचा हप्ता दिल्यामुळे शहरात सुरू असलेली रस्त्यांच्या व्हाइट टॉपिंगची कामे रखडली आहेत. पेमेंट न मिळाल्यामुळे कंत्राटदाराने रस्त्यांचे काम बंद केले आहे.

'ते' विधेयक एसटीच्या मुळावर

$
0
0
केंद्र शासनाच्या ‘रोड ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टी बील २०१४’च्या भाग ७मध्ये खासगी बस वाहतूकदारांना टप्पा वाहतुकीची परवानगी देण्यात येणार आहे. यामुळे एसटीसह देशातील सार्वजनिक वाहतूक सेवा करणारे एसटी महामंडळ तोट्यात येण्याची भिती आहे.

'त्यांना' आजही रस्त्याची प्रतीक्षा

$
0
0
स्वातंत्र्य मिळाले. देशात रस्त्यांचे जाळे विणले. पंतप्रधानांच्या नावाने ‘ग्राम सडक योजना’ आली. ग्रामपंचायतीचा कारभार विस्तारला. नागरी वसाहती वाढल्या. ग्रामपंचायतीची नगर पालिका झाली..., ही सारी स्थित्यंतरे होनवणे, कोळेकर या वसाहतींनी पाहिली.

मराठवाडा दुष्काळाच्या दावणीला

$
0
0
भर पावसाळ्यातला दगा, परतीच्या पावसाची हुलकावणी, वाया गेलेला खरीप हंगाम यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यात दुष्काळाच्या दावणीला बांधला आहे. या परिस्थितीची हाताळणी करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी तयारी सुरू केली आहे.

शाळांच्या तपासणीला ठेंगा!

$
0
0
शाळांच्या तपासणीसाठी महापालिकेकडे विस्तार अधिकारीच नाही. त्यामुळे शाळा तपासणीचे काम कसे करायचे, असा प्रश्न महापालिकेच्या शिक्षण विभागासमोर निर्माण झाला आहे. याच कारणामुळे शाळा तपासणीचा शासनाने काढलेला आदेश लालफितीतच अडकला आहे.

अपघातात विद्यार्थिनी मृत्युमुखी

$
0
0
स्टेशन रोडवर एसएससी बोर्डासमोर कोचिंग क्लासकडे पायी जाणाऱ्या विद्यार्थिनीचा भरधाव ओम्नीने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. मंगळवारी (४ नोव्हेंबर) दुपारी चारच्या सुमारास हा अपघात घडला.

स्वच्छता मोहीम आणि करवसुली !

$
0
0
भल्या पहाटे उठून स्वच्छता मोहीम, दुपारपासून कर वसुलीच्या कामात स्वतःला झोकून देत काम केल्यामुळे नगराध्यक्षा पार्वतीबाई रत्नपारखे, जालन्यात चर्चेचा विषय झाल्या आहेत. या दोन्ही मोहिमांनी त्यांना अक्षरशः झपाटले आहे.

जायकवाडी धरणातून उद्या बंधाऱ्यांत पाणी सोडणार

$
0
0
अत्यल्प पर्जन्यमान व दोन्ही बंधारे कोरडे असल्याने हवालदिल झालेल्या गोदावरी नदीवरील जवळपास चाळीस गावांचा गावकऱ्यांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. जायकवाडी धरणातून हिरडपुरी व आपेगाव बंधाऱ्यात शुक्रवारी (७ नोव्हेंबर) १५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडले जाणार असल्याची माहिती आमदार संदीपान भुमरे यांनी दिली.

महामार्गावरील खड्ड्यात मुरूम!

$
0
0
शहरातून गेलेल्या औरंगाबाद- जळगाव महामार्गावरील खड्डे डांबर व खडीने बुजविण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यात मातीमिश्रीत मुरूम टाकला जात आहे. यामुळे वाहने गेल्यानंतर धूळ उडून वाहनचालकांना त्रास होणार आहे.

पाय रस्त्यांवर अन् जीव मुठीत

$
0
0
चाळणी झालेले रस्ते, रखडलेले काम आणि चालण्यासाठी शिल्लक नसलेले फूटपाथ यामुळे शहरातील पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. मंगळवारी (४ नोव्हेंबर) पद्मपुराभागात रस्ता ओलांडताना एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सात वर्षांपासून पैठण रस्ता अधांतरी

$
0
0
गेल्या सात वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पैठण रस्त्याचे ग्रहण अजूनही संपण्याची चिन्हे नाहीत. तीन वेळा निविदा काढूनही कंत्राटदार पुढे आले नाही. त्यानंतर केंद्र, राज्य व कंत्राटदार एकत्र येऊन पीपीपी तत्वावर रस्ता करण्याची योजना समोर आली.

दीडशे कोटींचा मोबदला द्यायचा कसा?

$
0
0
दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या भूसंपादनाच्या सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या मावेजाला गायरान जमिनीने खोडा घातला आहे. या जमिनींच्या व्यवहाराचा एकही परिपूर्ण प्रस्ताव, शेतकऱ्यांकडून प्रशासनाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे या जमिनीच्या मोबदल्याचे भिजत घोंगडे कायम आहे.

पराभव झाला तरी, लढे तीव्र करणार

$
0
0
विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी, जनतेच्या प्रश्नांवरील लढे तीव्र करण्याचा निर्धार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मेळाव्यात करण्यात आला. ‘जनसामान्यांचे प्रश्न अधिक तीव्र झाले असल्याने कार्यकर्त्यांनी त्यावर लक्ष केंद्रित करावे,’ असे आवाहन भाकपचे राज्यसचिव डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले.

ट्रॅव्हल्सच्या सहा गाड्या जप्त

$
0
0
हायकोर्टाच्या आदेशानंतर आरटीओच्या वायुवेग पथकाने (फ्लाइंग स्कॉड) अखेर ट्रॅव्हल कंपन्यांच्या मोटारींवर कारवाईला सुरुवात केली आहे. पथकाने मंगळवारी तपासणी करून सहा बसगाड्या जप्त केल्या आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images