Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खुर्चीसाठी रस्सीखेच

$
0
0
औरंगाबाद जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांची दुसरी इनिंग सुरू झाली. पदाधिकारी आल्यानंतर समित्याच्या बदलाचेही वारे वाहू लागले आहे. शिक्षण विभागासाठीच्या समितीवर शिक्षक संघटनांचे दोन निमंत्रित सदस्य असतात. त्यावर वर्णी लागावी, म्हणून शिक्षक संघटनांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

महापालिकेत उगवला बैठकांचा दिवस

$
0
0
निवडणुकीच्या वातावरणातून पालिकेचे पदाधिकारी अखेर बाहेर आलेत. विविध कामांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (५ नोव्हेंबर) पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या बैठका घेतल्या. त्यामुळे खूप दिवसांनी पालिकेत बैठकांचा दिवस उगवला.

महिलांनीच सोडविली कचऱ्याची समस्या

$
0
0
अपना नगरच्या परिसरात आणि मैदानावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या याच भागातील महिलांनी यशस्वीरित्या सोडविली. अपना नगरच्या प्रत्येक घरातील ओला व सुका कचरा वेगळा करून कंपोस्ट खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे.

मंत्र्याअभावी राज्याचा आरोग्य विभाग वाऱ्यावर

$
0
0
नवीन सरकारमध्ये शपथ घेतलेल्या मंत्र्यांना दिलेल्या खात्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे मात्र दुर्लक्ष झाले. गेल्या दोन महिन्यांपासून राज्याचा आरोग्य विभाग वाऱ्यावर असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

पोलिस मामा, आईला वाचवा हो...

$
0
0
‘पोलिस मामा, माझा बाप घरी दारू‌ पिऊन आला आहे. माझ्या आईला बेदम मारहाण करीत आहे. प्लीज, माझ्या आईला वाचवा,’ अशी विनंती करीत एका अकरा वर्षाच्या मुलाने क्रांती चौक पोलिस ठाण्यात धाव घेतली.

‘पेमेंट लकव्या’ने रस्ता रखडला

$
0
0
आर्थिक तरतूद असतानाही महापालिकेने पेमेंट न केल्यामुळे क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन या रस्त्याचे काम कंत्राटदाराने पूर्णपणे थांबवले आहे. ठेकेदार आणि महापालिका यांच्यातील वादाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे.

नागरिकांनी वाचवला भूखंड

$
0
0
गोपीकिशन नगर येथील नागरिकांनी मोकळे भूखंड हडप करणाऱ्या टोळीच्या तावडीतून कॉलनीचा भूखंड वाचविला आहे. नागरिकांनी या प्रकाराच्या विरोधात थेट न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने भूखंड माफियांना बुधवारी नोटीस बजाविल्या.

शिवसेनेचे वॉर्डा-वॉर्डात लक्ष

$
0
0
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेने आता वॉर्डा-वॉर्डात लक्ष देण्याचे ठरविले आहे. स्वबळाचा नारा न देता प्रत्येक वॉर्डात सक्षमपणे उभे राहण्यावर जोर देण्याचे बुधवारी (५ नोव्हेंबर) पदाधिकारी व नगरसेवकांच्या बैठकीत ठरवण्यात आले. या बैठकीत एमआयएम बद्दलही चर्चा झाली.

वाघाचे कातडे, कासव जप्त

$
0
0
वाघाचे कातडे आणि कासवाची तस्करीचे प्रयत्न शहर पोलिसांनी बुधवारी (५ नोव्हेंबर) सापळे रचून उधळून लावले. पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये वाघाचे कातडे नेणाऱ्याला सिल्लेखाना परिसरात पकडले, तर कासव विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तिघांना उस्मानपुरा भागा अटक करण्यात आली.

थंडीची चाहूल जीम ‘फुल्ल’

$
0
0
पूर्वी शहरातील सार्वजनिक व्यायामशाळांत तरुण मुले व्यायामासाठी जात असत. त्या ठिकाणी पारंपरिक व्यायाम साहित्यांच्या माध्यमातून शरीर प‌िळदार करण्याचा प्रयत्न होत असे.

कारखान्यांच्या निवडणुकींची लगीनघाई

$
0
0
उस्मानाबाद जिल्ह्यातील सात सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक डिसेंबर २०१४ अखेर होत आहे. यामध्ये दोन सुस्थितील तर पाच डबघाईस आलेल्या सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.

दिवसाची अर्धी कमाई पाण्यावर

$
0
0
उन्हाळा सुरू होण्यास अजून पाच महिन्यांचा कालावधी आहे, मात्र जयभवानीनगरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. बोअरचे पाणी आटले असून, टॅँकरचे दर शंभर रुपयांहून ४०० रुपयांवर पोचले आहेत. या भागात हातावर पोट असलेल्यांची रोजची अर्धी कमाई पाण्यावर खर्च होत आहे.

पर्यटकांसाठी ‘औरा औरंगाबाद’

$
0
0
राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात पर्यटकांना भारतीय संस्कृती व प्राचीन वारशाचे दर्शन घडवण्यासाठी ‘औरा औरंगाबाद’ नृत्यश्रृंखला उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. पर्यटनस्थळांना प्रकाशात आणतानाच पर्यटन भरभराटीसाठी या उपक्रमातून प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती महागामी संस्थेच्या संचालिका पार्वती दत्ता यांनी दिली.

आजपासून पुन्हा किलबिलाट!

$
0
0
दिवाळीच्या १८ दिवसांच्या सुट्ट्यांनंतर राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळा शुकव्रारपासून (७ नोव्हेंबर) सुरू होत आहेत. या सत्रातील शाळांसाठी ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम शिक्षण विभाग प्रथमच राबवित आहे.

तुकारामांचा चरित्रग्रंथ प्रकाशात

$
0
0
संत तुकाराम महाराजांवर लिहिलेला देशातील पहिला प्रमाण ग्रंथ तब्बल ११८ वर्षानंतर प्रकाशात येणार आहे. १८९६ मध्ये कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनी ‘तुकारामबावाचें चरित्र’ ग्रंथ लिहिला होता. दोन राज्यात प्रचंड शोध घेतल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांना ग्रंथ सापडला.

वाघाच्या कातडीचा अहवाल येणार

$
0
0
शहरात जप्त केलेल्या वाघाच्या कातडीचा न्यायवैद्यक चाचणी अहवाल शुक्रवारी (७ नोव्हेंबर) येणार आहे. या अहवालानंतरच कातडीचा उलगडा होईल. संबंधित कातडे वाघाचे असल्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

बेलगाम चालक; सुस्तावलेले पोलिस

$
0
0
वसंतराव नाईक कॉलेज ते जयभवानीनगर दरम्यान रिक्षाचालकांच्या बेशिस्त वागण्यामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. रात्रंदिवस वसंतराव नाईक चौक ते थेट जयभवानीनगरपर्यंत रिक्षा व अॅपेवर वाहतुकीवर पोलिसांचे कोणतेच नियंत्रण नाही.

फसविण्याचा डाव उधळला

$
0
0
म‌हाराष्ट्र एअरपोर्टमध्ये सिक्युरिटीच्या नोकरीचे अमिष दाखवून तीनशे बेरोजगार तरुणांना गंडवण्याचा डाव पोलिसांच्या दक्षतेने उधळला गेला. बाबा पेट्रोल पंप परिसरात गुरुवारी (६ नोव्हेंबर) सकाळी या बेरोजगारांना लेखी परीक्षेसाठी शुल्क घेऊन बोलाविण्यात आले होते.

रात्रंदिवस काम करा

$
0
0
क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन या रस्त्याचे काम लवकर पूर्ण झाले पाहिजे. त्यासाठी रात्रंदिवस काम करा. रस्त्याचे काम रात्रीही करायला काहीच हरकत नाही, असे आदेश महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले.

खैरेंनी दिली जानेवारीची डेडलाइन

$
0
0
क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांनी महापालिकेच्या प्रशासनाला आता १ जानेवारी 2०१५ची डेडलाइन दिली आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी यापूर्वी तीन वेळा डेडलाइन दिली होती.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images