Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गाशा गुंडाळण्याची ‘JTL’ला नोटीस

$
0
0
महावितरणने शहरातील जीटीएल कंपनीचा करार रद्द करण्याची अंतिम नोटीस दिली आहे. या कंपनीला १७ नोव्हेंबर रोजी महावितरणाकडे शहराचा कारभार हँडओव्हर करण्याचीही सूचना देण्यात आली आहे.

पुलाच्या तपासणीला खो

$
0
0
आपेगाव येथील गोदावरी नदीवरील खचलेल्या पुलाच्या वार्षिक पाहणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुरते दुर्लक्ष केले. वर्षातून दोनदा पुलाची पाहणी करणे बंधनकारक आहे, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियम गुंडाळून ठेवले. त्यामुळे पूल खचल्याची शक्यता आता उपस्थित होत आहे.

महसुली माहिती लवकरच क्लिकवर

$
0
0
खुलताबाद तालुक्याची महसूल विभागाशी संबंधित सर्व माहिती तालुक्यातील नागरिकांना आता घरबसल्या बघता येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ई- चावडी प्रकल्पासाठी प्रायोगिक तत्वावर तालुक्याची मॉडेलमधून निवड करण्यात आली आहे.

जीवावरचे संकट दुचाकीवर

$
0
0
एका एसटी बसने धडक दिल्यानंतर मोटारसायकल थेट बसच्या चाकाखाली गेला. पण बसच्या मागील चाकाखालून मोटारसायकलस्वार सहीसलामत बाहेर पडला. भद्रा मारुती भक्त निवासाजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या या अपघातात मोटारसायकलचे नुकसान झाले आहे.

३५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

$
0
0
दुष्काळी परिस्थितीने जिल्ह्यात आठवड्याला एक शेतकरी आत्महत्या करत असल्याचे चित्र आहे. जानेवारी ते सप्टेंबरमध्ये एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल ३५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे सरकार दप्तरातील आकडे सांगतात.

सुख, दुःख वाटून घेणारे एक कुटुंब!

$
0
0
वर्षभर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, हरिनाम सप्ताहाचे मोठे उत्साहात आयोजन केले जाते. विविध सांस्कृतिक स्पर्धा त्यानिमित्ताने घेतल्या जातात. सोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करणारी कॉलनी म्हणजे सिडकोतली साई पार्क.

शिक्षिकेच्या दोन साखळ्या पळविल्या

$
0
0
न्यू छत्रपतीनगर येथे मोटारसायकलस्वार मंगळसूत्र चोरांनी संधी साधत एका शिक्षकेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याची साखळी लंपास केली. मंगळवारी (११ नोव्हेंबर) दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही घडली.

वाघाच्या कातड्याचे गूढ कायम

$
0
0
शहरात जप्त केलेल्या वाघाच्या कातड्याचे गूढ आठवडाभरानंतरही कायम आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डीएनए लॅबमधील चाचणीत संबंधित कातडे कोणत्या प्राण्याचे आहे, याचा अजून उलगडा झालेला नाही.

डॉक्टर-तरुणाची घाटीत ‘फ्रीस्टाईल’

$
0
0
एक महिन्यांपासूनच्या भांडणाचा उद्रेक होऊन घाटी हॉस्पिटलमधील मनोविकृती विभागाचे सहाय्यक प्राध्यापक व महिला मनोरुग्णाच्या मुलामध्ये मंगळवारी (११ नोव्हेंबर) दुपारी बारा वाजता शिविगाळ व हाणामारी झाली.

संजय पवारांचा चार्ज काढला

$
0
0
महापालिकेच्या मंगळवारी (११ नोव्हेंबर) झालेल्या सर्वसाधारण सभेत लेखाधिकारी संजय पवार यांच्याकडे असलेला धनादेशांवर स्वाक्षरी करण्याचा चार्ज काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

जीटीएलचे प्रकाशगडाला साकडे

$
0
0
शहराचा वीज पुरवठ्याचा १५ वर्षांचा करार थकबाकीच्या कारणामुळे महावितरण कार्यालयाने रद्द करण्याची नोटीस दिली आहे. याबाबत वाटाघाटी करून हा निर्णय बदलण्यासाठी जीटीएल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी प्रकाशगडावर ठाण मांडून बसले आहेत.

‘विधी’वत रौप्य महोत्सवी स्वर्गसुख

$
0
0
आयुष्याच्या एका वळणावर दोघांची अचानक भेट झाली आणि योगायोग असा की पुढच्या नऊ वर्षांनी दोघेही एकाच शहरात आले. मग काय… कारवाँ बनता गया... मॉर्निंग वॉक असो की गप्पांची मैफल की असो साहित्य-संगीताची मैफल.

टेलिफिशिंगचे धोकादायक जाळे

$
0
0
बँकेच्या हेड ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगत डेबिट व क्रेडिट कार्डधारकांना फोन येत असल्याचे प्रकार शहरात घडत आहेत. कार्डधारकांकडून माहिती मिळवून ऑनलाइन गंडा या टेलिफिशिंग अॅटॅकरकडून घालण्यात येतो.

डागडुजी, संध्याकाळी पुन्हा खड्डे

$
0
0
कुठलाही निधी मिळालेला नसताना कंत्राटदाराला सांगून उधारीवर पैठण रस्त्याची मलमपट्टी करण्यात येत आहे. खड्डे बुजवताना डांबर किंवा हॉटमिक्सचा वापर करण्याऐवजी चक्क माती-मुरुमाचा वापर केला गेला.

मोदींचे उत्पन्न २५ हजार!

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी मजुरी करतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न २५ हजार रुपये आहे! वाचून आश्चर्य वाटेल, परंतु भोकरदन तहसील कार्यलयातून चक्क ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ यांच्या नावाचे उत्पनाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

धास्ती ‘समांतर’च्या पाण्याची

$
0
0
आतापर्यंत मूग गिळून गप्प बसलेले नगरसेवक महापालिका निवडणुकांचे वेध लागताच समांतर जलवाहिनी योजनेबद्दल बोलू लागले आहेत. प्रकल्पाबद्दल आपण ठोस भूमिका घेतली नाही तर, आपण सर्वजण पापाचे धनी ठरू, अशी भीती नगरसेवकांनी मंगळवारी (११ नोव्हेंबर) सर्वसाधारणसभेत व्यक्त केली.

बेधुंद थिरकणारी तरुणाई

$
0
0
डीजेचा दणदणाट, हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या संगीताचा दणदणाट, बेधुंद नाचण्यात मग्न तरुणाई आणि सोबतच बियर, वाइनचे रिचवलेले जाणारे ग्लास... हे दृष्य मुंबई, पुण्यातील पबचे नाही.

बागडेंचा प्रवास

$
0
0
प्रामाणिकपणा, शिस्त आणि विकासाचा ध्यास घेत कामांविषयी असलेली तळमळ याच जोरावर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे.

भाजपचे सरकार झाले ‘पवारालंबी’

$
0
0
देवेंद्र फडणवीस यांच्या अल्पमतातील सरकारने बुधवारी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला खरा, पण विधानसभेच्या आखाड्यात झालेल्या खेळामुळे सर्वसामान्य नागरिक कमालीचे चिडले आहेत.

पाणी टंचाईची दक्षता घ्या

$
0
0
बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी आगामी काळात सर्व शासकीय यंत्रणांनी काम करावे. बीड जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने जनतेला पाणीटंचाई भासणार नाही याची प्रशासनाने दक्षता घेण्याच्या सूचना बीडच्या नवनिर्वाचित खासदार प्रीतम मुंडे यांनी केल्या.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images