Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बँकांविरोधातील कारवाईस टाळाटाळ

$
0
0
पीककर्ज प्रकरणात उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी अवाजवी व्याजदराची आकारणी करून शिवाय विविध प्रकारची सर्व्हिस चार्जेस लावून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ३ कोटी ५३ लाख रुपयांची लूट केली.

बस अडकली चारीत

$
0
0
समोर अचानक कुत्रे आल्याने थांबलेल्या स्वीफ्ट कारला वाचविण्यात प्रयत्नात औरंगाबाद- जळगाव बस रस्त्यावरून घसरून एका चारीत अडकली. बुधवारी (१२ नोव्हेंबर) झालेल्या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, पण चारी नसती तर, बसमधील ७० प्रवाशांपैकी बरेच प्रवासी जखमी झाले असते.

स्वच्छता अभियान आता शाळेतही

$
0
0
स्वच्छता अभियानानंतर आता शाळांमध्ये ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ संकल्पना राबविली जाणार आहे. बालदिनापासून याची अंमलबजावणी होणार आहे. यात ‘बाल स्वच्छता मोहीम’ सप्ताह राबविण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत.

पाणी वाटपास हायकोर्टात आव्हान

$
0
0
महाराष्ट्र जलनियमन प्राधिकरणाच्या पाणी सोडण्याच्या निकालास मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी आमदार प्रशांत बंब यांच्यासह महाराष्ट्र जलनियमन प्राधिकरण, गोदावरी खोरे विकास महामंडळ व इतर अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.

त्यांनी पाहिला ‘रिअल हिरो’

$
0
0
प्रोझोनध्ये सिनेमा पाहताना मॉलमधील दिव्यांच्या झगमटापेक्षाही त्यांचे निरागस चेहरे आनंदाने उजळले. चार अनाथाश्रमातील अनाथांनी ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो’ हा सिनेमा पाहिला. अन् त्यांचा ऊर भरून आला.

शक्कल लढविणारा कारचोर

$
0
0
गॅरेजमध्ये दुरस्तीसाठी आलेल्या चारचाकी वाहनांच्या चावीचा छापा घेऊन बनावट चावीच्या साह्याने कारचोरी करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. तोतया पोलिस बनून वावरणाऱ्या या चोराकडून पोलिसांनी दोन कार जप्त केल्या आहे.

पुढचे पाठ मागचे सपाट

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता अभियानाची लागण जिल्हा परिषदेलाही झाली आहे. गुरुवारपासून जिल्हा परिषदेत स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

नानांच्या निवडीनंतर जल्लोष

$
0
0
विधानसभेच्या सभापतीपदी हरिभाऊ बागडे उर्फ नानांची निवड झाल्याचे समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलमंडीवर फटाकेफोडत आणि मिठाई वाटप करत एकच जल्लोष केला.

दुकाने न देताच कराची नोटीस

$
0
0
महापालिकेच्या हर्षनगर येथील व्यापारी संकुलातील दुकाने संबंधितास ताब्यात न देताच, त्याच्या नावाने मालमत्ता कराची नोटीस बजवण्याचा अजब कारभार मालमत्ता कर आकारणी विभागाने केला आहे.

...गाडी बुला रही है!

$
0
0
बारा डब्यांची औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर रेल्वे स्टेशनवर उभी. रेल्वेत प्रवासी बसलेले. गाडी निघणार कधी, याची त्यांना प्रतीक्षा. औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या इंजिन चालकाच्या कक्षामध्ये बी. के. सांळुंखे आपल्या वेळेवर येतात.

अपघातात शहरातील चौघे मृत्युमुखी

$
0
0
कर्नाटकातील हुमनाबाद शहराजवळ अँम्बुलन्स व टँकरच्या अपघातात औरंगाबाद शहरातील चौघांचा मृत्यू झाला व दोघे जखमी झाले. बुधवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी साडेसहा वाजता घडला.

सोमवारपासून शहरात महावितरण

$
0
0
जीटीएल कंपनीकडून शहराचा वीज पुरवठ्याचे हस्तांतर करण्यासाठी महावितरणाने तयारी पूर्ण केली आहे. यासाठी सुमारे साडेचारशे कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पोलिसाचे घर फोडून ५० हजारांचे दागिने लंपास

$
0
0
चोरट्यांनी चक्क पोलिसाचे घर फोडून ५० हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना सुखशांतीनगरमध्ये घडली आहे. येथे संतोष खार्डे हे राज्य राखीव पोलिस दलात काम करतात.

लेखाधिकारी प्रकरणात मांडवलीचा प्रयत्न!

$
0
0
महापालिकेचे लेखाधिकारी संजय पवार यांच्या प्रकरणात मांडवलीचा प्रकार गुरुवारी (१३ नोव्हेंबर) पुन्हा एकदा महापालिकेत घडला, पण काही नगरसेवकांनीच तो प्रकार हाणून पाडला.

सिंचनातील दोषींवर कारवाई

$
0
0
‘सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. यात कोणीही दोषी आढळला, तर त्यांच्यावर कडक कारवाई होईल. विकासाच्या आड येणाऱ्यामध्ये जर भाजपापैकी कुणी असेल तर, त्यांच्या विरोधात कारवाई होईलच,’ असा इशारा जलसंधारण व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिला.

वाहनधारक दुसऱ्या वर्षी गायब

$
0
0
वाहन खरेदी करताना बंधनकारक असल्याने पहिल्या वर्षी वाहनांचा विमा काढला जातो. दुसऱ्या वर्षी मात्र वाहनधारक इन्शुरन्स कंपन्यांकडे फिरकतही नाहीत. त्यामुळे विम्याचा कालावधी वाढविल्याशिवाय वाहनांच्या इन्शुरन्सचे नुतनीकरण करण्याचे प्रमाण वाढणार नाही, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

आगीत कापड दुकान खाक

$
0
0
शहरातील शिवाजी चौकातील रविराज कलेक्शन हे कापड दुकान गुरुवारी (१३ नोव्हेंबर) पहाटे लागलेल्या आगीत पूर्ण खाक झाले आहे. या आगीत सुमारे पन्नास ते साठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या आगीमुळे दुकानात कांहीच शिल्लक राहिले नाही.

प्रसिद्ध साहित्यिक डॉ. मिन्नेंना अटक

$
0
0
प्रसिद्ध साहित्यिक डॉ. इकबाल मिन्ने यांना गुरुवारी (१३ नोव्हेंबर) पोलिसांनी अटक केली. कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या संशयित सिमकार्डच्या लिस्टमध्ये असलेले एक सिमकार्ड, डॉ. इकबाल मिन्ने वापरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हुरडा विकणारे कोट्यधीश गाव

$
0
0
शेतमालाचे मार्केटिंग शेतकऱ्यांनीच केल्यास ‘अर्थक्रांती’ घडते याचा प्रत्यय नरसापूरच्या शेतकऱ्यांनी दिला आहे. ज्वारीचे पारंपरिक उत्पादन टाळून गूळभेंडी हुरडा विक्री केल्यामुळे अख्ख्या गावाचा कायापालट झाला आहे.

पालिकेच्या पाण्यात अळ्या, साप

$
0
0
गढूळ पाण्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तिसऱ्या दिवशी पाणी येते आणि तेही गढूळ त्यामुळे पिण्याचे पाणी कसे आणि कुठून भरायचे, असा प्रश्न नागरिकांच्या समोर निर्माण झाला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images