Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

१८ तोळे सोने,८ कि. चांदीची चोरी

$
0
0
नवीन जालना परिसरात आर. पी. रोडवर घरफोडीत चोरट्यांनी १८ तोळे सोने, ८ किलो सोने आणि ३० हजार रुपये लंपास केले. बाहेरगावी गेलेले पाटणी कुटुंबीय रविवारी रात्री उशिरा घरी परतल्यानंतर ही चोरी उघड झाली.

वीजपुरवठ्याचे खासगीकरण

$
0
0
वाढत्या वीज गळतीवर तोडगा काढण्यासाठी राज्यातील १४ शहरांमध्ये वीजपुरवठ्याचे खासगीकरण करण्याचा घाट महावितरणने घातला आहे. वीजपुरवठ्याच्या खासगीकरणाचा प्रस्ताव लवकरच महावितरणकडून सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.

वेरूळचा होणार कायापालट

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार आदर्श गाव योजनेतील कामांचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाने मंगळवारी (१८ नोव्हेंबर) वेरूळ येथे पाहणी करून बैठक घेतली. आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र असल्यामुळे वेरूळमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

पैठणची हद्द वाढणार

$
0
0
पैठण नगर पालिकेची हद्दवाढ करण्यात यावी, असा ठराव पालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला, मात्र हद्दवाढ किती करायची याचा उल्लेख ठरावात नाही. मंजूर झालेला ठाराव राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल, असे सांगण्यात आले.

...हा ‘काळ’ गंभीर!

$
0
0
पावसाचे वेळापत्रक बदल्यामुळे पीक उत्पादनावर परिणाम झाला. आता पावसावर आधारित पेरणी कालावधी ठरवल्यास उत्पादनात घट येणार नाही. जिल्ह्यात पिकांची स्थिती गंभीर आहे, पण एप्रिलपर्यंत चाऱ्याची अडचण जाणवणार नाही असे मत, औरंगाबाद जिल्ह्याचे पालक सचिव संजयकुमार यांनी व्यक्त केले.

पर्यटन हंगाम बहरेना

$
0
0
ऐन पर्यटन हंगामात शहरातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी ओसरली आहे. दररोज आठ हजार पर्यटक भेट देत असलेल्या बिबी का मकबऱ्याला सध्या जेमतेम चार हजार पर्यटक भेट देतात.

‘तो’ शाळकरी मुलगा विमानाने परतला

$
0
0
क्रांती चौक पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला एक चौदा वर्षाचा मुलगा मंगळवारी (१८ नोव्हेंबर) सायंकाळच्या विमानाने मुंबईहून सुखरूप परत आला.

संघर्षाची वेळ का यावी?

$
0
0
महापालिकेच्या निवडणुकीला आता उणेपुरे चार - साडेचार महिने उरले आहेत. नगरसेवकांना या कालावधीपैकी काम करण्यासाठी फक्त अडीच महिने मिळू शकतात. त्यामुळे आपल्या वॉर्डात झपाट्याने कामे झाली पाहिजेत, यासाठी प्रत्येक नगरसेवक प्रयत्नशील आहे.

ब्रोकरने उडवली रक्कम

$
0
0
डी मॅट अकाडंट उघडण्यासाठी दिलेल्या कागदपत्राचा गैरवापर करून एका शेअर ब्रोकरने शेअर होल्डरचे तब्बल साडेसतरा लाख रुपये लंपास केले आहेत. शेअर होल्डरची फसवणूक करणाऱ्या ब्रोकरला मेहकर येथून अटक करण्यात आली असून, याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘पोटातल्या बाळाची काळजी घ्या हो!’

$
0
0
‘आमच्या पोटातल्या बाळाची तरी काळजी घ्या हो. रस्ते गुळगुळीत होतील तेव्हा होतील, अगोदर रस्त्यांवरचे खड्डे बुजवा, खड्ड्यांमुळे गर्भपात होण्याचे प्रमाण वाढले आहे. याची तरी दखल घ्या आणि रस्त्यावरील खड्डे बुजवा,’ असे म्हणत नगरसेविकांनी शहरातील महिलांच्या व्यथा पोटतिडकीने स्थायीच्या बैठकीत मांडल्या.

मराठवाड्याला हक्काचे पाणी द्या!

$
0
0
‘मराठवाड्याला हक्काचे पाणी द्या. जनतेची ही मागणी नियमानुसार आणि कायद्याच्या आधारेच आहे. दुष्काळ निवारणासाठी परिणामकारक योजना आखा,’ असा सल्ला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी राज्य सरकारला दिला.

मैत्रीचा देशमुखी थाट

$
0
0
मैत्री कधी, कशी आणि कुणाशी होईल, हे सांगता येत नाही. अनेक वर्षे सहवासात राहूनही एखाद्याशी मैत्री होईलच असे नाही, पण एकदा जडलेली मैत्री आयुष्यभराची सोबत करते.

अर्थ ‘संकल्प’ भरकटला

$
0
0
महापालिकेचा अर्थसंकल्प ७९२ कोटी रुपयांचा असताना आठ महिन्यांत फक्त १९५ कोटी रुपयांपर्यंत प्रशासनाने मजल मारली. आर्थिक वर्ष संपण्यासाठी चार महिने शिल्लक असताना ७९२ कोटींचा अर्थसंकल्प कसा साध्य होणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

मुलीला पळविणाऱ्या डॉक्टरला अटक

$
0
0
एक महिन्यापूर्वी तालुक्यातील आडगाव जावळे येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या डॉ. संतोष बाबासाहेब घुंगरे याला पाचोड पोलिसांनी मुंबई येथील नालासोपारा येथून अटक केली आहे. पाचोड पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेतले आहे.

वळणांवर जिवाचा धोका

$
0
0
औरंगाबाद ते सिल्लोड रस्त्यावर फुलंब्री तालुक्यात सात वळणे अत्यंत धोकादायक आहेत. या वळणांवरच सतत अपघात होत असून, रस्ता चौपदरीकरणाची वाट न पाहता येथे रस्त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. विशेषतः वळणांच्या ठिकाणी दुचाकीचालकांची मोठी फजिती होत आहे.

यंग सिनिअर्सचे ‘ग्रँड वेलकम’

$
0
0
स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे यंग सिनिअर्सचे सध्या ‘ग्रँड वेलकम’ करण्यात येत आहे. हयात प्रमाणपत्र देण्यासाठी बँकेत खास सोय करण्यात आली आहे.

महिला बचतगटांनी मिळवून दिली ओळख

$
0
0
ठिकठिकाणी साचलेला कचरा, उखडलेले रस्ते, कॉलनीतील बागेची दुरवस्था, त्यात दारुंड्याचा अड्डा यामुळे जालाननगरमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे सुस्त नगरसेवक या समस्या सोडविण्यासाठी कोणतेच प्रयत्न करत नाहीत, असा आरोप होतो आहे.

‘आई नाही, वडील जेलात, आमचे काय?’

$
0
0
मातेची हत्या झालेली, वडील पोलिसांच्या ताब्यात, त्यांची दोन्ही लहाेन मुले उघड्यावर पडली. त्यांना चुलता व चुलतीने दोन दिवस सांभाळले, मात्र त्यांनी बुधवारी दुपारी क्रांती चौक पोलिस ठाण्यात येऊन मुलांना सांभाळण्यासाठी असमर्थता व्यक्त केली. अखेर पोलिसांनी त्यांना ‘साकार’ या सामाजिक संस्थेत दाखल केले आहे.

पाच हजारांची चांदीची पत्रिका

$
0
0
लेक लहानाची मोठी कधी होते, हे बाबाला कळत नाही. तिचे लग्न म्हणजे त्याला काय करू, काय नको असे होते. राजेशाही थाटबाट, पाहुण्यांची खासमखास व्यवस्था, यासाठी त्याचे झटणे सुरू असते.

चांगल्या उपक्रमाला चुना

$
0
0
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी गेल्या आठवड्यात स्वच्छता अभियान राबविण्याचे जाहीर केले. आठवडाभर झेडपीचा परिसर अंर्तबाह्य स्वच्छ करण्याचे आवाहन केले गेले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images