Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दिरंगाईचा झब्बू पालिकेला

0
0
रस्त्यांच्या व्हाइट टॉपिंगच्या कामांची मुदत संपलेली असतानाही, ही कामे अद्याप अपूर्ण आहेत. यातल्या १४ पैकी चार रस्त्यांचीच कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे कंत्राटदाराकडून ही कामे करून घेण्यासाठी महापालिकेला आता जादा पैसे मोजावे लागतील (एक्सलेशन प्राइज) अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वसुली घटली; अनुदान गोठले

0
0
वसुली घसरल्यामुळे महापालिकेला आता शासकीय अनुदान विसरावे लागणार आहे. शासकीय अनुदान आणि मालमत्ता कर वसुलीच्या भरवशावर महापालिकेने ७९२ कोटींचा अर्थसंकल्प तयार केला, पण मालमत्ता कराच्या वसुलीकडे दुर्लक्ष करून केवळ शासकीय अनुदानावर डोळा ठेवून असलेल्या महापालिकेला आता शासनाच्या निकषाप्रमाणे वसुली न झाल्याचा मोठा फटका बसणार आहे.

‘ईबीसी’ सवलतीचे ‘तंत्र’ बिघडले

0
0
लोकसभा, विधानसभेच्या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी झाली खरी, मात्र तंत्रशिक्षण व वित्त विभाग यांच्यातील असमन्वयाचा फटका राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे.

आठ नवी आरोग्य केंद्रे

0
0
महापालिकेंतर्गत शहराच्या विविध भागात आठ आरोग्य केंद्रे आणि चिकलठाणा, नेहरूनगर येथे ५० खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्यास केंद्र सरकारने सोमवारी (१७ नोव्हेंबर) मंजुरी दिली.

सॉ मिलसाठी बेबंद वृक्षतोड

0
0
आरा गिरण्यांसाठी (सॉ मिल्स) नियंत्रित वृक्षतोड व्हावी म्हणून वन संरक्षण कायदे आहेत; मात्र वन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरात दररोज शेकडो टन अवैध लाकूड वाहतूक सुरू असून, या प्रकारात मोठे आर्थिक गौडबंगाल दडले आहे.

घृष्णेश्वराचा वेढा तोडा

0
0
धार्मिक स्थळ व गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी कारवाया लक्षात घेऊन वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिराचा परिसर एका आठवड्यात अतिक्रमण मुक्त करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी न झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

0
0
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी वैजापूर तालुक्यातील सुरेश जनार्धन गोरे याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, लग्नास नकार दिल्याने या तरुणीने अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

अनुदानित सिलिंडरमुळे आर्थिक आरिष्ट

0
0
गरीब असो वा श्रीमंत. साऱ्यांना वर्षाकाठी बारा अनुदानित गॅस सिलिंडर मिळतात. याचा फटका सामाजिक संघटनांना बसतो आहे. गरजू, निराधार बालकांना मायेचा आधार देणाऱ्या संस्थाना, महिनाकाठी जवळपास दहा गॅस सिलिंडर लागतात. त्यामुळे वर्षाचे बजेट आवाक्याबाहेर जाते आहे.

कँट‌िनचे रूप पालटले

0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात, आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव होत आहे. त्यासाठी विद्यापीठ जोरदार तयारी करत असून, विद्यापीठातील कँट‌िनमध्ये चार वर्षानंतर पंखे बसविण्यात येत आहेत.

लोक जपतील पर्यावरणाचा वारसा

0
0
पर्यावरण चळवळीला चालना देणारा पाचवा ‘किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिव्हल’ शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) शहरात सुरू झाला आहे. लघुपट प्रदर्शन, व्याख्यान आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमातून पर्यावरणीय चळवळ व्यापक करण्याचा हा प्रयत्न आहे. यानिमित्त फेस्टिव्हचे प्रमुख संयोजक सुहास वैद्य यांच्याशी केलेली बातचीत.

काबाडाचा धनी, वाहे ५३३ कोटींच्या कर्जाची गोणी

0
0
कुणी त्याला राजा म्हणतो, कुणी त्याला पोशिंदा. बेभरोशाचा पाऊस, भेगाळलेली भुई यामुळे त्याच्या घरातली दावण रिकामी होतेय. घरातली पोरेसोरे, कर्ती पुरूष हात पाय गाळून बसलेत.

वाटचाल नव्या वळणाची

0
0
साहित्य चळवळीत भरीव योगदान देणारी मराठवाडा साहित्य परिषद निबंधवाचन हा नवा उपक्रम घेऊन आली आहे. दर्जेदार, पण वाचकांपासून दुर्लक्षित राहिलेल्या कलाकृतीवर साधकबाधक चर्चा घडवून आणणारा हा उपक्रम खास तरुणांसाठी आहे.

समतोल विकासासाठी आयआयएम हवेच!

0
0
समतोल विकासासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) औरंगाबादलाच उभारावे, अशी मागणी राजकारणी आणि उद्योजकांतून होत आहे. याप्रकरणी उद्योजक मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.

फिर्यादीच निघाला सहआरोपी!

0
0
पैशाचा पाऊस पाडणाऱ्या भोंदूबाबाविरुद्ध तक्रार दाखल करणारा फिर्यादीच त्याचा साथीदार असल्याचे तपासात समोर आले आहे. भोंदूबाबाचे पितळ उघडे पडल्यानंतर स्वतःवरचे बालंट टाळण्यासाठी त्याने हा प्रकार केला होता. त्यासाठी त्याने जवळच्या नातेवाईकाची साडेचार लाखांची फसवणूक केली आहे.

ताई माझी गुरू

0
0
जुळ्यांचे सारे काही सारखे असते, असे ढोबळमानाने मानले जाते. तसा आपल्याला अनुभवही येतो, पण व्यंकटेश व दक्षा पाटील यांच्या जुळ्या मुली अनन्या आणि लावण्या मात्र याला अपवाद आहेत. एक हट्टी तर दुसरी समजूतदार. एक शांत तर दुसरी चंचल. अशा या जुळ्यांविषयी...

रेल्वेचा डबा कसा पेटला?

0
0
नांदेड मनमाड पॅसेंजरच्या एका डब्याला कशामुळे लागली, याचे कारण शोधून काढण्यात रेल्वेला अद्यापपर्यंत यश आलेले नाही. औरंगाबादच्या न्यायवैद्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालावर नांदेड रेल्वे विभाग असमाधानी आहे.

खिसे भरण्यासाठी जिल्हा उजाड

0
0
शहरात आरा गिरण्यांचे (सॉ मिल) लाकूड वन विभागाच्या निगराणाखाली आणण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी गिरणीमालकांनी दिला होता. या माध्यमातून शासकीय महसुलात वाढ झाली असती; मात्र आर्थिक हितसंबंधामुळे वन अधिकाऱ्यांनी प्रस्तावाला केराची टोपली दाखवली.

श‌िवसेनेची स्वबळाची तयारी

0
0
पक्षप्रमुखांनी सांगितले तर महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवू, असे शिवसेनेचे औरंगाबाद महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सूचित केले.

आयुक्तांचा बंगल्यातून कारभार!

0
0
महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांचा रुबाब मुख्यमंत्र्यांसारखाच असल्याची प्रचिती नागरिकांना शुक्रवारी आली. कार्यालयात वाट पाहूनही आयुक्त आले नाहीत. त्यामुळे नागरिक त्यांच्या बंगल्यावर गेले, पण बंगल्याच्या प्रवेशद्वारावर तैनात करून ठेवलेल्या सशस्त्र पोलिसांनी त्यांना रोखले

टोपेंच्या घरी भाजपचा पाहुणचार

0
0
स्थीर सरकारसाठी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने निर्माण केलेल मैत्रीचे नाते आता नेत्यांपर्यंत येऊन पोचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जालना जिल्ह्यातील नेते आणि माजीमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारमधील महत्त्वाचे मंत्री एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी पाहुणचार घेतला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images