Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

साईबाबा, तिरुपती बालाजीपेक्षा राज ठाकरे दुर्मिळ

$
0
0
‘साहेब, शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनाला चार तास, तिरुपती बालाजीला बारा तास लागतात, पण तुमच्या दर्शनासाठी तब्बल आठ वर्षे वाट पाहावी लागली,’ असं गाऱ्हाणं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट राज यांच्याकडं मांडलं. यामुळे अवाक् झालेल्या ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ई-मेल आयडी देऊन संपर्क करण्यास सांगितलं.

४०२ संसारांवर दुष्काळाचा नांगर

$
0
0
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या घरादारात दुष्काळी परिस्थितीमुळे अवकळा आली आहे. पांढरे फटक पडलेले चेहरे, तुराट्याच्या काड्यागत पाय आणि काळजात नापिकी, कर्जाच्या धस्कटाची सल टोचते आहे. या घालमेलीतून अवसानघात झालेल्या तब्बल ४०२ शेतकऱ्यांनी, अकरा महिन्यात आत्महत्या केल्या आहेत.

शेततळ्यांचे १,३३० प्रस्ताव पडून

$
0
0
मराठवाड्यात पुन्हा एकदा दुष्काळाने झोडपणे सुरू केले आहे. सोबत लालफितीच्या कचाट्यातही इथला शेतकरी अडकलेला दिसतो. त्याचे जळजळीत उदाहरण म्हणजे, शासन दरबारी तब्बल १३३० शेततळ्यांचे प्रस्ताव पडून आहेत. आता बोला मग सिंचन होणार कसे? आणि शेतकरी या फरफटीतून बाहेर निघणार कसा?

मनपा कर्जासाठी १३ जागा गहाण ठेवणार?

$
0
0
समांतर जलवाहिनी आणि वीज बिलासाठी काढण्यात आलेल्या २०० कोटींच्या कर्जासाठी नव्याने १३ जागा गहाण ठेवण्याची तयारी महापालिकेने केली आहे. या जागांमध्ये अग्निशामक दलाच्या कार्यालयाच्या जागेसह औरंगपुरा येथील नाथ सुपर मार्केटच्या जागेचाही समावेश आहे.

दुष्काळी कामांचे नियोजन व्हावे! - थोरात

$
0
0
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांपासून बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असते. मराठवाड्यात यावर्षी २०१२पेक्षाही भयानक स्थिती यंदा आहे. सरकारने दुष्काळी उपायोजना राबविताना प्रथमोपचार करण्याच्या पुढे जाऊन नियोजन केले पाहिजे, असे मत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘मटा’शी बोलताना केले.

कष्टाने फुलतो मळा

$
0
0
पोटच्या मुलाप्रमाणे पिकाला जपणारे शेतकरीच यशस्वी शेती करतात. पेरणीनंतर थेट काढणीलाच जाणारे शेतकरी कष्ट टाळतात; मात्र यशस्वी होऊ शकत नाही. फळबाग लागवडीत नवा विक्रम करणारे दुधडचे नारायण चौधरी कष्टाळू शेतकऱ्यांसाठी आदर्श आहेत.

औरंगाबादची उपेक्षा!

$
0
0
मराठवाड्यात दुष्काळाने ठाण मांडले आहे. अकरा महिन्यांत ४०२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. पाण्याचे दुर्भिक्ष, खेड्यापासून औरंगाबादचे रस्तेही खड्ड्यांनी भरून गेलेत. पर्यटनवृद्धीचे प्रस्ताव धूळ खात पडले आहेत.

विकासाचा वेग वाढवा!

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्याचा वारसा ऐतिहासिक संपन्न आहे, पण वर्तमान अत्यंत वाईट आहे. राज्य सरकारकडून वेळोवेळी जिल्ह्यात प्रकल्पांची घोषणा झाली. परंतु ते तातडीने पूर्ण करावेत, अशी तत्परता दाखविली गेली नाही. सरकारची उदासीनता, लालफितशाहीचा कारभार, निधीची कमतरता आदींमुळे महत्त्वाचे अनेक प्रकल्प रखडले आहेत.

मनपावर सरकारची वक्रदृष्टी

$
0
0
महापालिकेवर राज्य सरकारची वक्रदृष्टी झाली आहे. रस्ते विकासासह विविध कामांसाठी वारंवार मागणी करूनही शासनाने आठ वर्षांत फक्त २५ लाखांची महापालिकेला मदत केली. महापालिकेकडे पाहण्याच्या शासनाच्या अशा दृष्टिकोनामुळे रस्त्यांसह अनेक प्रकल्प रखडले आहेत.

मराठवाड्यावर आघात

$
0
0
सलग दोन वर्षांपासून अवर्षणाला तोंड देणाऱ्या मराठवाड्यावर यंदा १९७२च्या दुष्काळापेक्षाही मोठा आघात झाला आहे. लाखो हेक्टरवरील खुरटलेले खरीप, हिवाळ्याच्या तोंडावरच कोरड्या पडू लागलेल्या विहिरी आणि धरणांमधील पाणीपातळीत वेगाने होणारी घट यामुळे मराठवाडा ओसाड माळरानासारखा भासू लागला आहे.

पावसाने कांदा उत्पादक हैराण

$
0
0
एकरी सुमारे ३० ते ४० हजार रुपये खर्चून कांद्याचे पीक जोपासले. परंतु, कांदा काढणीचा हंगाम सुरू होण्याच्या वेळी निसर्गाची अवकृपा झाली अन् अवकाळी पावसाने कांद्याचे पीक होत्याचे नव्हते झाले.

शेतकऱ्यांचे लक्ष पीक विम्यावर

$
0
0
बीड जिल्ह्यावर यंदा पुन्हा एकदा पावसाने अवकृपा दाखवली आहे. त्यामुळे खरीप पिकाची उत्पादकता मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे पुढे आले आहे. दुसऱ्या नजर अंदाजानुसार आणि पीक कापणी प्रयोगात खरीपाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे.

चेसीसअभावी नव्या बसला ‘ब्रेक

$
0
0
ऑक्टोबर महिन्यात नवीन एसटी बस बांधणीसाठी सुरू करण्यात आलेला चेसीसचा पुरवठा नोव्हेंबरमध्ये बंद झाला आहे. त्यामुळे एसटी कार्यशाळेत नवीन बसची बांधणी थांबली आहे. परिणामी प्रवाशांवर मोडक्या बसगाड्यातून प्रवास करावा लागणार आहे.

‘शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा’

$
0
0
समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी जायकवाडी पाणी नियोजन व हक्क संघर्ष समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. तर शेती कर्ज व वीज बिल पूर्ण माफ करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली.

‘एमजीएम’चा पेट्रोलपंप रद्दबातल

$
0
0
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने एमजीएम व्यवस्थापनाकडून सेंट्रल नाक्याजवळील पेट्रोल पंप काढून घेऊन तो दुसरीकडे स्थलांतरित करावा, असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. ए. एम . बदर यांनी दिले आहेत.

‘आयआयएम’बाबत CMचे मौन

$
0
0
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसाठी (आयआयएम) औरंगाबादला पोषक वातावरण आहे. योग्य वातावरण आणि मराठवाड्याचा अनुशेष लक्षात घेता आयआयएम औरंगाबादलाच व्हावे, अशी मागणी करत, उद्योजकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

संस्थांचे CMसमोर प्रेझेंटेशन

$
0
0
२०१२च्या दुष्काळात मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये स्वयंसेवी संस्थांनी अनेक उपक्रम राबविले. जलसंवर्धनाचे प्रभावी काम केल्यामुळे अनेक गावांत यंदा पाणीटंचाई नाही. गाव दत्तक घेऊन त्याचा कायापालट केला.

सरकारचे ‘उल्लू बनाविंग’

$
0
0
मराठवाड्यात दुष्काळ असताना सरकारला मात्र त्याचे अजिबात गांभीर्य नाही. दुष्काळ निवारणासाठी येथून पुढे केंद्राकडे मदतीची मागणी केली जाणार आहे. थातुरमातुर उपाययोजना करून परिस्थिती बदलणार नाही.

गूढ आवाजाने गावे हादरली

$
0
0
पैठण तालुक्याच्या पूर्व भागातील १५ गावे गुरुवारी दुपारी आलेल्या गूढ स्फोटाच्या आवाजामुळे हादरली. पाचोड, विहामांडवा गटांतील गावांत हा आवाज आला. त्यामुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.

राज ठाकरेंचे गुफ्तगू

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी (२७ नोव्हेंबर) सुमारे २५ मिनिटे भय्यूजी महाराजांसोबत बंद दाराआड चर्चा केली. जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेली ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images