Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सहा महिन्यांत रस्ता उखडला

$
0
0
शेवगाव रस्ता उजव्या कालव्याजवळ पूर्ण उखडला आहे, रस्त्याचे उर्वरित काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे मुश्किल झाले आहे. हा रस्ता ४८ लाख रुपये खर्च करून सहा महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला आहे.

सतरा वर्षांपासून मानधनाची प्रतीक्षा

$
0
0
पैठण येथील बाळासाहेब पाटील शासकीय पुराणवस्तू संग्रहालयाच्या उभारणीत सहकार्य केल्याबद्दल युती शासनाने दोघांना मानधन देण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु सतरा वर्षांनंतरही मानधन मिळालेले नाही.

हर्मन फार्मात आग

$
0
0
चिकलठाणा एमआयडीसी भागातील हर्मन फार्मास्यूटिकल्स या कंपनीच्या स्टोअर रुमला आग लागल्याची घटना रविवारी (३० नोव्हेंबर) सायंकाळी सात वाजता घडली. लागोपाठ झालेल्या पाच स्फोटामुळे परिसर हादरून गेला.

धान्य बाजाराला दुष्काळाचा फटका

$
0
0
दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनाही असू लागल्या आहेत. याचे चित्र रविवार बाजारात भरत असलेल्या धान्य बाजारात पहायला मिळाले. गेल्या तीन महिन्यांपासून या बाजारामध्ये ग्राहकी कमी झाली असून धान्य बाजारातील व्यापाऱ्यांचा निम्मा माल पडून आहे.

RTOचा रिव्हर्स गिअर

$
0
0
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात परिवहन विभागाचे आरटीओ कार्यालयाचे चक्र मात्र उलटे फिरू लागले आहे. गाडीच्या मालकी हक्काची स्मार्ट कार्डाच्या स्वरुपात मिळणारी कागदपत्रे (आरसी बुक) उद्यापासून (सोमवार) पुन्हा पूर्वीप्रमाणे पुस्तिकेच्या स्वरुपात देण्याची शक्यता आहे.

सात मुख्याध्यापकांवर कुऱ्हाड

$
0
0
शालेय पोषण आहार तपासणी पथकाच्या तीन दिवसांच्या आढावा दौऱ्यात कामात कुचराई करणाऱ्या तीन तालुक्यांतील सात मुख्याध्यापकांवर निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून सोमवारी (१ डिसेंबर) यासंदर्भात कारवाई करण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमध्ये चव्हाण वि. चव्हाण

$
0
0
दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने रविवारी शहरात विभागीय बैठक घेतली; मात्र या बैठकीत राजकीय कलगीतुरा रंगला.

‘मुंबई-दिल्ली-मुंबई’!

$
0
0
हिंदीमध्ये चांगल्या निर्मात्यासोबत काम करायला मिळावं ही प्रत्येक मराठी दिग्दर्शकाची इच्छा असते. अशीच इच्छा प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक सतीश राजवाडेनं बाळगली आणि ती ‘मुंबई-दिल्ली-मुंबई’ या सिनेमाच्या निमित्तानं पूर्णही झाली.

औरंगाबादचा बोलवाला

$
0
0
पुण्यामध्ये झालेल्या रंगसंगीत गद्य आणि पद्य एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये औरंगाबादच्या तीन एकांकिकांनी जोरदार कामगिरी केली. पद्य एकांकिका स्पर्धेत ‘संगीत जागरण’ एकांकिकेने द्वितीय पुरस्कार पटकावला तर स.भु. नाट्यशास्त्रच्या संगीत वात्सल्य एकांकिकेने तृतीय क्रमांक मिळविला.

‘पेइंग गेस्ट’ अंतिम फेरीत

$
0
0
५४ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या औरंगाबाद केंद्रावरील प्राथमिक फेरीमध्ये ‘पेइंग गेस्ट’ हे नाटक प्रथम आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्य विभागाने हे नाटक सादर केले होते.

ऊस शेतक-यांना फटका

$
0
0
साखरेचे भाव २५०० रुपये क्विंटलपर्यंत खाली घसरले आहेत. त्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसणार आहे. वसंत सहकारी साखर कारखान्याने उस उत्पादकांना पहिली उचल म्हणून १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती हदगाव येथील वसंत साखर कारखान्याचे चेअरमन प्रकाश पाटील-देवसरकर यांनी दिली आहे.

मेजर सासणे यांचा विश्वविक्रम

$
0
0
उस्मानाबाद जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे (निवृत्त) यांनी सोमवारी आंतरराष्ट्रीय दर्जांच्या निरीक्षकांच्या देखरेखेखाली स्टेपअप्स आणि पु्शअप्समधील चार क्रीडा प्रकारात विश्वविक्रमाला गवसणी घातली. या कार्यक्रमाचे चित्रीकरण पाहिल्यानंतर गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉडर्सकडून यासंदर्भातील घोषणा केली जाणार आहे.

उरुसावर पाणीटंचाईचे सावट

$
0
0
हजरत ख्वाजा मुन्तजबोद्दिन उर्फ जर जरी जर बक्ष यांच्या डिसेंबरअखेरीस होणाऱ्या उरुसाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. यावर्षी उरुसावर पाणीटंचाईचे सावट असून प्रशासनाला २० लाख लिटर पाण्याची गरज आहे.

४० लाखांसह एजंटचा पोबारा

$
0
0
कुवेतमध्ये नोकरी मिळवून देण्याचे अमिष दाखवून ४० तरुणांची सुमारे ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. वाळूज एमआयडीसी भागात उघडलेल्या एका कंसल्टन्सी चालकाने त्यांची फसवणूक करून पलायन केले आहे. दरम्यान फसवणूक झालेल्या तरूणांनी वाळूज एमआयडीसी पोलिसात धाव घेतली आहे.

फळबागांसाठी इस्त्रायली तंत्रज्ञान

$
0
0
अतिघन लागवड आणि फळप्रक्रिया उद्योगांद्वारे इस्त्रायलने शेतीत लक्षणीय प्रगती केली. फळबाग लागवडीत नवे तंत्रज्ञान वापरल्यास भारतातील फळबागांचे आर्थिक चित्र झपाट्याने बदलेल, असा विश्वास कृषी शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पाण्यासाठी नागरिकांचे हाल

$
0
0
औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनीने पाणी पुरवठ्याच्या वेळा कमी केल्या असून वेळापत्रकही पाळले जात नाही. त्यामुळे सिडको एन-१ ते एन-७, हडको एन ११ ते एन/१२ व इतर सेक्टर परिसर, शिवाजीनगर, ‌देवगिरी हिल्स या भागात दोन दिवसाड व केवळ २५ ते ३० मिनिटेच पाणी येत आहे.

पौष्टिक लाडूची चव महागली

$
0
0
थंडीची चाहुल लागताच आरोग्य संवर्धनासाठी पौष्टिक मेंथीच्या लाडूसह अन्य सुक्या मेव्याला मागणी वाढली आहे. सुक्या मेव्याच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ५ ते ८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यापारयांनी सांगितले.

मॉलच्या रस्त्यासाठी खटाटोप

$
0
0
भूसंपादनाचा मोबदला म्हणून पालिकेने जागा दिली. त्यावर संबंधित मालकाने दोन दुकाने उभारली. आता पालिकेने ती दुकानेच आता अतिक्रमण असल्याचे ठरविले आहे. मॉलला रस्ता देण्यासाठी पालिकेने आता या दुकानमालकाला नोटीस बजावण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे.

रिक्षावाल्याने केले मुलीचे शोषण

$
0
0
मध्यवर्ती शहरातील एका नामांकित शाळेतील ११ वर्षांच्या विद्यार्थिनीचे ने-आण करणाऱ्या रिक्षाचालकांनी लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

सबमिशनचे मिशन सुरू

$
0
0
कॉलेजमधील सबमिशन म्हणजे जणू एक पर्वच. परीक्षा सुरू होण्याआधीचे आम्हा विद्यार्थ्यांचे अत्यंत महत्त्वाचे पर्व. संपूर्ण प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट रिपोर्ट हे सगळे सबमिशनचे वेगवेगळे रुप असले तरी सबमिशन पूर्ण करून परीक्षेची तयारी करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा असतो.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images