Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पक्ष्यांचे लक्ष थवे...

$
0
0
शहर परिसरात थंडी वाढताच देश-विदेशातील रंगीबेरंगी पक्ष्यांचे थवे दिसत आहेत. सध्या ‘ब्लॅक हेडेड बंटिंग’, ‘कॉपर स्मिथ’, ‘बे बॅक श्राइक’, ‘सँड पायपर’ आणि ‘वेड्या राघू’चं आगमन झालंय. पिसादेवी, हिमायतबाग, सलीम अली सरोवर आणि विद्यापीठ परिसरात पक्षिमित्रांची गर्दी वाढत आहे.

वेरूळला मिळणार ‘कॉर्पोरेट लूक’

$
0
0
सांसद आदर्श ग्राम विकास योजनेत वेरूळ गावाचा चेहरामोहरा बदलून गावाला ‘कॉर्पोरेट लुक’ देण्यात येणार आहे. वेरूळला पायाभूत सोयीसुविधांचा देण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

भाजप करणार ५ लाख मुस्लिम सदस्य

$
0
0
भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात किमान पाच लाख मुस्लिमांना सदस्य करून घेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, अशी माहिती भाजप अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष खान मोहम्मद हुसेन खान उर्फ आमीर साहेब यांनी दिली.

प्रभाग रचनेचे घोडे अडले

$
0
0
महापालिकेच्या निवडणुकीचे घोडे सध्या प्रभाग रचनेत अडले आहे. प्रभाग रचनेनुसार निवडणूक घ्यायची की वॉर्ड पद्धतीनुसार, यावर मुख्यमंत्री किंवा राज्य शासनानी अद्याप निर्णय घेतलेला नाही.

चारा टंचाईने शेतकरी धास्तावले

$
0
0
यंदा रब्बी पेरणी घटल्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात चारा टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात चाऱ्याची कमतरता भासणार असल्यामुळे कृषी विभागाने ‘वैरण विकास योजने’अंतर्गत चारा प्रकल्प हाती घेतला आहे.

बिल्डर रुणवालांचे कार्यालय सील

$
0
0
स्थानिक संस्था कराचे विवरण दाखल केले नसल्याने महापालिकेच्या एलबीटी विभागाने मंगळवारी (२ डिसेंबर) बिल्डर सुयोग रुणवाल यांचे सहकारनगर येथील कार्यालय सील केले. येत्या पाच दिवसात विवरण आणि स्थानिक संस्था कर भरा, अशी नोटीस रुणवाल यांना बजावण्यात आली आहे.

शिवसैनिकांच्या डोळ्यांत धुळफेक

$
0
0
अकरा वर्षाच्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींना कोर्टातच चोप देण्यासाठी शिवसैनिक दबा धरून बसले होते. परंतु याचा अंदाज आल्याने पोलिसांनी वेळीच सावध होत आरोपींना गनिमी काव्याने सुखरूप जिल्हा कोर्टाबाहेर काढले.

धार्मिक स्थळांबाबत कारवाई काय?

$
0
0
शहरात, जिल्ह्यातील अनाधिकृत धार्मिक स्थळांबाबत आणि इमारतींबाबत कोणती कारवाई करण्यात आली, या संदर्भात जबाबदारपूर्वक शपथपत्र सादर करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने औरंगाबाद पालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

‘बिग फॅमिली कॉन्टेस्ट’

$
0
0
प्रत्येक मनुष्याला कुटुंब आधार देते. आई-बाबा, काका-काकू, आजी-आजोबा, दादा-वहिनी अशी नाती कुटुंबाचा पाया असतो. सध्या न्यूक्लिअर फॅमिलीचा जमाना आहे.

अखेर हातोडा पडलाच...

$
0
0
शहरालगत सातारा-देवळाई येथे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर मंगळवारी (२ डिसेंबर) अखेर प्रशासनाचा हातोडा पडला. आपल्यावर कारवाई होऊ शकत नाही, या अविर्भावात असलेल्या बिल्डरांमध्ये कारवाईमुळे खळबळ उडाली.

चला टेन्शन खल्लास करूया

$
0
0
रोजरोजच्या धावपळीचं टेन्शन, घरातल्या कामाचं टेन्शन, कॉलेजमध्ये जाण्याचं टेन्शन, सबमिशनचं टेन्शन पुढे येणाऱ्या परीक्षांचेही टेन्शन, हे सर्व खल्लास करायचंय. ओ के, तर मग आम्ही येतोय त्यासाठीच. तुमचं टेन्शन खल्लास करण्यासाठी, चैतन्याचा सळसळता उत्साह संचारण्यासाठी आम्ही घेऊन येतोय ‘मटा कार्निव्हल’.

२२ ब्रेथ अॅनलायझर पडून

$
0
0
एसटी विभागात महामंडळाकडून मराठवाड्यातील विविध प्रमुख आगारांसाठी २२ अत्याधुनिक ब्रेथ अॅनलायझर देण्यात आले, मात्र त्यांचा वापर नेमका कसा करायचा, याची माहितीच एसटीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाही.

साहेब, मी पत्नीचा खून केला आहे

$
0
0
‘साहेब मी पत्नीचा खून केला आहे’, असे त्याने सांगितल्यावर काही वेळ पोलिसांना देखील हा गंमत करतो असे वाटले. मात्र, काबरानगरातील त्याच्या घरी जाऊन पाहणी केली असता आरोपीने खरच पत्नीचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.

दलित महिलेचा मारहाणीमुळे मृत्यू

$
0
0
मारहाणीत जखमी झाल्यामुळेच महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप करून संबंधितांवर खुनासह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी मंगळवारी मृतदेहासह सुमारे सहा तास पोलिस ठाण्यासमोर ठेवला होता.

उसाचा पहिला हप्ता ठरेना

$
0
0
मराठवाड्यातील साखर कारखाने एक महिन्यापूर्वीच सुरू झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी पाठवला आहे. मात्र, उसाच्या भावाचा प्रश्न सुटला नाही. गाळप होऊन महिन्यानंतरही शेतकऱ्याच्या पदरात एक रुपया पडलेला नाही.

मराठवाड्यात खोल खोल पाणी

$
0
0
अत्यंत कमी पावसामुळे दुष्काळाला सामोरे जावे लागत असलेल्या मराठवाड्यातील ७६ पैकी ६१ तालुक्यांमध्ये भूजल पातळी अत्यंत खालावली आहे. नोव्हेंबर महिन्यात ८ तालुक्यांची पातळी ही तीन मीटरपेक्षा कमी झाली होती. काही महिन्यांत ही परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.

बिबट्या दिसल्याने घबराट

$
0
0
औरंगाबाद-नागपूर महामार्गावर असलेल्या साजापूर करोडी शिवारातील विटभट्ट्यांच्या परिसरात बिबट्या आढळल्याच्या चर्चेमुळे परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी एका निवेदनाद्वारे वन विभागास ही माहिती दिली.

वगळलेले गट पालिकेत घ्या

$
0
0
सातारा-देवळाई नगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले गट नं. २८ ते ४४ आणि ४६ ते ७५ यांचा समावेश औरंगाबाद महानगरपालिकेत करण्यासाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर करण्यात आली आहे.

रविवारी ‘आयुष्यावर बोलू काही’

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या औरंगाबाद आवृत्तीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त अवघ्या महाराष्ट्रात गाजलेला आणि तमाम मराठी रसिकांनी डोक्यावर मिरविलेला ‘आयुष्यावर बोलू काही’ हा खास काव्य-संगीताचा विलक्षण नजराणा औरंगाबादकर रसिकांसमोर सादर होणार आहे.

तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

$
0
0
मराठवाड्यातील तीन शेतकऱ्यांनी बुधवारी आत्महत्या केल्या. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महिला शेतकऱ्याचा समावेश आहे. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images