Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सातारा-देवळाईचे प्रभाग अंतिम टप्प्यात

$
0
0
सातारा-देवळाई नगर पालिका निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे प्रभागांची रचना करण्यात येत आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

पदाधिकारी हरले, कर्मचारी जिंकले

$
0
0
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत, कर्तव्यात कसूर करतात, अशी सातत्याने ओरड केली जाते. पंधरा दिवसांपूर्वी सिद्धनाथ वाडगाव (ता. गंगापूर) आणि पालोद (ता.सिल्लोड) येथील आरोग्य कर्मचारी निलंबित करण्यात आले. तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

रिक्षचालकाचा संशयास्पद मृत्यू

$
0
0
किराणा चावडी भागात जखमी अवस्थेत बेशुद्ध आढळलेल्या रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घाटी हॉस्पिटलमध्ये घडली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जमाव सिटी चौक पोलिस ठाण्यासमोर जमला होता.

सावकाराच्या जाचामुळे आत्महत्या

$
0
0
एपीआय कॉर्नर भागातील मातोश्री व्हिल केअर या टायर विक्री व दुरुस्तीच्या दुकानमालकाने दुकानातच गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला.

‘समांतर’ योजना रद्द करा

$
0
0
पाणी पुरवठ्याच्या समस्या वाढल्या आहेत. अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्याची दखल घ्यायला कुणीही तयार नाही. त्यामुळे समांतर जलवाहिनीची योजनाच रद्द करा, अशी जोरदार मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अनिल मकरिये यांनी बुधवारी (१० डिसेंबर) स्थायी समितीच्या बैठकीत केली.

दरोडेखोरांचा पोलिसांवर हल्ला

$
0
0
बुधवारी मध्यरात्री उस्मानपुरा भागात गुन्हेगारांनी दरोडा घातला. पोलिसांनी केलेला थरारक पाठलाग, जीवघेणी झटापट आणि जिवावर खेळत वॉचमनने दाखविलेली दक्षता यामुळे दोन अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश आले.

घाटीत बालकांना टीबीचा धोका

$
0
0
टीबी युनिट हे गर्दीपासून दूर असावे, हा जगभरातील सर्वमान्य संकेत सर्रास पायदळी तुडवण्याचा प्रकार शहरातील सर्वांत मोठ्या घाटी रुग्णालयात सुरू आहे. बाह्यरुग्ण विभागाच्या (ओपीडी) पहिल्या मजल्यावर टीबी युनिटशेजारीच पहिल्या दिवसाच्या बाळापासून ते पाच वर्षांपर्यंतच्या सुमारे १०० बालकांना रोजच विभिन्न प्रकराच्या लस देण्यात येत आहेत.

नवजात जिवांना टॉवर्समुळे यातना

$
0
0
शहरातील तब्बल ३७३ मोबाइल टॉवर्सच्या तीव्र किरणोत्सर्गामुळे (रेडिएशन) गर्भवतींवर, पोटातील गर्भावर विविध प्रकारचे गंभीर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मालमत्ता विभागासाठी विशेष बैठक

$
0
0
मालमत्ता विभागाच्या कारभारावर विशेष बैठक घेण्याची घोषणा बुधवारी (१० डिसेंबर) महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विजय वाघचौरे यांनी केली. मालमत्ता विभागाच्या माध्यमातून महापालिकेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर बुडत आहे आणि ही फार गंभीर बाब आहे.

‘मुळा’चे पाणी नाथसागरात

$
0
0
मुळा धरणातून मराठवाड्यासाठी सोडण्यात आलेले पाणी बुधवारी (१० डिसेंबर) सकाळी ७ वाजता नाथसागराच्या उंबरठ्यावर म्हणजे देवगड येथे पोचले. दरम्यान भंडारदरा प्रकल्पातून सोडलेले पाणी निळवंडे प्रकल्प ओलांडून जायकवाडीत शनिवारी येण्यास सुरुवात होईल, असा अंदाज आहे.

‘नाईक’मध्ये विद्यार्थ्यांचा जोशात दंगा

$
0
0
प्रचंड उत्साह... कल्ला... हास्यकल्लोळ... मस्ती... आणि क्षण नि क्षण एन्जॉय करण्याच्या अफलातून मूडमध्ये तासभर कुठे निघून गेला, हे कुणालाच कळाले नाही… अशी काही अवस्था झाली होती वसंतराव नाईक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची.

विद्यापीठातही टेन्शन खल्लास

$
0
0
अभ्यास आणि परीक्षा या टेन्शनमध्ये असलेल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी क्षणभर उसंत घेतली आणि काही वेळ का असेना त्यांचे टेन्शन खरोखरच खल्लास झाले. महाराष्ट्र टाइम्सच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त औरंगाबाद टाइम्स कार्निवलने विद्यापीठात तासभर धमाल उडवून दिली.

देवगिरीची तयारी जोरात

$
0
0
केंद्रीय युवक महोत्सवात नाट्य विभागात मागील तीनही वर्षे हॅटट्र‌िक करणाऱ्या देवगिरी महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी यंदाही कसून तयारी केली आहे. यंदाही आम्ही यश मिळवूनच असा या विद्यार्थ्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

नऊ हजारांवर फुकटे ग्राहक

$
0
0
वीज चोरी आणि गळती थांबविण्यासाठी नेमण्यात आलेल्या जीटीएल कंपनीचा कारभाराचे नमुने समोर येत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून शहरातील ९९०० वीज ग्राहकांंनी वीज बिल भरलेलेच नाही. या ग्राहकांकडे असलेली ५७ कोटी रुपयांची वसुली झालेली नाही.

नशिबी होता पोलिसांचा खांदा

$
0
0
सुरेश भटांच्या या ओळी माणसाच्या जीवनाला तंतोतंत लागू पडतात. मात्र, या कवितेच्या आशयाच्या पुढे काही जणांचे जीवन असते. आयुष्यभर तर त्रास होत असतो. मृत्यूनंतरही त्यांना निरोप देण्यासाठी चार खांदेकरीही मिळू शकत नाहीत.

पाणीपट्टी भरल्यावरही नोटीस

$
0
0
पाणीपट्टी भरल्यावरही नागरिकांना औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीतर्फे थकबाकीच्या नोटीसा दिल्या जात आहेत. थकबाकी भरली नाही, तर नळकनेक्शन तोडण्याची धमकी दिली जात आहे.

निळवंडेचे पाणी जायकवाडीकडे

$
0
0
मुळा धरणातून मराठवाड्यासाठी सोडण्यात आलेले पाणी जायकवाडीमध्ये पोचण्यास सुरुवात झाल्यानंतर गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास निळवंडे प्रकल्प ओव्हरप्लो झाला. आता मुळापाठोपाठ भंडारदरा प्रकल्पातून सोडलेले पाणी जायकवाडीकडे येण्यास सुरुवात झाली आहे.

सव्वा लाख शेतकरी सावकारी पाशातून मुक्त

$
0
0
दुष्काळामुळे परवानाधार सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज सरकार भरणार आहे. त्याचा मराठवाड्यातील सुमारे १ लाख २० हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मराठवाड्यात तब्बल दीड हजारांवर नोंदणीकृत सावकार आहेत.

ऊसतोड कामगारांसाठी परळीला मुख्यालय

$
0
0
राज्यातील सात लाख ऊसतोड कामगार आतापर्यंत असंघटित मजूर म्हणून राबत होते. मात्र, या ऊसतोड मजुरांची न्याय मिळण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. ऊसतोड कामगारासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कल्याण मंडळाची स्थापना केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आयआयएमसाठी लढा

$
0
0
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) औरंगाबादमध्येच उभारले जावे, यासाठी लोकचळवळीतून लढा उभारला जाणार आहे. शुक्रवारी उद्योजक आणि विविध सामाजिक संघटनांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. आयआयएम मराठवाडा कृती समितीही स्थापन करण्यात आली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images