Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

झेडपीचे शिक्षक परत पाठवले

$
0
0
जिल्हा परिषदेने दिलेले शिक्षक पगारासाठी पैसे नाहीत, असे कारण पुढे करून महापालिकेच्या आयुक्तांनी परत पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकारामुळे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध होऊ शकणार नाहीत.

किडनीदानानंतरही मातृत्वाचे भाग्य

$
0
0
विवाहानंतर काही वर्षांतच अचानक पतीचे दोन्ही मूत्रपिंड (किडनी) निकामी झाले आणि माहेरून नाराजी असतानाही ‘शौहर बिना जिंदगी क्या कामकी,’ अशा ठाम भूमिकेतून पत्नीने पतीला किडनी दिली.

मराठवाड्यात अवकाळी पाऊस

$
0
0
मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत शुक्रवारी (१२ डिसेंबर) अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सर्वत्र गारठ्यात वाढ झाली आहे. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते.

पाणी सोडण्यास स्थगिती नाही

$
0
0
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याचा निर्णयास स्थगिती देण्याची विनंती पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना (प्रवरानगर) व हरिश्चंद्र फेडरेशनच्या वतीने दोन स्वतंत्र याचिकेद्वारे सुप्रिम कोर्टात करण्यात आली होती.

शाळकरी मुलीवर अत्याचार

$
0
0
एका शाळकरी मुलीवर मुख्याध्यापकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी शाळेवर धडक दिल्याने तणाव निर्माण झाला.

घरकूल वाटपाला हायकोर्टाची स्थगिती

$
0
0
नळदूर्ग येथील रखडलेल्या घरकुल वाटपाच्या शुक्रवारी होणाऱ्या लॉटरी सोडत प्रक्रियेला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली. त्यामुळे ही प्रक्रिया अखेर नगरपालिकेला गुंडाळावी लागली. या प्रकरणी नळदूर्ग येथील सामाजिक कार्यकर्ते सुशांत भूमकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

विकास कामात सर्वांनी सहभाग नोंदवावा

$
0
0
गावातील प्रत्येक व्यक्तीने घराबाहेर येऊन गावाच्या विकास कामात सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. शासनाच्या सहभागाबरोबरच सांसद आदर्श गाव ही योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी लोकसहभागही महत्तवाचा आहे, असे मत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

समाज निर्मितीचे आव्हान

$
0
0
प्रस्थापित व्यवस्थेला हाणून पाडण्याचे आव्हान सध्या समोर उभे आहे. त्यासोबतच आगामी काळात जातीपाती विरहित समाज निर्माण करण्याचे काम विद्रोही चळवळीला करावे लागणार आहे, असे मत विद्रोही साहित्य संमेलनाचे उद‍्घाटक तथा बेंगलोर येथील बंडाया चळवळीचे चंद्रशेखर पाटील यांनी व्यक्त केले.

‘टीईटी’ची पसंती घसरली

$
0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी (१३ डिसेंबर) होत आहे. औरंगाबादमध्ये ३३ परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार असून, १९ हजार ७६९ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डीटीएड, बीएडधारकांचा उत्साह कमी झाला असून, परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या ४० टक्क्यांनी घटली आहे.

तिरुपतीसाठी साप्ताहिक रेल्वे सुरू

$
0
0
बालाजीभक्तांची कित्येक वर्षांची मागणी शनिवारी पूर्ण झाली. रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या औरंगाबाद-रेनीगुंटा या साप्ताहिक रेल्वेचे उद्‍घाटन शनिवारी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाले. दर शुक्रवारी ही गाडी औरंगाबादहून तर शनिवारी रेनीगुंटा येथून परतीच्या प्रवासाला निघेल.

महापालिकेत भाजप स्वबळावरच

$
0
0
केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आले आहे, मात्र सर्वसामान्य जनतेला लाभ पोचविण्यासाठी तळागाळातील भाजप कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मगच ‘अच्छे दिन’ दिसतील. आता महापालिकेत खरी कसोटी आहे.

रेल्वे रिटायरिंग रूमचा दुरुपयोग?

$
0
0
रेल्वे स्टेशनवरील रिटायरिंग रूम घेण्यासाठी ऑनलाइन बुकींग सेवा सुरू केली आहे, मात्र औरंगाबाद स्थानकाच्या नवीन इमातरीमधील अद्यावत रिटायरिंग रूमचा वापर प्रवाशांसाठी न करता खात्यातील काही विशिष्ट लोक करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या रिटायरिंग रूमच्या अनाधिकृत वापरामुळे भांडणांचे प्रकारही झाल्याची माहिती समोर आली आहे.

४३ लाख शेतकऱ्यांना मदतीची आस

$
0
0
विदर्भ व मराठवाड्यात दुष्काळामुळे होरपळत असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने ७ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यापैकी ३९२५ कोटी रुपये हे ९२ लाख हेक्टर बाधित पिकांसाठी शेतकऱ्यांना भरपाई म्हणून देण्यात येणार आहे.

शाळकरी मुलींवर अत्याचार

$
0
0
एका शाळकरी मुलींवर मुख्याध्यापिकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून, संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.

२० वर्षांनंतर मिळाले पोस्ट ऑफिस

$
0
0
आपल्या परिसरात बचत करण्यासाठी टपाल विभागाचे कार्यालय सुरू व्हावे, यासाठी रोशन गेट परिसरातील बशीर कॉलनीत रहिवाशांचा प्रयत्न अखेर यशस्वी ठरला. २० वर्षांच्या संघर्षानंतर टपाल विभागाचे कार्यालय सुरू झाले आहे.

विद्यार्थी जेवणासाठी ताटकळले

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात पहिल्याच दिवशी प्रशासनाचा ढिसाळ नियोजनाचा फटका ग्रामीण भागातून आलेल्या‌ विद्यार्थ्यांना बसला. सकाळी आठपासून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना जेवणासाठी तब्बल दुपारपर्यंत ताटकळत बसावे लागले. वेळेत जेवणाचे कुपन आणि पुरेसे जेवण उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले.

कोट्यवधी खर्चूनही रस्ते दयनीय

$
0
0
तिजोरीत खडखडाटाची ओरड करणाऱ्या महापालिकेने शहरातील रस्त्यांच्या कामांवर तीन वर्षांत तब्बल ११० कोटी रुपये खर्च केले आहेत, मात्र कामांचा दर्जा न राखल्यामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यांच्या कामातील कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे रॅकेट मजेत असून, नागरिकांच्या नशिबी मात्र यातना आल्या आहेत.

हवामानाने कूस बदलली

$
0
0
कापसाची बोंड फुटण्याच्या बेतात, मोसंबी, डाळींब ताणावर आणि द्राक्षाचे पीक शेवटच्या टप्प्यात असताना दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला अवकाळी पाऊस, गारपिटीने मोठा तडाखा दिला. रब्बी ज्वारी, गहू, हरभऱ्यासाठी हा पाऊस चांगला असला तरी, कापूस, भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

रिमझिम पाऊस अन् मटा कार्निवल

$
0
0
‘मटा कार्निवल’च्या शेवटच्या टप्प्यात हडकोतील श्रीकृष्णनगरवासीयांनी कार्निवलचा मनसोक्त आनंद घेतला. १२ डिसेंबरच्या संध्याकाळी रिमझिम पाऊस सुरू होता. याच पावसात कार्निव्हलचा ताफा परिसरात पोचला आणि एकच धमाल सुरू झाली.

विद्रोही ही परिवर्तनाची चळवळ

$
0
0
मराठवाडा ही संतांची भूमी होती. मात्र, काही प्रस्थापित मंडळींनी संतांच्या विचारांना भक्तिमार्गात अडकवून ठेवले होते. खऱ्या अर्थाने संतांचे विचार समतावादी होते. विद्रोही चळवळ ही परिवर्तनाची चळवळ आहे. त्यामुळे आगामी काळात ‌ही चळवळ मजबूत करण्यासाठी सर्वांना पुढे येण्याची गरज आहे
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images