Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रमीजच्या आत्महत्येचे राजकारण

0
0
नांदेड येथील कलाशिक्षक रमीजच्या आत्महत्येचे राजकारण सुरू झाले आहे. लोक भारतीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील, शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी रविवारी सय्यद कुटुंबीयांची भेट घेतली. सेनेचे आमदार हेमंत पाटील यांनीही वेगळी भेट दिली.

शिवसेना, भाजपमध्ये थेट लढत

0
0
केंद्र, राज्य आणि महापालिकेत शिवसेना- भाजपा युती असली तरी, छावणी परिषदेच्या निवडणुकीत या दोन पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा एकही उमेदवार यावेळी निवडणुकीत नाही. त्यामुळे या दोन पक्षांमध्येच सामना होत आहे.

‘आयआयएम’साठी वज्रमूठ

0
0
ऐतिहासिक व औद्योगिकदृष्ट्या जगाच्या नकाशावर मान्यता पावलेल्या औरंगाबाद शहरात केंद्र सरकारने जाहीर केलेले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) व्हावे, यासाठीचा लढा आता खऱ्या अर्थाने तीव्र झाला आहे.

भुताची अफवा पसरवून वाळू तस्करी

0
0
महसूल व पोलिस पथकाला गुंगारा देण्यासाठी वाळू तस्करांनी शहरात भुताची अफवा पसरवली आहे. यामुळे शासकीय कर्मचारी भीतीमुळे फिरकणार नाहीत व बिनदिक्कतपणे वाळू वाहतूक करता येईल, यासाठी ही शक्कल लढविण्यात आली आहे.

३ लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफी

0
0
दुष्काळी गावातील शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या वीज बिल माफीचा औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. राज्य सरकारने तीन महिन्यांचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे.

विवाहितेला जाळणाऱ्या सासरच्या तिघांना जन्मठेप

0
0
पुतणीच्या विवाहासाठी माहेरातून दोन लाख रुपये आणण्यास नकार देणाऱ्या विवाहितेला जाळून मारल्याप्रकरणी पती, सासू व सासरे या तिघांना दोषी ठरवून जिल्हा व सत्र न्यायाधीश मल्हार देशपांडे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

लेखिकांनी साहित्याच्या मुख्य प्रवाहात यावे

0
0
जालना येथे जानेवारी २०१५ मध्ये होणाऱ्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथा, कादंबरीकार डॉ. छाया महाजन यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे हे सहावे लेखिका संमेलन आहे.

‘विविध भारती’चे प्रसारण आकाशवाणीवरून करावे

0
0
आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून विविध भारतीचे पुन:प्रसारण करावे, अशी मागणी रेडिओ श्रोता संघाचे जगन्नाथ बसैय्ये यांनी केली आहे.

दुष्काळावर अखेर सरकारी मोहोर

0
0
यावर्षी पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे, परंतु त्यावर सरकारी मोहोर उमटली नव्हती. महसूल प्रशासनाकडून सोमवारी (१५ डिसेंबर) अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १३५३ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शाळकरी विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने चिरडले

0
0
भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने १४ वर्षांचा शाळकरी विद्यार्थ्याला सोमवारी (१५ डिसेंबर) पळशी रस्त्यावरील पारदेश्वर मंदिराजवळ चिरडले. या अपघातात विद्यार्थी जागीच ठार झाला आहे.

चारित्र्य पडताळणी आठ दिवसांत

0
0
पासपोर्ट काढताना (पारपत्र) चारित्र्य प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक महिने नागरिकांना वाट पाहावी लागते, मात्र एसपी कार्यालयाने तयार केलेल्या विशेष सॉफ्टवेअरमुळे कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण कमी होऊन ग्रामीण भागातील नागरिकांचे चारित्र्य प्रमाणपत्र अवघ्या आठ दिवसांत मिळत आहे.

घाटीला ‘डिजिटल मॅमोग्राफी’

0
0
किमान चार वर्षांपासून कायमस्वरूपी बंद पडलेले ‘लिथोट्रिप्सी’, तर संपूर्ण घाटी रुग्णालय व शासकीय विभागीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नसलेल्या ‘डिजिटल मॅमोग्राफी’ या दोन्ही सुमारे पाच कोटी रुपयांच्या अतिशय महत्त्वाच्या उपकरणांच्या खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.

गणिताचे बादशहा...

0
0
दहावीत गणितात १००पैकी १०० मार्क मिळाल्यानंतर पुढच्या शिक्षणाचा प्रवास गणितज्ज्ञ म्हणून सुरू झाला. उच्चशिक्षण घेतल्यानंतर सुरवातीलाच ठरविल्याप्रमाणे गणिताचे शिक्षक व्हायचे होते. त्यानुसार गेली ३५ वर्षे हाडाचा म्हणण्यापेक्षा आयुष्याच्या गणिताचे शिक्षक म्हणून ओळख निर्माण झाली.

पालिकेला मिळणार सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल

0
0
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) तत्वावर महापालिकेच्या पुढाकाराने ३०० खाटांचे सुपरस्पेशालिटी उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात पोहचला आहे. यासंदर्भातील अंतिम बोलणीसाठी महापालिकेचे शिष्टमंडळ सोमवारी (१५ डिसेंबर) दिल्लीला रवाना झाले.

नाके बळकाविण्याचा प्रयत्न

0
0
महापालिकेने जकात नाक्यांसाठी संपादित केलेल्या जागांची खोटी कागदपत्रे तयार करून जागा बळकाविण्याचा प्रयत्न सभापती विजय वाघचौरे यांनी हाणून पाडला. याबाबत मालमत्ता अधिकारी आणि आस्थापना अधिकारी यांना समोरासमोर बोलावून विचारणा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

शिक्षणाला मिळाले बळ

0
0
राष्ट्रीय पातळीवरील ‘स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर’ (एसपीए) औरंगाबादमध्ये उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (१५ डिसेंबर) केली.

‘आयआयएम’ अधांतरी

0
0
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) संस्थेच्या स्थापनेसाठी सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाकडे सपशेल दुर्लक्ष करून सरकारने औरंगाबादेत ‘स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर’ (एसपीए) स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली.

मर्सि‌डीजची विद्यार्थ्यांना कार!

0
0
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सुरू असलेल्या ‘मेकॅट्रॉनिक्स’ अभ्यासक्रमाला मर्सिडीजने चक्क ४७ लाख रुपयांची कार दिली आहे. वाहन उद्योगाची वेगाने होत असलेली वाटचाल आणि रोज बदलते तंत्रज्ञान लक्षात घेत, हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अभ्यासता यावे, यासाठी हा पुढाकार घेण्यात आला.

दुष्काळ पाहणी हिरव्या शेतांत!

0
0
दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाने हिरव्यागार असलेल्या शेतांचीच पाहणी केली. मराठवाड्यात पिण्याच्या प्रश्न तीव्र झाला असताना प्रशासनाने केंद्रीय पथकाला पाण्याने निम्मी भरलेले शेततळे दाखविले.

लग्नाच्या दिवशी वऱ्हाडी बेपत्ता

0
0
आठ महिन्यापूर्वी विवाह ठरला. साखरपुडाही पार पडला. ३ डिसेंबर रोजी विवाह करण्याचे निश्चित झाले. तरुणीकडील लोकांनी मंगल कार्यालय ठरविले. पाहुणे आले, नवरदेवाची, वऱ्हाडाची वाट पाहणे सुरू होते. मात्र, ऐनवेळी त्यांच्याकडून लग्नाला येत नसल्याचे कळविण्यात आले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images