Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मकब-यातील कर्मचा-यांना कायम करा

$
0
0
दख्खनचा ताज म्हणून जगविख्यात संभाजीनगरच्या बीबी का मकबऱ्यात जवळपास ३० वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या ३७ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिल्ली येथील भारतीय पुरातत्व विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रवीण श्रीवास्तव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

जंगल होममधून बघा ‘अजिंठ्या’चे सौंदर्य

$
0
0
जंगलाच्या शांत वातावरणात येणारा पशूपक्ष्यांचा आवाज या ठिकाणी ऐतिहासिक स्थळांच्या भेटीत वन जिवनाचा आनंद लुटण्यासाठी, जंगलामध्ये बांबू हट सह जंगल होम तयार करण्यात येणार आहेत.

सोनोग्राफी सेंटर आज बंद

$
0
0
नांदेड येथील रेडिऑलॉजिस्ट डॉ. गोपाल बत्तलवार यांना अटक केल्याच्या निषेधार्थ बुधवारी राज्यभरातील रेडिऑलॉजिस्ट एक दिवसीय लाक्षणिक बंद पाळणार आहेत.

प्रवाशाची बसवर दगडफेक

$
0
0
बस थांबवत नसल्याने प्रवाशाने कंडक्टरला शिविगाळ करून बसच्या काचा फोडल्याची घटना सोमवारी नगरनाका भागात घडली.

रेशन यादीतून अचानक नावे वगळली!

$
0
0
रेशनवरील धान्य वितरणात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे, मात्र दुसऱ्या बाजुला कोणतेही कारण न देता रेशनच्या यादीतून नावे वगळल्याचे प्रकारही समोर येत आहेत.

देशीदारू, वाईन शॉपची माहितीही दडवली

$
0
0
पालिकेच्या स्थानिक संस्थाकर विभागाने लेखापरिक्षणासाठी शहरातील देशीदारूच्या दुकानांची व वाईन शॉपची माहितीही दडवून ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्रह्मानंद देशपांडे यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ इतिहास संशोधक, महामहोपाध्याय डॉ. ब्रह्मानंद श्रीकृष्ण देशपांडे (७३) यांचे मंगळवारी पुण्यात आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी डॉ. जयश्री, मुलगा, सुन, नातू असा परिवार आहे.

सात हजार मखरांमध्ये ‘इको फ्रेंडली’ बाप्पा

$
0
0
श्रावण महिन्याला सुरुवात होत असतानाच, बालगोपाळांना गणपतीचे वेध लागतात. यंदाच्या गणेशोत्सवासाठीचे त्यांचे नियोजन मनामध्ये तयार होत असतानाच, पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्यासाठी शहरातील कार्यकर्त्यांनीही कंबर कसली आहे.

पालखेडचे पाणी नारंगी तलावात सोडा

$
0
0
वैजापूर शहराला पाणीपुरवठा करणारा नारंगी तलाव भरपावसाळ्यात कोरडा आहे. या तलावात नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणाचे ओव्हरफ्लो पाणी डाव्या कालव्यातून सोडण्याची मागणी नगरसेवक राजेंद्र साळुंके यांनी केली आहे.

लोहवर्धक टॉनिकच्या बाटल्या उकिरड्यावर

$
0
0
बालकांच्या वाढीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या ‘लोहवर्धक टॉनीक’ (आयर्न टॉनीक)च्या बाटल्यांचा साठा उकिरड्यावर आढळला. उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळील उकिरड्यावर या बाटल्या आढळल्या.

महिला जिल्हाप्रमुखाचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

$
0
0
नांदेड जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सुमती व्याहाळकर यांनी मंगळवारी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

नांदेडच्या डॉक्टरांचा संप मागे

$
0
0
डॉक्टरांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी प्रशासनाने दाखविल्यानंतर, नांदेड शहरातील खासगी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला.

पानटपरीधारकांच्या पुनर्वसनाचा विचार

$
0
0
सुगंधी तंबाखू, माव्यावर राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर हजारो पानटपरीधारक बेरोजगार होण्याचा धोका आहे. त्यांच्या पुनर्वसनाचा सरकार गांभिर्याने विचार करेल, असे मत राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी लातुरात सांगितले.

कन्नड स्टँडला डबक्याचे स्वरूप

$
0
0
एसटी महामंडळाचे कन्नड येथील आगार उत्पन्नात आघाडीवर आहे. मात्र, सुविधा व स्वच्छतेच्या बाबतीत हे आगार पिछाडीवर आहे.

कॅन्सर सेंटरमध्ये कृत्रिम सांधेरोपण यशस्वी

$
0
0
शासकीय वैद्यकीय रुग्णालयांतर्गत असलेल्या विभागीय कर्करोग विशेषोचार केंद्रात मांडीच्या हाडाच्या कॅन्सरवर (जायंटस सेल ट्यूमर) शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.

फेर मतमोजणीचा आदेश बेकायदेशीर

$
0
0
औरंगाबाद जिल्हा वकिल संघाच्या अध्यक्षपदासाठीच्या मतांची फेरमतमोजणी बुधवारी होणार आहे.

किडनीदात्याची किडनी दुर्बिणीद्वारे काढली

$
0
0
मूत्रपिंड प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लांट) करताना किडनीदात्याची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असते. प्रगत तंत्रज्ञानामुळे आजकाल अनेक अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडत आहेत.

दुर्बिणीद्वारे किडनी ट्रान्स्प्लांट

$
0
0
किडनीदात्याची किडनी दुर्बिणीद्वारे काढण्याची शस्त्रक्रिया माणिक हॉस्पिटलमध्ये यशस्वी करण्यात आली. यासंदर्भात संचालक डॉ. उल्हास कोंडपल्ले यांनी सांगितले, परभणी जिल्ह्यातील ३१ वर्षीय रुग्णावर किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वी झाली.

लाच स्वीकारताना जमादाराला अटक

$
0
0
सावकारी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी देत, युवकाकडून २५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या छावणी पोलिस ठाण्याच्या जमादाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

बंद टँकर पुन्हा सुरू

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणीटंचाई आहे. ३१ जुलै रोजी २०० टँकर सुरू होते. प्रशासनाने मुदत संपल्याने हे टँकर बंद केले होते.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images