Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कलाकारांची मायानगरी ‘देवगिरी’

0
0
बक्षिसांसाठी विजेता विद्यार्थी, कोड क्रमांकांचे नाव पुकारले जात होते आणि बक्षिस घेण्यासाठी सहभागी संघातील विद्यार्थ्यांची व्यासपीठावर जाण्यासाठी झुंबड उडत होती. तर यशस्वी विद्यार्थ्यांना शिट्ट्यांचा, टाळ्यांचा प्रतिसाद मिळत होता.

जल्लोष फक्त जल्लोष

0
0
बक्षिस वितरणाच्या जल्लोषपूर्ण वातावरणात सर्वोत्कृष्ट संघाची ढाल देवगिरी कॉलेजने तर उत्कृष्ट ग्रामीण संघाच्या पारितोषिकावर तुळजापूरच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजने नाव कोरले.

विमानप्रवाशांना ‘स्पाइसजेट’चा फटका

0
0
दिल्लीला जाण्यासाठी औरंगाबाद विमानतळावर पोहोचलेल्या ‘स्पाइस जेट’च्या प्रवाशांना अचानक विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे ऐनवेळी एअर इंडियाच्या दिल्लीच्या विमानाच्या एका तिकिटाची ‌किंमत ४० हजारांपर्यंत पोहोचली.

स्टेशनवरील हॉटेलात तरुणांचा गोंधळ

0
0
रेल्वे स्टेशनमधील ‘ला फेस्टा फुड’ या हॉटेलमध्ये सोमवारी (१५ डिसेंबर) मध्यरात्री चार तरुणांनी धुडगूस घातला. त्यांनी आधी भोजन करणाऱ्या प्रवाशांना हाकलले. त्यानंतर येथील सीसीटीव्हीचे कनेक्शन तोडून कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. या तरुणांनी नेटसेटर घेऊन पळ काढला.

सिल्लोड तालुक्यात कुपोषण वाढले

0
0
शासन एकीकडे कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करीत आहे, परंतु तालुक्यातील कुपोषण अद्यापही कमी होताना दिसत नाही. सिल्लोड तालुक्यातील दोन अंगणवाडी प्रकल्पातील बालकांपैकी ५८६ बालके तीव्र कमी वजनाची आढळली आहेत.

सावकारी पाशातून झाली दोन शेतक‍ऱ्यांची मुक्तता

0
0
सावकारी पाशात अडकलेल्या दोन शेतकऱ्यांची शेतजमीन परत मिळवून देण्यात सहकार विभागाला यश आले आहे. एकाची एक एकर व दुसऱ्याची ४० आर जमीन सावकाराच्या ताब्यातून मुक्त झाली आहे. सिल्लोड येथील एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोदी टॉवरचा मजला पाडला

0
0
नगर पालिकेच्या पथकाने मंगळवारी (१६ डिसेंबर) बीड बायपासवरील गट क्रमांक १४०मधील मोदी टॉवरचा मजला पाडला. बांधकाम सुरू झाल्यापासून ही इमारत नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली होती. इमारतमालकाने नाला एका बाजूने बंद केल्यामुळे सांडपाणी दुकाने, वसाहतींमध्ये शिरले होते.

‘आयआयएम’साठी आता फडणवीस, ठाकरेंना गळ

0
0
ऐतिहासिक औरंगाबाद शहरामध्येच इंडियन इ‌‌न्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) व्हावे यासाठी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच गळ घालणार आहेत.

अभियंत्यांविरुद्ध कोर्टात खटला दाखल करणार

0
0
जालना लघुपाटबंधारे विभागात गैरव्यवहार करून अडीच कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा करणाऱ्या शाखा अभियंता व उपविभागीय अभियंत्यांना अटक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाच्या विचारधीन आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अखेर आमदार जागे झाले

0
0
राज्यात शैक्षणिक समतोल राखण्यासाठी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम) संस्था औरंगाबाद शहरातच स्थापन करावी, अशी आग्रही मागणी मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी केली. या मागणीसाठी मंगळवारी (१६ डिसेंबर) विधानभवन परिसरात निदर्शने करण्यात आली.

‘पीडब्ल्यूडी’त लाखोंच्या नियमबाह्य खिरापती

0
0
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या औरंगाबाद विद्युत उपविभागात तब्बल ३४ लाखांची कामे नियमबाह्य पद्धतीने वाटप केल्याचे समोर आले आहे. ए -१ निविदा सूचना फलकावर प्रसिद्ध न करता मोजक्याच कंत्राटदारांना कामे वाटप करण्यात आली.

साडेचार दशकांचे सोबती

0
0
नोकरीच्या निमित्ताने झालेली ओळख मैत्रीत कधी रुपांतरित झाली हे कळालेच नाही. गेल्या ४५ वर्षांत मैत्री अधिक दृढ होत गेली. दोन्ही कुटुंबांतील स्नेह वाढला.

स्वातंत्रसैनिकाच्या विधवा पत्नीस दीर्घ न्यायालयीन लढाईनंतर न्याय

0
0
पती हयात असताना स्वातंत्रसैनिक म्हणून पेन्शन मिळाले नाही. पेन्शनची प्रक्रिया चालू असतानाच पतीचे निधन झाले. त्यामुळे पत्नीने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. तब्बल सहा वर्षानंतर, दोन वेळा याचिका केल्यानंतर पत्नीला न्याय मिळाला.

छावणीत तापाचे दीडशे रुग्ण

0
0
छावणीच्या रुग्णालयात छावणी भागासह महानगर पालिकेच्या पडेगाव, मिटमिटा भागातून दररोज दोन-तीन डेंगी सदृश्य आजाराचे रुग्ण येत आहेत. या भागात मागील महिनाभरात दीडशेच्यावर तापाचे रुग्ण आले असल्याची नोंद करण्यात आली आहे.

१९७१च्या युद्धातील आठवणींना उजाळा

0
0
गारखेडा परिसरातील कारगिल स्मृतीवनात १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी जागवण्यात आल्या. १३ शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी शहिदांना अभिवादन केले. यावेळी माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव करण्यात आला.

विद्यार्थी सुरक्षा रामभरोसे

0
0
पेशावर येथील आर्मी स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर औरंगाबाद शहरातील शाळांच्या सुरक्षा व्यवस्थेचा धांडोळा घेतला असता शहरातील शाळांमधील सुरक्षा व्यवस्था अतिशय कमकुवत असल्याचे समोर आले आहे.

बच्चे कंपनीला ‘विंटर डायरिया’ने तडाखा

0
0
थंडीचे प्रमाण वाढल्यापासून म्हणजेच दोन ते तीन आठवड्यांपासून ‘विंटर डायरिया’ने प्रमाण लक्षणीय वाढले आहे. प्रत्येक बाल रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) ४० ते ५० टक्के रुग्ण हे वेगवेगळ्या प्रकारच्या डायरियाचे आहेत.

विद्यादीप बालगृह दहशतीखाली

0
0
अनाथ, निराधार मुलींना मायेची सावली देणाऱ्या छावणी भागातील विद्यादीप अनाथालय (बालगृह) गेल्या पाच दिवसांपासून दहशतीखाली आहे. काही टवाळखोरांनी या संस्थेतील मुली, कर्मचारी यांना त्रास देण्याचा प्रकार सुरू केला आहे.

३ हजार कोटींची मागणी

0
0
गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत असलेल्या मराठवाड्याच्या दुष्काळ निवारणासाठी ३ हजार कोटी रुपयांची गरज आहे. त्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर ठेवला असल्याची माहिती पथकातील सदस्यांनी दिली.

IIMसाठी कनेक्टिव्हिटी कमी!

0
0
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) संस्थेची स्थापना औरंगाबादेत करण्यामध्ये चक्क कनेक्टिव्हिटीची अडचण असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट करून ही संस्था ही राष्ट्रीय संस्था इतरत्र वळविण्यात येणार असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images