Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लग्नाच्या दिवशी वऱ्हाडी बेपत्ता

0
0
आठ महिन्यापूर्वी विवाह ठरला. साखरपुडाही पार पडला. ३ डिसेंबर रोजी विवाह करण्याचे निश्चित झाले. तरुणीकडील लोकांनी मंगल कार्यालय ठरविले. पाहुणे आले, नवरदेवाची, वऱ्हाडाची वाट पाहणे सुरू होते, मात्र ऐनवेळी त्यांच्याकडून लग्नाला येत नसल्याचा निरोप आला.

कंत्राटी युरोलॉजिस्ट मिळणार

0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) शल्यचिकित्साशास्त्र विभागाअंतर्गत सुमारे चार वर्षे वेगवेगळ्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर राहिलेल्या एकमेव मूत्ररोगतज्ज्ञाच्या (युरोलॉजिस्ट) प्रतिनियुक्तीस मुदतवाढ मिळाली नाही.

पालिका १३ मालमत्ता विकणार

0
0
आर्थिक डबघाईला आलेल्या महापालिकेने २०० कोटी रुपयांसाठी ३०० कोटींच्या १३ मालमत्ता गहाण ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पालिकेने या जागांसाठी हरकती, आक्षेप मागविले होते.

वर्षभरात बलात्काराचे २२ गुन्हे

0
0
गेल्या वर्षभरात पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत बलात्काराचे २२ गुन्हे दाखल करण्यात आल्याची नोंद आहे. त्यात अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे प्रमाण जास्त अाहे. बहुतांश प्रकरणात बलात्कार करणारे आरोपी पीडित मुलीच्या ओळखीचे होते.

८,१३९ गावांमध्ये टंचाईची परिस्थ‌िती

0
0
मराठवाड्यातील सर्व गावांची अंतिम पैसेवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार ८,५३६ गावांपैकी ८,१३९ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. सुधारित पैसेवारीत जास्त पैसेवारी आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ४६, बीड २६ व उस्मानाबाद जिल्ह्यातील ६३ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी झाली आहे.

थकलेली मजुरी न दिल्यास ‘जेलभरो’

0
0
पळसवाडी येथील रोजगार हमी योजनेच्या रोपवाटिकेतील २८ मजुरांची मजुरी दोन वर्षांपासून थक‌ित मजुरी ३१ डिसेंबरपर्यंत द्यावी, अन्यथा १ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

१० कोटींचे शुल्क सिडकोकडे पडून

0
0
सातारा, देवळाई या दोन गावांत मोठे गृह प्रकल्प राबविण्यासाठी बिल्डरांनी सिडकोकडे सुमारे १० कोटी रूपये विकास शुल्क जमा केले आहे. ही रक्कम सिडकोने अद्याप नगर पालिकेला दिली नाही. त्यासाठी ऑक्टोबरमध्ये सिडकोला पत्र पाठविण्यात आले आहे.

जीनिंगनी थकवले ६६ लाख

0
0
सिल्लोड शहर व तालुक्यातील २४ खाजगी कापूस जीनिंग-प्रेसिंग कारखान्यांकडे अनेक वर्षांपासून ६६ लाख रुपयांचा अकृषक कर थकला आहे, मात्र जीनिंग मालकांनी हा कर थकवून राजरोसपणे उद्योग सुरू ठेवला आहे.

चौधरी खून खटल्यातील आरोपी निर्दोष मुक्त

0
0
जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. विजया चौधरी यांच्या खून खटल्यातील प्रमुख आरोपी युवराज साबळे, पंकज संदानशिव व महेश वर्मा यांची मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. व्ही. एल. आचलिया यांनी निर्दोष सुटका केली आहे. हा खटला राज्यभर गाजला होता.

रोडरोमियोंवर ‘दामिनी’चा वचक हवा

0
0
कॉलेजच्या तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या दामिनी पथकाने वर्षभरात केवळ ९१ प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. तक्रारी आल्यानंतर कारवाई करणाऱ्या या दामिनीचा रोडरोमियोंवर वचक नसल्याचे दिसून येत आहे.

प्लास्टिक सर्जरी शिबिरात ३०३ शस्त्रक्रिया

0
0
लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा, महात्मा गांधी मिशन रिसर्च सेंटर आणि औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री डॉ. शरदकुमार दीक्षित स्मरणार्थ आयोजित प्लास्टिक सर्जरी शिबिरात चार दिवसांमध्ये तब्बल ३०३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिरात ५५० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

क्रांती चौकातील जागेच्या विषयावरून गरमागरमी

0
0
क्रांती चौक येथील आरक्षित मालमत्तेच्या विकासाबाबत पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे कोट्यावधींचे नुकसान होणार आहे. गेल्या सभेत चर्चिला गेलेला विषय नामंजूर करावा, आरक्षित भूखंडांबाबत पालिकेने व्यावसायिक धोरण स्वीकारले तर, तिजोरीत कोट्यावधी रुपये जमा होऊ शकतात, अशी चर्चा नगरसेवकांमध्ये सुरू झाली आहे.

मराठवाड्याला थंडी झोंबणार

0
0
अवकाळी पाऊस व काही दिवसांपासून कश्मीरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे तापमानात अचानक बदल झाला आहे. उत्तरेकडून येत असलेले थंडवाऱ्यांचा प्रवाह व पश्चिमी विक्षोपाच्या वाऱ्यामुळे यंदा थंडी चांगलीच झोंबणार आहे. मराठवाड्यामध्ये यंदा सरासरी ८ अंशापर्यंत तापमान घसरण्याची शक्यता आहे.

रेल्वेचे हॉस्पिटल आवश्यक

0
0
रेल्वे सेवेतून निवृत्त झालेल्या माजी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी नांदेड येथील रेल्वे हॉस्पिटलला जावे लागते. औरंगाबाद शहरात माजी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असून रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथे मल्टिस्पेशलिस्ट हॉस्पिटल सुरू करावे, अशी मागणी ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमन फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे.

हॉस्पिटलचा सुधारित प्रस्ताव पाठवा

0
0
महापालिकेला ३०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आता पुन्हा नव्याने प्रस्ताव करून पाठवावा लागणार आहे. एकदम ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निधीची मागणी करणारा सुधारित प्रस्ताव राज्य सरकारमार्फत पाठवा, असे पालिकेच्या शिष्टमंडळाला सांगण्यात आले आहे.

आरोपीची अन्नान्न दशा

0
0
सर्वसामान्यांनी १२५ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या सुपर पॉवर कंपनीच्या एका संचालकाची अटकेच्या भितीने अक्षरशः अन्नान दशा झाली. कंपनीचा संचालक म्हणून वावरणारा कैलास महाजन याने रिसोड व मालेगावात त्याने बस्ता हलविले.

पाणी सोडण्याला स्थगितीला नकार

0
0
गोदावरी, मुळा व प्रवरा नद्यांवरील धरण समूहांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला. कोणत्या धरणातून किती पाणी सोडावे, याचा निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला आहे, असेही कोर्टाने सांगितले.

पासपोर्ट केंद्र पुन्हा सुरू होणार

0
0
केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतलेल्या जाचक निर्णयामुळे औरंगाबाद येथील तीन वर्षांपूर्वी बंद झालेले पासपोर्ट सेवा केंद्र पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र व गोवा येथील मुख्य पासपोर्ट अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी शुक्रवारी औरंगाबादला येणार आहेत.

चीनी यानरुई झाली औरंगाबादची जुई

0
0
या गीताच्या ओळी सार्थ ठरवित चीनच्या जगप्रसिद्ध भिंतीला पार करीत दोन ‘पंछी’ एकमेकांचे झाले ते जन्माजन्मांतरासाठी. यातील वर होता भारतीय आणि वधू होती चीनची.

‘आओ जाओ, घर तुम्हारा’

0
0
दहशतवाद विरोधी पथकातर्फे (एटीएस) राज्यातील सायबर कॅफेचालकांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दहशतवादी संघटनांकडून इंटरनेटचा वापर होत असल्याने ही सतर्कता ‌बाळगण्यात येत आहे. मात्र शहरातील काही सायबर कॅफेंचा आढावा घेतला असता, या सूचनाचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images