Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मानेंच्या निवडीचा मार्ग मोकळा

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धनराज माने यांची राज्याच्या उच्च शिक्षण संचालकपदी निवड झाली. त्यांच्या निवडीवर मुंबई हायकोर्टाने शिक्कामोर्तब केले.

पासपोर्ट कार्यालय दूरच

$
0
0
औरंगाबादेत पासपोर्ट कार्यालय पुन्हा सुरू होणार असल्याची चर्चा असली तरी, प्रत्यक्षात हे कार्यालय कधी सुरू होणार हे अद्यापही निश्चित नाही. तूर्त जानेवारी महिन्यात दोन दिवसांचा पासपोर्ट कँप आयोजित करून औरंगाबादकरांच्या मागणीला पुन्हा एकदा हुलकावणी देण्यात आली आहे.

ड्रायलँड पोर्टचा अहवाल लवकरच

$
0
0
ड्रायलँड पोर्ट प्रकल्पाच्या उभारणीसंर्दभात शनिवारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक झाली. या प्रकल्पाचा अहवाल लवकरात लवकर तयार करण्यात येत आहे.

भाजप आक्रमक, सेना बॅकफूटवर

$
0
0
महापालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाने आक्रमक पावित्रा घेतला. चार महिन्यांनंतर होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सक्रिय झाल्याचे दिसून आले. एरव्ही शांत असलेल्या भाजपकडून घेतलेल्या पावित्र्यामुळे शिवसेना बॅकफूटवर गेली.

दोन शेतकऱ्यांच्या आत्म‌हत्या

$
0
0
सततचा दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस आणि कर्जबाजारीपणाला वैतागून उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी शनिवारी जीवनयात्रा संपविली. २० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६४ झाली आहे. त्यापैकी १६ शेतकऱ्यांच्या कुटुंबाना शासकीय मदत मिळाली आहे.

माळेगाव यात्रेसाठी दररोज १५ लाख लिटर पाणी

$
0
0
माळेगाव यात्रेसाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या पुढाकारातून तात्काळ पाणीपुरवठा योजना पूर्ववत झाली आहे. त्यामुळे यात्रेकरूसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. लिंबोटी धरणातून दररोज अंदाजे १५ लाख लिटर पाण्याचा यात्रेसाठी पुरवठा होत आहे.

ऊसतोड मजुरांच्या अपेक्षा उंचावल्या

$
0
0
राज्य सरकारने स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने उसतोड कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या तीस वर्षापासून असंघटित कामगार म्हणून राबणाऱ्या या मजुराला न्याय मिळाल्याची भावना ऊसतोड कामगार संघटनांचे नेते व्यक्त करीत आहेत.

‘एक उलट..’ने काळजाला हात

$
0
0
थेट हृदयाला हात घालणाऱ्या वेगवेगळ्या जीवनानुभवांसह व्यक्त झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष लिखित ‘एक उलट... एक सुलट’ या पुस्तकाच्या अभिवाचनाला शहरातील रसिक-श्रोत्यांची भरभरून दाद मिळाली.

संस्थाचालकांसाठी शहाणपण

$
0
0
अध्यापनशास्त्रातील पदविका, पदवीचे प्रमाणपत्र हाती असतानाही नोकरीची शाश्वती नसल्याने राज्यातील डीटीएड, बीएड अभ्यासक्रमांच्या कॉलेजांना टाळे लागत आहेत.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोघांना पोलिस कोठडी

$
0
0
भंगार व्यापाऱ्याकडून ३५ हजाराची लाच घेणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांना प्रथम तदर्थ सत्र न्यायधीश आर. आर. काकाणी यांनी २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोंढ्यात चार दुकाने फोडली

$
0
0
जुन्या मोंढ्यात दोन चोरट्यांनी चार किराणा दुकाने व गोडावून फोडल्याची घटना शनिवारी रात्री साडेबारा वाजता घडली. जुना मोंढा पोलिस चौकीच्या समोरच ही दुकाने आहेत.

‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे ‘सिक्रेट सांता’ उपक्रम

$
0
0
ख्रिसमसच्या सकाळी उशीजवळ सांताक्लॉजने काय गिफ्ट ठेवले असेल याची उत्सुकता चिमुकल्यांना असते. पण गरीब कुटुंबातील गरजू आणि निराधार मुलांसाठी, असा कोणताच सांताक्लॉज गिफ्ट देत नाही.

पदवीदान सोहळ्याचे निमंत्रण इराणींनी स्वीकारले

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ जानेवारीत होणार आहे. सोहळ्यासाठी विद्यापीठाने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना आमंत्रित केले आहे. विद्यापीठाचे आमंत्रण त्यांनी स्विकारले असून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा सोहळा होण्याची शक्यता आहे.

गुळाची चवच भारी

$
0
0
अलीकडच्या काळात साखरेचे महत्व वाढले आहे, पण पूर्वी पदार्थाची गोडी वाढविण्यासाठी गुळाचे अनन्यसाधारण महत्त्व होते. आजही अनेक घरांमध्ये दैनंदिन जेवणात गुळाचा वापर केला जातो.

शोषण, गंडा, घोटाळ्यांनी गाजले वर्ष

$
0
0
जनसामान्यांना कोट्यवधींचा गंडा घालणारा केबीसी, सुपर पॉवर सारख्या घोटाळ्यांनी सरते वर्ष गाजले. मंगळसूत्र चोऱ्या, घरफोडी, दुचाकीचोरी या गुन्ह्यांत भरमसाट वाढ झाली.

भाजपची श्रेयासाठी दिल्ली वारी

$
0
0
महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कामाचे श्रेय मिळविण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. गेल्या आठवड्यात शिवसेनेचे पदाधिकारी आयुक्त व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन दिल्लीवारी करून आले.

‘गुलजार औरंगाबादी’ तो खुशी

$
0
0
गालिब… सर्वकालीन सर्वव्यापी जीवन व्यापून राहिलेला शायर… जगण्यातल्या विभिन्न छोट्या-छोट्या गोष्टींवरून थेट हृदयी भिडणारे जीवनविषयक तत्वज्ञानासह दृष्टी देणारा शायर..

पैसेच नाहीत, कामे कशी करू?

$
0
0
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मंजूर झालेली कामे सुरू करा, असा आग्रह धरत नगरसेवकांनी शनिवारच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरले होते. सोमवारच्या सभेत यासंदर्भात प्लॅनिंग करून घोषणा करा, असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला.

पालिकेकडून आर्थिक उधळपट्टी

$
0
0
बीड नगरपालिकेत गेल्या काही वर्षांत नियम धाब्यावर बसवून कामकाज सुरू आहे. पालिकेच्या नगर रचना, बांधकाम, आरोग्य विभागात मोठी अनागोंदी माजली आहे, असा आरोप माजी नगरसेवक खालेक पेंटर यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन केला.

लाचखोरी: महसूल-पोलिस स्पर्धा

$
0
0
लाचखोरीच्या बाबतीत उस्मानाबाद जिल्ह्यात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून लाचखोरीसाठी महसूल, पोलिस विभागात स्पर्धा लागली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात वर्षभरात ३६ गुन्हे दाखल झाले आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images