Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पाण्याला ब्रेक म्हणजे फसवणूक

$
0
0
जायकवाडी सोडले जाणारे निळवंडेचे पाणी थांबविल्याबद्दल मराठवाड्यातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ‘निळवंडेच्या पाण्याला ब्रेक लावणे म्हणजे मराठवाड्याची व कोर्टाची घोर फसवणूक आहे,’ अशा शब्दांत तज्ज्ञांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

लॉ स्कूलच्या कुलगुरूंची नियुक्ती प्रक्रिया लवकरच

$
0
0
औरंगाबाद व नागपूर येथे लॉ स्कूलच्या कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना मुंबई हायकोर्टाच्या न्या. .व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते-डेरे या खंडपीठाने राज्य शासनाला दिल्या आहेत.

वेदांतनगरात चंदनचोर गजाआड

$
0
0
बंगल्याच्या आवारात शिरून चंदनाचे झाड चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला क्रांती चौक पोलिसांनी पहाटे साडेतीन वाजता नागरिकांच्या मदतीने अटक केली. त्याचे दोन साथीदार दुचाकीवर पसार झाले.

पाहुण्या महिलेला मंगळसूत्र चोरांचा झटका

$
0
0
कर्नाटक येथून शहरात पाहुण्यांकडे आलेल्या जेष्ठ नागरिक महिलेचे पाच तोळ्यांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता पळविले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारभा‍री नाकर्ते

$
0
0
मराठवाड्यातील राजकीय मंडळींनी आजवर विभागाच्या विकासासाठी कधीच ठोस भूमिका घेतली नाही. चार मुख्यमंत्री होऊनही मराठवाड्याच्या पदरी एकही केंद्रीय संस्था आली नाही. नव्या कारभाऱ्यांमध्येही विकासाबाबत आस्था नसल्यानेच औरंगाबादला होऊ घातलेले आयआयएम नागपूरला गेले.

‘समांतर’च्या कंत्राटाची चौकशी करा

$
0
0
समांतर जलवाहिनीसाठी केंद्र शासनाकडून निधी दिला असताना औरंगाबाद महापालिकेने समांतर जलवाहिनीचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले आहे. या कंपनीकडून शहरवासीयांची लूट केली जाणार आहे.

बिबट्या कॅमेऱ्यात कैद

$
0
0
सोयगावजवळील गलवाडा येथील शेतात गायीवर ताव मारण्यासाठी आलेला बिबट्या वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

‘ITI’ला निगेटिव्ह मार्किंग

$
0
0
आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था)ला पुन्हा एकदा येत्या शैक्षणिक सत्रापासून नकारात्मक गुणपद्धती लागू होणार आहे. या पद्धतीला विद्यार्थ्यांनी आतापासूनच विरोध सुरू केला आहे.

'त्या' तरुणीचा बीडमध्ये मृत्यू

$
0
0
बीडमधील ऑनर किलिंग प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या युवतीचा गुरुवारी मृत्यू झाला. या प्रकरणातील युवकावर उपचार सुरू आहेत. बीडमध्ये मंगळवारी हा प्रकार घडला होता.

सलग सहाव्या दिवशी पाणीबाणी

$
0
0
फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनी आणि व्हॉल्व्ह तुटल्याने विस्कळित झालेला औरंगाबादचा पाणीपुरवठा सहाव्या दिवशीही पूर्ववत झाला नाही. शनिवारपासून अर्ध्या शहराला पाणी आलेले नाही. गुरुवारीही ही अडचण कायम होती.

सरकारकडून मराठवाड्याची फसवणूक

$
0
0
महाराष्ट्रासाठीचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) औरंगाबादऐवजी नागपूरला जाहीर करून केंद्र सरकारच्या उत्तम प्रशासनदिन उपक्रमाचा भंग केला आहे. राज्य सरकारने अपारदर्शी निर्णय घेऊन मराठवाड्याची फसवणूक केली आहे.

जायकवाडीतच पाणी नाही; अधिकाऱ्यांचा जावई शोध

$
0
0
शहराचा विस्कळित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यास अपयश आलेल्या औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शहरवासीयांना थातूरमातूर उत्तरे देत बनवाबनवी करण्याचा प्रयत्न केला. प्रकरण आपल्या अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रकृती अस्वास्थाचे कारण सांगून घटनास्थळी येण्याचे टाळले.

आता मनपाची इमारत गहाण ठेवणे शिल्लक

$
0
0
‘बीओटी तत्त्वामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. एखादा मोठा प्रकल्प औरंगाबादला आला तर, मनपाकडे स्वतःच्या मालकीचा एकही भूखंड नाही. मनपाची मुख्य इमारतच गहाण ठेवण्याचे सत्ताधाऱ्यांनी शिल्लक ठेवले आहे,’ असा आरोप शुक्रवारी (२६ डिसेंबर) आमदार सतीश चव्हाण यांनी केला.

ऋतुराजची पाच तासांनंतर सुटका

$
0
0
बोअरमध्ये पडलेल्या चार वर्षांच्या ऋतुराजने तब्बल पाच तास काळाशी झुंज दिली. ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर, १५ फूट खोल खड्ड्यातून सुखरूप बाहेर पडला. श्वास रोखून धरायला लावणारी ही घटना शुक्रवारी (२६ डिसेंबर) वैजापूर तालुक्यातील गोळवाडी येथे घडली. या मुलाची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पाण्यासाठी नागरिकांचा उद्रेक

$
0
0
तब्बल ९ दिवस उलटूनही पाणीपुरवठा न झाल्यामुळे नागरिकांनी शुक्रवारी पहाटे पाण्याच्या टाक्यावर धडक मारली. चिडलेल्या नागरिकांना नगरसेवकांनाही धारेवर धरले. त्यानंतर संतापलेल्या नगरसेवकांनी पाण्याची मागणी करत औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. जलवाहिनी दुरुस्त झाल्यानंतर विजेने दगा दिल्यामुळे पाणीपुरवठा शुक्रवारीही विस्कळित झाला होता.

मंगळसूत्र पळवले; हातही मोडला

$
0
0
बजरंग चौकात परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी ६२ वर्षांच्या महिलेचे दीड लाखाचे मंगळसूत्र पळविल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. मंगळसूत्र ओढताना ही महिला खाली पडल्याने हात फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

‘एमडीआर-टीबी’साठी ८ मशीन

$
0
0
फुफ्फुसाच्या ‘टीबी’ची पुढची पायरी असलेल्या ‘एमडीआर-टीबी’ या गंभीर आजाराचे दोन तासांत निदान करणारे ‘जीन-एक्सपर्ट’ हे अत्याधुनिक उपकरण सध्या महाराष्ट्रामध्ये १३ ठिकाणी कार्यान्वित आहे, तर अजून ८ नवीन उपकरणे येत्या महिनाभरात विविध ठिकाणी कार्यान्वित होणार आहेत.

राष्ट्रीय उर्दू पुस्तक मेळा आजपासून

$
0
0
१७ व्या राष्ट्रीय उर्दू पुस्तक मेळाव्याला शनिवारपासून (२७ डिसेंबर) सुरुवात होत आहे. यानिमित्ताने उर्दू, हिंदी साहित्याच्या विविध पुस्तकांसह मुशायरा, नाटय तसेच विविध विषयांवरील कार्यशाळेचे आगामी आठ आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रा. ख्वाजा मोहम्मद इक्रामोद्दीन यांनी शुक्रवारी (२६ डिसेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सहायक फौजदाराच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

$
0
0
क्रांती चौक पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक फौजदाराच्या विवाहित मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार गुरुवारी रात्री जटवाडा परिसरात घडला. ही आत्महत्या आहे की खून याचा तपास पोलिस करीत आहेत. दोन दीरांना याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बजाजनगरात तीन दुचाकी जाळल्या

$
0
0
मोटरसायकली जाळण्याचे सत्र अद्यापही सुरूच आहे. गेल्या आठ दिवसांपासून अज्ञात माथेफिरुकडून पुन्हा दुचाकी जाळण्याचा सपाटा सुरु ठेवला आहे. सामान्य कामगारांसाठी महत्वाची असलेली दुचाकी दिवसागणीक जळत असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची भूमिका पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images